क्रिकेट म्हटले की डोक्यात सर्वात आधी काय येते…? खरं सांगा…क्रिकेट हा शब्द उच्चरला की, डोक्यात सर्वात आधी नाव येते ते सचिनचे हो ना…? अहो हे फक्त तुमच्या नाही तर आमच्याही बाबतीत असेच होते. कारण क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजेच क्रिकेट या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. आपल्याकडे नेहमीच म्हटले जाते की, भारतात क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म आहे. अगदी लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच या क्रिकेटचे कमालीचे वेड आहे. क्रिकेटसाठी ऑफिसमधून सुट्ट्या घेतल्या जातात किंवा दिल्या देखील जातात, यावरूनच खेळते आपल्या भारतीयांसाठी क्रिकेट काय आहे. (Sachin Tendulkar)
मात्र हा खेळ भारतीयांचा अगदी श्वास ठरावा यासाठी अनेक दिग्गज लोकं, खेळाडू कारणीभूत आहे. त्यांनी त्यांच्या खेळणे लोकांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. यातलेच एक महत्वाचे आणि सर्वात मोठे नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. परदेशी खेळ असलेल्या क्रिकेट वर वर्चस्व गाजवले ते एका भारतीयाने किती अभिमानाची बाब आहे. क्रिकेटचा देव असलेला आपला मराठमोळा सचिन तेंडुलकर म्हणजे निव्वळ अवलिया. आपल्या बॅटच्या जादूने त्याने क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच कोणाला करता येतील असे अशक्य रेकॉर्ड तयार केले आहेत. (Sachin Tendulkar Birthday)
आज २४ एप्रिल रोजी हाच क्रिकेटचा जादूगार सचिन तेंडुलकर त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनने मोठ्या मेहनतीने आणि चिकाटीने संपूर्ण जगात ओळख मिळवली. त्याचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, जगातील ज्या देशांमध्ये क्रिकेट खेळाला जात नाही, क्रिकेटबद्दल जास्त माहिती नाही अशा लोकांना देखील सचिन माहित आहे. आज सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या अलौकिक प्रवासाबद्दल. (Marathi)
२४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात सचिन तेंडुलकरचा जन्म झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी कवी, कादंबरीकार आणि साहित्यिक होते. तर आई रजनी तेंडुलकर एका विमा कंपनीत काम करत होत्या. सचिनला लहानपणापासूनच क्रिकेटची खूपच आवड होती. त्याने मुंबईच्या गल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर, शिवाजी पार्कवर शिवाय विविध मैदानांवर क्रिकेट खेळून स्वतःचे कौशल्य वाढवले. सचिन टेनिससुद्धा खूपच उत्तम खेळायचा. सचिनने आनंदक विविध मुलाखतींमध्ये देखील हे सांगितले आहे की, त्याचे क्रिकेट करियर घडवण्यात त्याच्या भावाचा अजित तेंडुलकरचा मोठा वाटा आहे.(Sports News)
=======
हे देखील वाचा : Golconda Blue Diamond : गोलकोंडा ब्लू डायमंडचा होतोय लिलाव !
=======
क्रिकेटमध्ये करियर करण्याचे स्वप्न या दोघं भावांनी एकत्र पाहिले होते. मात्र अजित तेंडुलकर यांनी सचिनमधली प्रतिभा ओळखली आणि त्यांनी सचिनला त्यांचे गुरु असलेल्या रमाकांत आचरेकर यांच्याकडे नेले. सुरुवातीला सचिन आचरेकर गुरुजींना प्रभावित करण्यात असमर्थ राहिला, मात्र नंतर त्याने त्याच्या खेळातून गुरुजींना कमालीचे प्रभावित केले. अजित यांनी देखील सचिनसाठी स्वतःच्या स्वप्नाचा त्याग केला. सचिन क्रिकेट खेळतच होता. शाळा आणि क्रिकेटचा सराव या दोन्ही गोष्टी तो उत्तमपणे करत होता. क्रिकेटला वेळ देता यावा यासाठी तो काही काळ त्याच्या काका काकुंजवळ देखील राहिला. (Sachin Tendulkar News)
पुढे १९८७ मध्ये भारतामध्ये पहिला विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेच्या वेळी सचिन १४ वर्षांचा होता. तेव्हा तो बॉल बॉय म्हणून देखील काम करायचा. बॉल बॉय म्हणून काम करताना त्यानं विश्वचषक सामना खूपच जवळून पहिला. क्रिकेटमधील अनेक गोष्टी बारकावे त्याला या निमित्ताने शिकायला मिळाले. याचा त्याला त्याच्या सरावात खूपच उपयोग होत होता. पुढे १९८९ साल उजाडले, हे वर्ष त्याच्यासाठी खूपच महत्वाचे आणि आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सचिननं भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. सचिननं १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. मात्र, त्याला त्याचा पहिला सामना अविस्मरणीय करता आला नाही. करत या सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात सचिन केवळ १५ धावा करून बाद झाला. (Marathi Top News)
मात्र यामुळे तो खचला नाही अधिक जोमाने उभा राहिला आणि प्रॅक्टिस करू लागला. पुढे सचिन तेंडुलकरने १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. या शतकाच्या मदतीने भारताने इंग्लंडविरुद्धचा तो सामना अनिर्णित राखला होता. इथूनच खऱ्या अर्थाने सचिनला त्याचा सूर गवसला आणि तो एकामागोमाग एक असे विक्रम रचत गेला. सचिन एक उत्तम फलंदाज असण्यासोबतच एक उत्तम गोलंदाज आणि कॅप्टन देखील होता. त्याने बराच काळ भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून काम केले. सचिन कायमच जेव्हा जेव्हा ग्राउंडवर बॅटिंगसाठी यायचा तेव्हा केवळ भारतीयच नाही तर संपूर्ण जगातील त्याचे चाहते टीव्ही, रेडिओजवळ त्याची बॅटिंग संपेपर्यंत बसून असायचे. (Marathi Latest News)
