Home » Rohit Sharma : बॉडी शेमिंग केली आणि आता त्यानेच फायनलमध्ये पोहोचवलं

Rohit Sharma : बॉडी शेमिंग केली आणि आता त्यानेच फायनलमध्ये पोहोचवलं

by Team Gajawaja
0 comment
Rohit Sharma
Share

रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून जाडजूड आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तो आजपर्यंतचा भारताचा सर्वात वाईट कॅप्टन आहे. असं ट्वीट कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शमा मुहम्मद यांनी नुकतच केलं होतं. यावरून बराच गदारोळ माजला आणि त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. याच वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताने Champions ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनल गाठली… कॅप्टन कोण… तर ज्याला जाडजूड म्हटलं गेलं तोच रोहित शर्मा ! हा तोच रोहित शर्मा आहे, ज्याने आयसीसीच्या सगळ्याच इव्हेंट्समध्ये म्हणजे टेस्ट Championship, वनडे वर्ल्ड कप, टी२० वर्ल्ड कप आणि आता Champions ट्रॉफीमध्येही भारताला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. त्यामुळे भारताने या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारताची Champions ट्रॉफीमधली एकंदरीत कामगिरी आणि रोहितच्या तगड्या कॅपटन्सीबाबत जाणून घेऊ. (Rohit Sharma)

तर भारत पाचव्यांदा Champions ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे यंदा भारताने सलग तिसऱ्यांदा Champions ट्रॉफीची फायनल गाठली आहे. २०१३, २०१७ आणि आता २०२५ मध्येही भारत फायनल खेळत आहे. २०१३ ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा Champion ठरला. २०१७ ला पाकिस्तानकडून भारताला मात खावी लागली. तर आता २०२५ साली विजयापासून फक्त एक पाऊल दूर आहे.(Sports News)

२००२ च्या Champions ट्रॉफीमध्ये इंडिया आणि श्रीलंका दोन्ही देशांना विजेतेपद घोषित करण्यात आलं होतं. भारताने आजपर्यंत एकदाच म्हणजे २००६ साली या स्पर्धेचं यजमानपद मिळवलं, त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती. यानंतर आता २०२९ ची Champions ट्रॉफी स्पर्धा पुन्हा एकदा भारतात होणार आहे. भारताकडून खेळताना गब्बर शिखर धवनने सर्वाधिक ७६४ रन्स केले आहेत, तर रवि अश्विनने १४ विकेट्स घेतले आहेत. आता फायनलमध्ये जर विराट कोहलीने 45 रन्स केले, तर तो या टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरू शकतो. (Rohit Sharma)

हा झाला एकंदरीत भारताचा Champions ट्रॉफीमधला लेखाजोखा… आता हिटमॅन कॅप्टन रोहित शर्माचा कर्णधार म्हणून प्रवास पाहुया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंतच्या सर्वच्या सर्व आयसीसी इव्हेंट्समधल्या फायनलपर्यंत पोहोचण्याचा पराक्रम त्याने केला आहे. तेही सलग… आधी टेस्ट Championship ज्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. त्यानंतर ICC वनडे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियानेच नमवलं. त्यानंतर टी२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताने साउथ आफ्रिकेवर विजय मिळवला आणि आता भारत तिसऱ्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वात Champions ट्रॉफी जिंकायला सज्ज झाला आहे.(Sports Update)

===============

हे देखील वाचा : Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरे यांचा नक्की मॅटर काय ?

===============

एकंदरीत सर्व format पाहिले, रोहितने आतापर्यंत १४१ सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. यामध्ये भारताचा १०२ वेळा विजय झाला आहे. तर ३३ वेळा पराभव झाला आहे. यामध्ये ५५ वनडेमध्ये ४१ वेळा विजयी ठरला आहे तर १२ वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टेस्टमध्ये त्याचा रेकॉर्ड तसा ५०-५० राहिला आहे. आजपर्यंत २४ टेस्टमध्ये भारत १२ सामन्यांमध्ये जिंकला आहे, तर ९ सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. टी२० पहायचं झालं तर ६२ सामन्यांमध्ये ४९ विजय तर १२ पराभव भारताने पत्करले आहेत. त्यामुळे रोहितचा कॅप्टन्सी रेकॉर्ड तसा उत्तमच राहिला आहे. (Rohit Sharma)

त्यामुळे ज्या रोहित शर्माची त्याच्या वजनावर आणि त्याच्या अंगकाठीवरून बॉडी शेमिंग करण्यात आली त्याने भारताला जागतिक स्तरावर इथपर्यंत पोहोचून दाखवलं आहे. वनडेमध्ये तीन-तीन डबल सेंच्युरी करण, हे साध काम नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत हिटमॅनच्या नेतृत्वात आणखी एक आयसीसी इव्हेंट जिंकेल का, याकडेच सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.