Home » माणसाने च्युइंगम चघळायला सुरुवात का केली ?

माणसाने च्युइंगम चघळायला सुरुवात का केली ?

by Team Gajawaja
0 comment
Chewing Gum
Share

चहाच्या दुकानांपासून ते किराणा दुकानापर्यंत, अॅक्ट्रेसेसपासून ते क्रिकेटर्सपर्यंत, आणि सगळेच जण अनेकदा हे चघळताना दिसतात. रवंत करणाऱ्या प्राण्यांसमान माणसाला बनवणारा हा पदार्थ म्हणजे च्युइंगम. च्युइंगम आता आपण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये खातो. पण सुरुवातीला फक्त तुम्हाला झाडावरून निघणार रबर कोणत्याही चवी शिवाय खायला दिलं असतं तर, आता तुम्ही नाही म्हणाल. पण तुमचा जन्म ९००० वर्षांपूर्वी झाला असता, तर तुमच्याकडे नाही म्हणण्याचा पर्याय नसता. कारण तेव्हा झाडावरून निघणार रबर च्युइंगम खालं जायचं. च्युइंगमचा इतिहास इतका जुना आहे. युद्धात सुद्धा च्युइंगमचा वापर झाला आहे. त्याबद्दलच जाणून घेऊया. च्युइंगम हा पदार्थ खूप आधुनिक वाटत असला तरी त्याची मुळं ९ हजार वर्षांपूर्वी आढळतात. ९ हजार वर्षांपूर्वी युरोपमधील लोक बर्चच्या झाडाचं साल चघळायचे असं पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनातून समोर आलं आहे. दात दु:खीच्या समस्या दूर करण्यासाठी ते झाडाचं साल चघळत असत. माया सभ्यतेतील लोक चिकूच्या झाडामधून निघणारा रबरासारखा एक पदार्थ चिकल चघळायचे, आणि ते हे चिकल दात दु:खीसाठी न खाता. लांंबच्या प्रवासादरम्यान भूक किंवा तहान लागल्यावर ते हे चिकल चघळत असत. (Chewing Gum)

माय सभ्यतेतील लोक जसं तहान किंवा भूक शांत करण्यासाठी चिकल चघळत होते, तसंच अझटेक्स संस्कृतीतील लोकही चिकलचा वापर करत होते. ते चघळण्याचे नियम सुद्धा त्यांनी बनवले होते. जसं फक्त मुलं किंवा अविवाहित महिला सार्वजनिक ठिकाणी चिकल चघळू शकतात. विवाहित महिलांना आणि विधवांना चिकल खासगीपणे चघळण्याची परवानगी होती, तर पुरुषांना सुद्धा ते खाजगीपणे चघळण्याची परवानगी होती. दातांच्या स्वच्छतेसाठीच अझटेक्स संस्कृतीतील लोकं चिकल चघळायचे. पण हे नियम त्यांनी का बनवले, त्याचं कारण आपल्याला माहीती नाही. ग्रीसमध्ये सुद्धा आताच्या च्युइंगमची मुळं सापडतात. ते Mastic झाडातून निघणारा पदार्थ च्युइंगमसारखा चघळत असत. उत्तर अमेरिकेतील प्राचीन लोक सुद्धा स्प्रूस झाडाच्या रेजिनचा चघळण्यासाठी वापर करत होते. नंतर, जेव्हा अमेरिकेत युरोपीयन वसाहाती स्थापन झाल्या, तेव्हा त्यांनी सुद्धा याचं अनुसरण केलं. (Social News)

