Home » Measles : अमेरिकेला गोवरचा विळखा !

Measles : अमेरिकेला गोवरचा विळखा !

by Team Gajawaja
0 comment
Measles
Share

अमेरिकेमध्ये गोवर या रोगानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या काही शहरांमध्ये गोवर झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांचा अधिक समावेश आहे. यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं अमेरिकेच्या आरोग्य सचिवांनीही या भागाचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. वास्तविक अमेरिकेने 2000 साली देशातून गोवर निर्मूलन झाल्याचे घोषित केले होते. त्यामुळे अचानक असे गोवरचे रुग्ण कसे वाढले हा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Measles)

त्यामागे कारण आहे, ते अमेरिकन जनतेचे दुर्लक्ष. अनेक अमेरिकन नागरिक लसीकरण मोहीमेला नकार देत आहेत. आता ज्या भागात गोवरचे रुग्ण आढळत आहेत, तेथे सत्तर टक्के नागरिकांनी लसीकरणाला विरोध केल्याचे उघड झाले आहे. ही गोवरची साथ अमेरिकेच्या काही भागात एवढी पसरली आहे की, पुढच्या काही महिन्यात त्याचा अधिक वेगानं फैलाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण या सर्वातही विरोधाभास म्हणजे, अमेरिकेचे आरोग्य सचिव असलेले रॉबर्ट एफ. केनेडी यांनी एकेकाळी लसीकरणाला विऱोध केला होता. तसेच लसीकरणामुळे अन्य आजारांचा सामना करावा लागतो, हे विचार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले होते. आता त्याच केनेडी यांच्या हातात अमेरिकेतील जनतेचे आरोग्य असून ते लसीकरणाबाबत जागृती करणार आहेत. (International News)

अमेरिकेत गोवरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासाठी खुद्द अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांना दौरा करावा लागत आहे. केनेडी यांनी टेक्सासमध्ये जाऊन गोवरनं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेतली. गावरनं अमेरिकेत आत्तापर्यंत तीन विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे, शिवाय या रोगानं ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही वाढती आहे. त्यामुळे टेक्सास आणि अन्य भागांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Measles)

जानेवारीमध्ये पश्चिम टेक्सासमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. नंतर मात्र त्याचा वेगानं प्रसार झाला. सध्या टेक्सासमधील स्थानिक रुग्णालयात गोवरने ग्रस्त असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन मधील पथके टेक्सास मध्ये दाखल झाली आहेत. गोवर सोबतच गालगुंड आणि रुबेलाचे रुग्णही आढळल्यानं आरोग्य विभागानं चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीनुसार टेक्सासमध्ये गोवरचे 481 रुग्ण आहेत. शिवाय न्यू मेक्सिको, ओक्लाहोमा आणि कॅन्सससह अन्य राज्यातही गोवरच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. काळजीचे कारण म्हणजे, जे रुग्ण आढळत आहेत, त्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळेच आता अमेरिकेमधील आरोग्य विभाग लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर भर देत आहे. (International News)

अमेरिकन जनतेमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता आहे. हिच उदासीनता गोवरसारख्या रोगाच्या फैलावास कारणीभूत ठरली आहे. गोवरचा फैलाव का झाला, याची पाहणी केल्यावर आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी त्यांचे आयुष्य स्वतःहून धोक्यात टाकले आहे. टेक्सास आणि न्यू मेक्सिकोमध्ये ज्या गोवर रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांचे लसीकरण झालेले नव्हते. त्यातही टेक्सास राज्याची परिस्थिती भयानक आहे. टेक्सासमध्ये 70 टक्के गोवर झालेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे या भागात आता आरोग्य विभागानं विशेष विभागांची स्थापना केली असून ड्रायव्ह-अप गोवर तपासणी सुरू केली आहे. ही परिस्थिती असतांना अमेरिकेचे नवे आरोग्य सचिव, रॉबर्ट एफ. रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांचे लसीकरणाबद्दलचे जुने विधानही व्हायरल होत आहे. केनेडी यांनी लसीकरणाबद्दल शंका व्यक्त केली होती. तसेच त्यांनी केनेडी यांनी चिल्ड्रन्स हेल्थ डिफेन्स नावाची लसीकरण विरोधी संघटना स्थापन केली. (Measles)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Shivaji Satam : सीआयडीची ओळख असणाऱ्या ‘एसीपी प्रद्युमन’चा प्रेरणादायी अभिनय प्रवास

==========

केनेडी यांनी यापूर्वी वारंवार लसींच्या सुरक्षिततेवर आणि परिणामकारकतेवर शंका उपस्थित केली आहे. एवढ्यावरच केनेडी थांबले नाहीत, तर लसींमुळे ऑटिझम होतो असा दावाही केला होता. आता तेच केनेडी अमेरिकेचे आरोग्य सचिव झाले आहेत. टेक्सासमध्ये फैलाव झालेल्या गोवर मागे लसीकरणाचा विरोध हे मुख्य कारण असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आल्यावर त्यांनी लसीकरण आवश्यक असल्याचे सांगितले आहे. मात्र या सर्वात अमेरिकेतील प्रमुख राज्य गोवर आणि अन्य रोगांच्या विळख्यात अडकली आहेत. आरोग्य विभागाला आता नागरिकांमध्ये पुन्हा लसीकरणाबाबत जागृकता निर्माण कऱण्याचे आव्हान असून वाढत्या गोवरच्या साथीलाही नियंत्रणात आणावे लागणार आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.