विमानाने प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र बऱ्याच लोकांसाठी हे स्वप्न सत्यात उतरवणे कठीण असते. विमानाबद्दल जवळपास सगळ्यांनाच कमालीचे आकर्षण असते. हजारो फूट उंच हवेमध्ये राहून पृथ्वीवरचे सौंदर्य बघणे म्हणजे निव्वळ अवर्णनीय अनुभव असतो. आजच्या पिढीतील अनेक मुलामुलींचे भविष्यात पायलट होऊन विमान चालवण्याची इच्छा असते. मात्र पायलट होणे वाटते तितके सोपे अजिबातच नसते. हजारो फूट उंच अनेकांच्या जीवाची जबादारी घेऊन हे पायलट आपले काम करतात. एक अतिशय छोटी चूक देखील खूपच महागात पडू शकते. (Airports)
संपूर्ण जगामध्ये विमानाचे मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे पायलट झाल्यावर विविध देश पाहायला मिळतील, फिरत येईल असे देखील अनेकांना वाटते. मात्र पायलट लोकांना सतत डोळ्यात तेल घालून, डोकं शांत ठेऊन आणि कान उघडे ठेऊन काम करावे लागते. पायलट लोकांचे कसब दाखवण्याच्या बऱ्याच संधी या प्रोफेशनमध्ये येतात. जसे की, प्रतिकूल ठिकाणी विमानाला सुरक्षितरित्या उतरवणे. हो आता तुम्ही म्हणाल प्रतिकूल ठिकाणी म्हणजे? सगळीकडे तर अतिशय मोठमोठे, लक्झरी, सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असे विमानतळं असतात. विमान जमिनीवर उतरवताना त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक लोकं देखील असतात. मग यात कसले आले कसब?(Top Trending News)
पण थांबा असे अजिबातच नाही. जगातील बहुतेक ठिकाणी अतिशय उत्तम विमानतळं असली तरी काही ठिकाणी असलेली विमानतळं पाहून भल्याभल्या पायलट लोकांना घाम फुटतो. अशा विमानतळांवर विमान उतरवणे खायचे काम नाही. शिवाय अशा विमानतळांवर अपघात होण्याची शक्यता देखील अधिक असते, म्हणूनच अनुभवी पायलट देखील अशा ठिकाणी जाण्याचे टाळतात. मग अशी कोणती विमानतळं आहेत, जी सर्वाधिक धोकादायक विमानतळं म्हणून ओळखली जातात चला जाणून घेऊया.(Top News)
========
हे देखील वाचा : Kitchen Tips : ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून चाकू, कात्रीला द्या घरच्या घरी धार
========
पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ, भूतान
पारो हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानले जाते. या विमानतळ चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, या विमानतळाच्या भोवती ५,५०० मीटर उंच शिखरं आहेत. विमानतळावर एक २,२६५ मीटर डांबरी धावपट्टी आणि एक टर्मिनल इमारत आहे. येथून फक्त दिवसा विमानं उडतात किंवा लँड होतात. रात्री इथे कोणतीच हालचाल होत नाही. या विमानतळावर उतरण्यासाठी वैमानिकांना विशेष प्रमाणपत्र घ्यावे लागते. कारण या विमातळावर विमान उतरवण्यासाठी ते ४५ अंशात फिरवावे लागते.(Marathi Latest News)
लुक्ला विमानतळ, नेपाळ
हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानले जाते. ८००० फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे नाव २००८ मध्ये बदलून तेनझिंग – हिलरी विमानतळ असे ठेवण्यात आले. जोरदार वारा, थंड वातावरण आणि रस्ता नीट न दिसणे ही या ठिकाणची सर्वात मोठी आव्हानं आहेत. याशिवाय फ्लॅट टेकऑफ आणि लँडिंगसाठी याच धावपट्टीचा वापर करावा लागतो. ही धावपट्टी लहान असल्याने विमान डोंगरावर आदळण्याची शक्यता आहे.(Social News)
प्रिन्सेस ज्युलियाना विमानतळ, नेदरलँड
सेंट मार्टिन या कॅरिबियन बेटाचे हे मुख्य विमानतळ असून, हे लँडिंग आणि टेक ऑफसाठी खूपच धोकादायक आहे. या विमानतळावर अतिशय कमी उंचीचा फ्लायओव्हर लँडिंगचा कोन आहे. अत्यंत लहान धावपट्टीवर विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग हा एक धोकादायक अनुभव असतो. ज्यामुळे हा विमानतळ जगातील धोकादायक विमानतळांच्या यादीत आहे.(Dangerous Airports)
साओ पाउलो विमानतळ, ब्राझील
हे अत्यंत कमी लांबीची धावपट्टी असलेले विमानतळ आहे, जेथे पायलट लँडिंग करण्यासाठी घाबरतात. धावपट्टीची कमी लांबी, अवघड कोन आणि निसरड्या रस्त्यांमुळे हे अतिशय धोकादायक विमानतळ मानले जाते.(Marathi News)
क्रिस्टियानो रोनाल्डो किंवा मदेइरा विमानतळ, पोर्तुगाल
हे विमानतळ पोर्तुगालच्या मदेइरा बेटांवर आहे. या विमानतळावर सर्व वैमानिकांना विमानं उतरण्याची परवानगी नाही. येथे उतरण्यासाठी फार कमी वैमानिकांना प्रमाणित केले जाते. येथील धावपट्टी ही जगातील सर्वात लहान हवाई पट्टी आहे जी खडक आणि समुद्र यांच्यामध्ये आहे.
कौरशेवेल अल्टो एअरपोर्ट, फ्रेंच
फ्रेंच आल्प्समध्ये ६५८८ फूट उंचीवर असलेले हे विमानतळ वैमानिकांसाठी खास अनुभव मानले जाते. मात्र या विमानतळाच्या धावपट्टीच्या उंची मुळे या ठिकाणी उड्डाण करणे भितीदायक मानले जाते.
========
हे देखील वाचा : Uluru : तुम्हाला माहित आहे का…? चमत्कारिक रंग बदलणाऱ्या डोंगराबद्दल
========
स्किथोस, ग्रीस
ग्रीसमधील हे आंतरारष्ट्रीय विमानतळ सर्वात लहान धावपट्टी असलेले आहे. या बेटाचा खडबडीत भूभाग समुद्रावर विमानतळ बांधण्यासाठी वापरण्यात आला आहे. स्किथोस आणि लाझारेटा बेटांना जोडणारा हा अनोखा एअरस्ट्रिप महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो.