नासासह जगभरातील अंतराळ संशोधन संस्था आणि खगोल अभ्यासक एका लघुग्रहाच्या प्रवासानं चिंतेत सापडले आहेत. 2024 YR4 नावाचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं वाटचाल करीत आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. 2032 मध्ये पृथ्वी आणि 2024 YR4 लघुग्रहाची टक्कर होण्याची शक्यता आहे. यासाठी जगभरातील खगोलतज्ञ ही टक्कर कशाप्रकारे टाळता येईल, याचा प्रयत्न करु लागले आहेत. मात्र त्या अभ्यासातून आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पृथ्वीकडे झेपावणा-या या लघुग्रहाची आधी चंद्राशी टक्कर होण्याची शक्यता आहे. असे झाले तर मोठा विनाश होईल, अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञांना आहे. (NASA)
नासातर्फे लघुग्रहांचा अभ्यास आणि त्यांच्या वाटचालीवर कायम नजर ठेवली जाते. 27 डिसेंबर 2024 रोजी चिलीतील लघुग्रह स्थलीय-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टमच्या स्टेशनने एका महाकाय लघुग्रहाची नोंद केली. एका बहुमजली इमारतीच्या आकाराचा हा लघुग्रह त्यानंतर अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपल्या सौरमालेतून जाताना पाहिला. या लघुग्रहाचा प्रवास बघून सुरुवातीला खगोलशास्त्रज्ञ आश्चर्यचकीत झाले. हा लघुग्रह सुमारे 180 फूट म्हणजेच 50 मीटर रुंद आहे. याचा वेग आणि आकार बघून आश्चर्च झालेल्या या शास्त्रज्ञांना या लघुग्रहाची दिशा समजली आणि त्यांचा थरकाप झाला. कारण हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीवर मोठा विनाश होऊ शकतो. 1908 मध्ये सायबेरियातही अशीच एक घटना घडली होती. अशाच आकाराच्या लघुग्रहाची धडक होऊन तब्बल 8 कोटी वृक्षसंपदा जळून खाक झाली होती. (Latest News)
त्यामुळे शास्त्रज्ञ या लघुग्रहाच्या वेगचा अभ्यास करण्यात आला. या लघुग्रहाचे नाव 2024 YR4 ठेवले आहे. हा लघुग्रह 2032 मध्ये पृथ्वीवर आदळण्याची शक्यात 2.3 टक्के आहे. पण यापेक्षा अधिक धोका हा लघुग्रह 2024 YR4 आणि चंद्र यांच्या संभाव्य धडकेचा आहे. आता हा लघुग्रह पृथ्वीआधी चंद्रावर आदळणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. नवीन गणनेनुसार, 2024 YR4 चंद्राबरोबर धडकेची शक्यता 0.3 आहे. चंद्रावर टक्कर झाल्यास मोठा खड्डा आणि ढिगारा निर्माण होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 2024 YR4 हा लघुग्रह भारतातील काही भागावर आदळण्याची शक्यता आहे, लडाख आणि बर्फाच्या ठिकाणी 2024 YR4 आदळण्याची शक्यता नासानं व्यक्त केली आहे. ही टक्कर 2032 मध्ये होणार असून आत्तापासूनच जगभरातील अंतराळ संशोधन संस्था या लघुग्रहाची धडक पृथ्वीबरोबर कशी टाळता येईल, यावर काम करत आहेत. यासाठी चीनमध्येही एक तज्ञांची टिम तयार करण्यात आली असून 2024 YR4 प्रत्येक हालचालींवर हे अभ्यासक लक्ष ठेऊन आहेत. (NASA)
नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजची टिमही या लघुग्रहावर चोवीस तास लक्ष ठेवत आहे. यासाठी नासाची अतिशक्तिशाली अंतराळ दुर्बिणी, जेम्स वेब टेलिस्कोप वापरण्यात येत आहे. नासा, आपत्कालीन परिस्थिती असेल तरच या दुर्बिणीचा वापर करण्याची परवानगी देते. यावरुन या लघुग्रहानं शास्त्रज्ञांना किती चिंतीत केलं आहे, हे स्पष्ट होतं. 2024 YR4 लघुग्रह पृथ्वीआधी चंद्रावर आदळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास चंद्रावर मोठा खड्डा पडणार असून त्याचे पृथ्वीवरही परिणाम होणार आहेत. शास्त्रज्ञांच्या मते 2024 YR4 चंद्रावर आदळला तर काही अवशेष पृथ्वीवरही पडू शकतात. (Latest News)
या सर्व परिस्थितीवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवत असून अशी टक्कर झाल्यास काय करायचे यासाठी यावर चर्चा चालू आहे. 2024 YR4 हा पृथ्वीवरील समुद्र किंवा बर्फाळ भागात पडला तर त्यापासून कमी नुकसान होणार आहे. मात्र हा लघुग्रह लोकवस्तीच्या भागात पडला तर त्यामुळे मोठे नुकसान होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने 22 डिसेंबर 2032 ही तारीख पृथ्वी आणि 2024 YR4 या लघुग्रहाच्या टक्करीची तारीख असल्याचे सांगितले आहे. या स्पेश एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 2024 YR4 या दिवशी 97 टक्के सुरक्षितपणे जाण्याची शक्यता आहे. (NASA)
============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
============
मात्र उर्वरित दोन टक्के ही टक्कर होण्याची शक्यता आहे. ही शक्यता दोन टक्के असली तरी यातून पृथ्वीवर मोठा विनाश होण्यीची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. मुख्य म्हणजे, 2024 YR4 हा लघुग्रह दक्षिण आशियातील देशांवर आदळण्याची शक्यता आहे. त्यात भारत, पाकिस्तान आणि शेजारील अन्य देशांचा समावेश आहे. चीनलाही हा धोका असल्यानं चीननं लघुग्रहांपासून संरक्षण करण्यासाठी एक नवीन टीम तयार केली आहे. 2032 मध्ये पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता अचूकपणे टिपण्यासाठी चिनी शास्त्रज्ञ 2028 मध्ये पृथ्वीजवळून जाणा-या लघुग्रहाच्या जाण्याचा अभ्यास करणार आहेत. (Latest News)
सई बने