सचिनने जगभरातील सर्वच फास्ट बॉलरचा बिनधास्त सामना केला. सचिनला आऊट केल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाच्या चेहऱ्यावर जणू वर्ल्डकप जिंकल्याचंच आनंद यायचा. सचिनच्या बॅटिंगला जगभरातील सर्वच खेळाडू खूपच घाबरायचे. म्हणूनच तो आला की सर्वच सचिन कधी आऊट होतोय याची वाट पाहायचे. आज सचिन तेंडुलकर हे केवळ एक साधारण नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. त्याने क्रिकेटच्या इतिहासात असे असे रेकॉर्ड तयार केले जे कोणालाही इतक्या सहजा सहजी नक्कीच मोडता येणार नाही. (Top Stories)
=======
हे देखील वाचा : Singapore : कशा असतात सिंगापूरच्या शाळा !
=======
१६ नोव्हेंबर २०१३ रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर जेव्हा सचिनने निवृत्ती घेतली तेव्हा संपूर्ण देश भावुक झाला होता. सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ७४ धावांच्या खेळीने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला होता. (Cricket News)
सचिन तेंडुलकर संपत्ती
सचिन तेंडुलकर हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. आजही सचिन कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. तो निवृत्त झाला असला तरी, मोठे ब्रँड अजूनही त्याच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात, ज्याद्वारे तो खूप कमाई करतो. रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे १२५० कोटी रुपये आहे. सचिन दरवर्षी ब्रँड एंडोर्समेंटमधून सुमारे २०-२२ कोटी रुपये कमवतो. सचिनने क्रिकेटमधून संन्यास घेतला असला, तरी तो मोठ्या ब्रँड्ससाठी सचिन खास चेहरा आहे. तो अनेक ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कोटींची कमाई करतो. (Trending News)
सचिनची मुंबईत घरं असून केरळमध्येही त्याचं घर आहे. सचिनचा मुंबईतील वांद्रे येथे एका पॉश भागात अलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. २००७ मध्ये जवळपास ४० कोटी रुपयांत सचिनने हा बंगला खरेदी केला होता. त्याशिवाय मुंबईतील ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्याचा लग्झरी फ्लॅट आहे. सचिनकडे लक्झरी कार कलेक्शन आहे. BMW i8, BMW 7 Series, Ferrari 360 Moden, Audi Q7, BMW M6 Gran Coupe, Nissan GT-R, 750Li M Sport अशा महागड्या लक्झरी कार आहेत.(Social News)
सचिन तेंडुलकर पुरस्कार
२०१४ साली सचिन तेंडुलकरला भारताचा सर्वोत्तम नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी त्याला १९९४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९७ मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न, १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००३ मध्ये सचिनला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर २०१२ साली सचिनला ऑस्ट्रेलिया सरकारने ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार दिला. याचवर्षी बीसीसीआयने सचिनला कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. याव्यक्तिरिक्त त्याने असंख्य पुरस्कार कमावले आहेत. (Marathi News)
सचिनचे रेकॉर्ड
– सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके आहेत. यापैकी ४९ एकदिवसीय सामन्यात आणि ५१ शतके कसोटी सामन्यात झळकावली आहेत.
– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्यामध्ये त्याने सर्वाधिक धावाही केल्या आहेत. आजही सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४,३५७ धावा करणारा खेळाडू आहे. (Sachin Tendulkar Marathi News)
– सचिन तेंडुलकर सर्वाधिक २०० कसोटी सामने भारतासाठी खेळले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने ही संख्या गाठलेली नाही.
– वनडेमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम रोहित शर्माच्या नावे असला तरी वनडेमध्ये पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २०१० मध्ये ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने ही कामगिरी केली होती.
=======
हे देखील वाचा : London : लंडन शहरापासून श्रीमंत चालले दूर !
=======
– कसोटीप्रमाणेच सचिनच्या नावे सर्वाधिक वनडे सामन्याचा विक्रम आहे. सचिनने ४६३ वनडे सामने खेळले असून २०१२ मध्ये भारतासाठी अखेरचा वनडे सामना खेळला. त्यानंतर महेला जयवर्धनेने ४४८ वनडे सामने खेळले आहेत.
– कसोटी क्रिकेटप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टरने ४४.८३ च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा करत आपली एकदिवसीय कारकीर्द पूर्ण केली.