माना कि तेरी दीद के क़ाबिल नहीं हूँ मैं
तू मेरा शौक़ देख मिरा इंतिज़ार देख…
भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांना उत्तर देताना पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी संसदेत अल्लामा इक्बाल यांचा म्हटलेला हा शेर यावेळी सुषमा स्वराज यांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होत. हा तो काळ होता, जेव्हा भारतात हेल्दी Politics चालायचं. मतभेद होते, मनभेद नव्हते. सरकार आणि विरोधी पक्ष काही बाबतीत जरी एकविचारी नसले, तरी देशहितासाठी मात्र ते एकत्र येत होते. असाच एक किस्सा तेव्हा घडला होता, जेव्हा भारताचे पंतप्रधान नरसिंह राव होते. यावेळी देशासाठी नरसिंह राव, मनमोहन सिंग आणि विरोधी पक्षात असलेले अटल बिहारी वाजपेयी एकत्र आले होते. चला तर जाणून घेऊया हा किस्सा नेमका काय होता ? (Manmohan Singh)
१९९१ ला चंद्र शेखर यांचं सरकार कोसळलं होत. त्यांनतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे देशाचं वातावरण गढूळ झालं होत. १९९१ ला निवडणुका झाल्या आणि पी व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) हे भारताचे पंतप्रधान झाले. पण यावेळी भारत आर्थिक दिवाळखोरीत होता. एकीकडे आखाती देशांमध्ये युद्ध सुरु होते, तर दुसरीकडे भारताकडे परकीय चलनाचा तुटवडा होता. म्हणजे जर परदेशातून कोणताही माल आणि इंधन मागवायचं झालं, तर भारताकडे ९-१० दिवस उरेल, इतकच परकीय चलन होत. (Marathi News)
त्यामुळेच ९०च्या दशकात भारत आर्थिक संकटात सापडला होता. कर्ज मिळण देखील मुश्कील, मग पुढच्या १० दिवसांनी देश चालवायचा तरी कसा ? असा प्रश्न तत्कालीन केंद्र सरकार आणि आरबीआय (RBI) समोर होता. परकीय चलनाची व्यवस्था झाली नाही, तर आपली आयात ठप्प होईल, अशी भीती सर्वांनाच होती. त्यामुळे हा आर्थिक पेच सोडवण फार गरजेचं होत. आणि यासाठी हवा होता एक अर्थतज्ञ ! नरसिंह राव यांनी निर्णय घेतला की, आपण राजकारणाच्या बाहेरील व्यक्तीलाच अर्थमंत्रीपदावर नेमलं पाहिजे. यानंतर त्यांची नजर पडली डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे ! (Manmohan Singh)
मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री बनणार हे निश्चित झालं होतं, पण त्यांना याची काडीचीही कल्पना नव्हती. आयएएस अधिकारी अलेक्झांडर हे हीच बातमी मनमोहन सिंग यांना द्यायला आले, तेव्हा ते गाढ झोपेत होते. संपूर्ण टीम घरी आली, त्यांना झोपेतून उठवलं आणि सांगितलं गेलं, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होणार आहात. हे सर्व किस्से अलेक्झांडर यांनी आपल्या ‘थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर‘ या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. (Marathi News)
डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. यावेळी पी.व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना विचारलं की, भारताच्या तिजोरीत आता किती पैसा उरला आहे? यावर मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलं की फारफार तरी नऊ दिवस यानंतर नरसिंह राव म्हणाले, कि याचा तोडगा कसा काढायचा ? मनमोहन सिंह म्हणाले, देशाच्या रुपयाचं मूल्य आपल्याला २० टक्क्यांनी पाडावं लागेल. यावर नरसिंह राव म्हणाले की, ठीक आहे मंत्रिमंडळ बैठक बोलावून या गोष्टीला मंजुरी मिळवून घ्या .(Manmohan Singh)
यावर मनमोहन सिंग म्हणाले की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपण हा कठीण निर्णय घेऊ शकणार नाही, कारण अनेक मंत्री आपापल्या वोट बँकचाही विचार करतील आणि याचा विरोध करतील. यावर नरसिंह राव म्हणाले, ठीक आहे मी बघतो यानंतर काही तासांनी मनमोहन सिंग यांना एक पत्र गेलं. ते पत्र होत, नरसिंह राव यांचच आणि त्यात लिहिलं होत कि काम झालं, आपण देशाच्या रुपयाचं मूल्य २० टक्क्यांनी पाडत आहोत. पण मनमोहन हे ऐकून हैराण झाले की, एवढ्या कमी वेळात हे काम शक्य कसं झालं ? (Marathi News)
तेव्हा नरसिंह राव म्हणाले, यासाठी मी अटल बिहारी वाजपेयी यांची मदत घेतली. नरसिंह राव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना फोन करून भारताच्या आर्थिक संकटाच्या सर्व गोष्टी सांगितल्या. यावर अटलजींनी आपण यावेळी विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सरकारच्या आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या पाठीशी आहोत, असं सांगितलं. तुम्ही रुपया पाडायचा निर्णय घ्या, विरोधी पक्ष याला कसलाही विरोध करणार नाही. तसेच संसदेतही यावेळी आपण देशहिताची बाजू मांडू जेणेकरून तुमचे मंत्रीमंडळदेखील ही बाजू समजून घेतील. (Manmohan Singh)
=======
हे देखील वाचा :
Manmohan Singh जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ – मनमोहनसिंग यांचा जीवन प्रवास
Paper Mache : काश्मिरच्या कलाकारांची कला जगभर
=======
या निर्णयानंतर भाजपाने देशभरात कसलाही विरोध केला नाही, आंदोलन केलं नाही. वाजपेयींचा शब्द पक्षात शेवटचा होता. म्हणजे विचार करा, देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी भाजपानेही कॉंग्रेस सरकारला समर्थन केलं होत. असं त्याकाळचं राजकारण होतं. यावेळी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सरकारला सोनसुद्धा गहाण ठेवण्यासाठी सांगितलं होत. त्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि भारत सरकारने गहाण ठेवलेलं सगळं सोन पुन्हा माघारी आणलं. आजच्या राजकारणात राग, द्वेष अगदी वैयक्तिक स्तरावर उफाळून बाहेर पडतो, पण तो काळ असा होता, जेव्हा विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार दोघे एकत्रितपणे देश सांभाळत होते. (Marathi News)