म्हणजे, प्राचीन काळापासूनच च्युइंगम सारखाच पदार्थ माणसं खात होती. पण आता आपण जे च्युइंगम खातो, त्याचा शोध लागला कसा? तर अमेरिकेत १८४८ मध्ये जॉन कर्टिस या व्यापऱ्याने पहिलं च्युइंगम तयार केलं, असं आपण म्हणून शकतो. त्याने स्प्रूस झाडाच्या रेजिनला पाण्यात उकडून त्याचे पातळ तुकडे केले आणि त्यावर कॉर्न स्टार्च लावून ते तुकडे त्याने कागदात पॅकिंग करून विकायला सुरुवात केली. कर्टिसला त्याच्या या प्रॉडक्टवर इतका विश्वास होता की त्याने लवकरच एक फॅक्ट्री सुरू केली, पण त्याचा हा प्रयोग फसला. कर्टिसने तयार केलेलं च्युइंगम चवीला खूप खराब होतं, आणि ते थोडं चघळल्यानंतर लगेच कडक होत होतं. त्यामुळे कोणीही ते जास्त वेळ चघळू शकत नव्हतं. मग पुढे, न्यूयॉर्कमधील एक शोधक, थॉमस ॲडम्सने चिकूच्या झाडा पासून निघणाऱ्या चिकल वर प्रयोग करण्यास सुरुवात केली. खरंतर हा प्रयोग चिकलला रबरचा पर्याय तयार करण्यासाठी केला जातं होता. पण हा प्रयोग हवा तसा परिणाम दाखवत नव्हता. ॲडम्सला एक आयडिया आली की रबरचा पर्याय तयार करण्याऐवजी, तो चिकलचा उपयोग चांगल्या प्रकारचं च्युइंगम गम तयार करण्यासाठी करू शकतो. आणि याच विचारामुळे आपण खातो त्या च्युइंगमचा शोध लागला. हे च्युइंगम चवदार नव्हतं, पण चावल्यावर ते तुटत नव्हतं आणि जास्त काळ मऊ राहत होतं. म्हणून हळूहळू त्याचं हे च्युइंगम लोकप्रिय होऊ लागलं. (Chewing Gum)

======

हे देखील वाचा : नियमित हिरवे टोमॅटो खाल्ल्यास होतात ‘हे’ फायदे

====

मग एडम्सने विचार केला की, या च्युइंगममध्ये फ्लेवर घातले तर, आणि १८७१ मध्ये च्युइंगममध्ये फ्लेवर घालण्याचा प्रयोग सुद्धा यशस्वी झाला. वेगवेगळ्या फळांच्या फ्लेवरमध्ये आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये सुद्धा त्याने च्युइंगम लॉंच केले. बघता बघता त्याचं हे च्युइंगम संपूर्ण अमेरिकेत लोकप्रिय झालं. सुरुवातीला फक्त तरुण मुलं आणि पुरुष हे च्युइंगम खात होती. पण लवकरच महिलांमध्येही त्याचा वापर वाढला. नंतर तर अनेक च्युइंगमचं उत्पादन घेण्याची स्पर्धा सुरू झाली, अनेक कंपन्यांनी आपले ब्रँड बाजारात आणले. आज जगभरात च्युइंगम हा पदार्थ लोकप्रिय आहे. काही देशात तर तो इतका लोकप्रिय झाला की त्या देशातच्युइंगमवर बंदी घालावी लागली. १९९२ मध्ये सिंगापूरमध्ये च्युइंगमवर बंदी घालण्यात आली होती. कारण लोक ते कुठेही टाकून देत होते. आजही सिंगापूरमध्ये च्युइंगमवर बंदी कायम आहे. तर ब्रिटनमध्ये २०२२ मध्ये च्युइंगमच्या सफाईसाठी एक च्युइंगम टास्क फोर्स तयार करण्यात आली, जे लोकांना रस्त्यावर च्युइंगम टाकून देण्यापासून रोखत होते. कारण प्रत्येक वर्षी च्युइंगम साफ करण्यासाठी ब्रिटनला ७० करोड रुपये खर्च येत होता. २००९ साली, हमासाने इजरायलवर आरोप केला की इजरायल गाझा पट्ट्यात च्युइंगम पाठवत आहे, ज्यात सेक्स पावर वाढवणारे घटक आहेत. ज्यामुळे गाझातल्या तरूणांच लक्ष विचलित होतं आहे. झाडाची साल खाण्यापासून त्या झाडच्या सालीतून निघणाऱ्या द्रवापासून माणसाला रवंत करण्यासाठी माणसाने एक गोष्ट बनवली च्युइंगम. च्युइंगम खरंतर मानवाच्या सर्वात महत्त्वाच्या तर नाही, पण सर्वात चांगल्या अविष्कारांपैकी एक आहे. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.