Home » Kitchen Tips भाजीत तेल जसे झाल्यास चिंता न करता करा ‘हे’ सोपे उपाय

Kitchen Tips भाजीत तेल जसे झाल्यास चिंता न करता करा ‘हे’ सोपे उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kitchen Tips
Share

आपण स्वयंपाक करताना नेहमीच आपला प्रयत्न असतो की, आपण बनवत असलेले जेवण चांगले आणि कुटुंबाला आवडेल असे असावे. मात्र कधी कधी आपण बरेच प्रयत्न करून देखील स्वयंपाकामधे काही तरी चुकते. कधी मीठ जास्त होते तर कधी तिखट मात्र या दोन गोष्टी जास्त झाल्या तर आपण काही उपाय करून ते थोडे फार प्रमाणात सांभाळून घेऊ शकतो. मात्र जर तेल जास्त झाले तर? (Marathi News)

कधी कधी आपला तेलाचा अंदाज चुकून तेल देखील जास्त पडते. अशा वेळेस जास्त तेल असलेले पदार्थ कसे खावे आणि खाऊ घालावे असा विचार प्रत्येक स्त्रीला येतो. कारण जास्त तेल खाल्ले की त्रास होणार. शिवाय जास्त तेल खाणे देखील आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. मग भाजीत जास्त झालेले तेल आपण कसे कमी करावे? (tips to remove extra oil from food ) चला तर मग या समस्येवर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स आणि उपाय सांगणार आहोत. (Kitchen Tips)

बर्फ
भाजीमध्ये झालेले अतिरिक्त तेल काढण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बर्फ. आपण एका मोठ्या खोलगट चमचा अथवा डावांमध्ये बर्फत घ्यायचा आणि हा चमचा भाजीमध्ये फिरवायचा. असे केल्याने जास्तीचे तेल चमच्याच्या खालच्या बाजूला जमा होईल. मग हळूच चमचा बाजूला करावा आणि जमा झालेले ते काढून टाकावे. जोपर्यंत तेल कमी हात नाही तोवर ही प्रक्रिया करावी. (Food Tips)

Kitchen Tips

ब्रेड
सगळ्याच्या घरात ब्रेड सहज उपलब्ध असतो. जेव्हा भाजी, आमटीमध्ये तेल जास्त होते तेव्हा ब्रेडची स्लाईस भाजी, आमटीमध्ये टाका. ब्रेड त्यातले तेल शोषून घेईल.

उकडलेले बटाटे
बटाटे तर प्रत्येकाच्या घरात असतातच. भाजीमध्ये तेल जास्त झाले की, बटाटे उकडून ते मॅश करावे आणि हलके भाजून किंवा परतून घ्यावे. त्यानंतर भाजीत टाकावे. यामुळे तेल कमी होईल आणि भाजीची चवही बदलणार नाही.

टोमॅटो प्युरी
भाजी पडलेले जास्तीच तेल काढण्यासाठी टोमॅटो प्युरी चांगला पर्याय आहे. यासाठी भाजीच्या वरचा तेलाचा तवंग जमेल तेवढा काढा आणि पॅनमध्ये टोमॅटो प्युरी भाजून भाजीत मिक्स करा. भाजी २ मिनिटं मंद गॅसवर उकळवा. यामुळे भाजीतील तेल लवकर कमी होईल.

===============

हे देखील वाचा : Garlic Benefits ‘या’ कारणांसाठी हिवाळ्यात लसूण खाणे आहे फायदेशीर

===============

कॉर्न फ्लॉवर
भाजीत असलेले अतिरिक्त तेल काढण्यासाठी त्यात कॉनफ्लॉवर टाकू शकता. यासाठी कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात पाणी टाकून गुढळ्या पडू न देता चांगले मिश्रण तयार करा. मग हे मिक्सचर मंद गॅसवर शिजवून घ्या. मग मिश्रण भाजीत मिक्स केले की अतिरिक्त तेल कमी होईल.

ब्लॉट पेपर
तळलेल्या वस्तूंच्या वर ब्लॉट पेपर ठेवून अतिरिक्त तेल काढता येते. भाजीतून तेल काढायचे असेल तर ब्लॉट पेपरचा बॉल बनवून त्यात टाकावा. जेव्हा ते अतिरिक्त तेल शोषून घेते तेव्हा चेंडू बाहेर काढून फेकून द्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.