Home » पाकिटात ठेवा या 5 वस्तू, आर्थिक समस्यांपासून व्हाल मुक्त

पाकिटात ठेवा या 5 वस्तू, आर्थिक समस्यांपासून व्हाल मुक्त

by Team Gajawaja
0 comment
Money Problem Remedies
Share

Money Problem Remedies : माता लक्ष्मीला धन, वैभवाची देवी मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचे अशीर्वाद असतात, त्याला आयुष्यात कोणत्याच गोष्टींची चणचण भासत नाही. वास्तु शास्रानुसार, काही गोष्टी अशा असतात की, त्यांची उर्जा देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी प्रभावशाली मानल्या जातात. याच काही गोष्टी पाकिटात ठेवल्यास कधीच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार नाही. जाणून घेऊया पाकिटात अशा कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे आर्थिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल.

कुबेर यंत्र
भगवान कुबेराला धनाचा देव मानले जाते. कुबेर यंत्र धन प्राप्तीसाठी खूप शुभ मानले जाते. हे यंत्र पाकिटात ठेवल्यास धन आणि समृद्धी आकर्षित होते. याशिवाय कुबेर यंत्रास पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून ठेवावं. जेणेकरुन व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

हळद लावलेले तांदूळ
वास्तू शास्त्रनुसार, पर्स मध्ये जर तुम्ही हळद लावलेले तांदळाचे दाणे ठेवल्यास पैशांमध्ये वाढ होते. तांदळला समृद्धीच प्रतीक मानलं जात. वास्तू शास्रानुसार, गुरुवारच्या दिवशी तांदळाला हळद लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर शुक्रवारी हळद लावलेले तांदूळ पाकिटात ठेवा. यामुळे धनात वाढ होते.

Money Problem Remedies

Money Problem Remedies

गोमती चक्र
वास्तू शास्त्रानुसार, गोमती चक्र देवी लक्ष्मीला प्रिय आहे. गोमती चक्रास पर्समध्ये ठेवल्याने कर्जापासून मुक्तता मिळते आणि धन लाभ होतो. गोमती चक्र पर्समध्ये ठेवण्याआधी त्याला कुंकू लावा. यानंत लक्ष्मी मंत्र ‘ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद, श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नमः’ याचा जप करावा आणि गोमती चक्र पर्स मध्ये ठेवावे.

=======================================================================================================

हेही वाचा : 

Golconda Blue Diamond : गोलकोंडा ब्लू डायमंडचा होतोय लिलाव !

Padma Award 2026: पद्म पुरस्कार 2026 साठी नामांकन प्रक्रिया सुरू

=======================================================================================================

चांदीचे नाणे
चांदीचे नाण हे समृद्धीच प्रतीक मानले जाते. वास्तु शास्रानुसार, चांदीच नाणे पर्समध्ये ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. देवी लक्ष्मीला चांदीच नाणे अर्पण केल्यानंतर पर्समध्ये ठेवा. यामुळे धनलाभ होतो. चांदीच नाण पर्स मध्ये ठेवण्याआधी ते कच्या दुधामध्ये थोडावेळ ठेवा. (Money Problem Remedies)

कावड्या ठेवा
धनप्राप्तीसाठी तुमच्या पर्समध्ये कवड्या ठेवा. असे केल्यास पैश्यांची कमतरता दूर होते. कवड्या पाकिटातवल्याने आर्थिक स्थितित सुधारणा होते. घरात देवी लक्ष्मीचा वास राहण्यासाठी पाकिटात कवड्या ठेवू शकता. याशिवाय आर्थिक समस्याही दूर होतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.