ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्याच्या राजकारणात एक वाक्य परवलीचे बनले होते बंद दाराआडची चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे तेव्हा अध्यक्ष असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याशी बंद दाराआड चर्चा केली. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन त्यांनी आपल्याला दिले होते, असा दावा तेव्हा एकसंध असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. आपल्या या दाव्याचा आधार घेऊन त्यांनी भाजपशी असलेली युती मोडीत काढली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. तेव्हापासून बंद दाराआड अशी चर्चा झाली का नाही, यावर दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. बंद दाराआड म्हटल्यामुळे त्यासाठी पुरावा असण्याची काही शक्यता नव्हतीच. परंतु भाजपच्या जवळजवळ सर्व नेत्यांनी अशी काही चर्चा झाल्याचे स्पष्ट नाकारले आहे. बंद दाराआड झालेली चर्चा या कल्पनेवर स्वतः शिवसेना नेत्यांपासून शरद पवार, काँग्रेस नेते, भाजप नेते आणि अगदी राज ठाकरे यांनीही बोलून झाले आहे. त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर काय झाले, यावर अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि भांडाफोड अजूनही होत आहेत. त्यातच आता अजित पवारांनी २०१९ च्या सत्तांतराआधी अदानी आणि अमित शहांसोबत झालेल्या बैठकी बद्दल गौफ्यस्फोट केला आहे. काय आहे हा गौफ्यस्फोट जाणून घेऊया. (Gautam Adani)
आता पाच वर्षांत महाराष्ट्रातील विविध पुलांखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बंद दाराआड झालेली चर्चा या कल्पनेवर स्वतः शिवसेना नेत्यांपासून शरद पवार, काँग्रेस नेते, भाजप नेते आणि अगदी राज ठाकरे यांनीही बोलून झाले आहे. त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर काय झाले, यावर अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि भांडाफोड अजूनही होत आहेत. राज्याच्या साठ वर्षांच्या राजकारणात जेवढ्या सुरस घटना घडल्या नसतील, तेवढ्या त्या चार-सहा महिन्यांत घडल्या की काय असे वाटू लागले , इतके किस्से या संबंधात बाहेर पडत आहेत. आता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलेला गौप्यस्फोट हा त्या मालिकेतील सर्वात नवा भाग होय. महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत नोव्हेंबर 2019 मध्ये नवी दिल्लीत उद्योगपती गौतम अदानी यांनी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला शरद पवार हे उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला. “या बैठकीला पाच वर्षे झाली. ही बैठक कुठे झाली ते सर्वांना माहीत आहे. दिल्लीत एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली, एक नाही तर पाच बैठका झाल्या. त्यात अमित शहा होते, गौतम अदानी होते, अजित पवार होते, पवार साहेब होते, सर्वजण होते सर्व काही निश्चित झाले होते,” असे अजित पवार म्हणाले. (Political News)
त्यामुळे राज्याच्या राजकारणात परत खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्यावर प्रतिक्रिया येणेही स्वाभाविक होते. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कथित बैठकीत उद्योगपती गौतम अदानी उपस्थित नव्हते, मात्र शरद पवार होते. नंतर त्यांनी आमचा विश्वासघात केला, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. “ही बैठक झाली, पण ती अदानी यांच्या निवासस्थानी नव्हती किंवा ते उपस्थित नव्हते. माझ्याशिवाय, या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार उपस्थित होते,” असे फडणवीस म्हणाले. इतकेच नाही तर “सरकारची स्थापना, खात्यांचे वाटप आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती यावर या बैठकीत मॅरेथॉन चर्चा झाली. योजना राबविण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर सोपवण्यात आली होती. योजना अमलात येण्याच्या प्रक्रियेत असतानाच शरद पवारांनी गुपचूप माघार घेतली. पवार अशा पद्धतीने माघार घेतील, असे आम्हाला वाटले नव्हते,” असेही फडणवीस म्हणाले. (Gautam Adani)
फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शरद पवार यांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. कोणत्याही मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये एकमत होण्याची ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. अर्थात त्यात शरद पवार यांनी तपशीलामध्ये थोडा फरक केला आहे. फडणवीस यांच्याप्रमाणेच, या बैठकीत अदानी यांनी भाग घेतला नाही हे पवारांनी मान्य केले आहे. या बैठकीला ते स्वतः तसेच अमित शहा आणि अजित पवार होते हेही त्यांनी मान्य केले आहे. परंतु फडणवीस म्हणतात की ही बैठक त्रयस्थ ठिकाणी झाली, तर पवार म्हणतात की गौतम आदानी हेच या बैठकीचे यजमान होते. दि न्यूज मिनिट- न्यूज लॉन्ड्री या संकेतस्थळांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी या बैठकीची कबुली दिली आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला सांगितले, की आपण भाजपसोबत गेलो तर त्यांच्याविरुद्ध सुरू असलेले खटले मागे घेण्यात येतील. मी त्याला तयार नव्हतो कारण भाजप दिलेला शब्द पाळेल, यावर माझा विश्वास नव्हता. मात्र आपण खुद्द अमित शहांकडूनच शहानिशा करून घेऊया, असे त्यांनी सांगितल्यावर अदानींच्या निवासस्थानी भोजनाला आपण उपस्थित राहिलो. अमित शहा त्यावेळी उपस्थित होते, असे शरद पवारांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. (Political News)
खरंतर अजित दादांनी केलेल्या या दाव्यामध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गौतम अदानी यांच्याशी जवळीक असल्याचं आरोप काँग्रेस सातत्याने करत आली आहे. राहुल गांधी यांनी गेली दहा वर्षे तो एकमेव मुद्दा कायम ठेवला आहे. अगदी राज्यात हे राजकारण पेटलेले असताना राहुल गांधी तिकडे नांदेडमध्ये अदानी यांच्यावरूनच सरकारला लक्ष्य करत होते. या सरकारने धारावी अदानींना आंदण दिली आहे, असा आरोप करत होते. इतकेच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही, अजितदादांच्या या दाव्यामुळे भाजपाने अदानी किती जवळ आहेत, हे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी सत्तेचा सौदा करत असताना शरद पवार अदानींच्या मार्फत भाजपच्या जवळ का जात होते याबाबत त्यांनी मौन पाळले आहे. (Gautam Adani)
सांगायचा मुद्दा हा, की काँग्रेसला अदानींचे वावडे, खरे तर काँग्रेसलाही त्यांचे वावडे नाही कारण राजस्थान आणि तेलंगणातील काँग्रेस सरकारांनी अदानींशीच व्यवहार केले आहेच. असं असलं तरी शरद पवारांचे त्यांच्याशी कधीही असमाधानी नव्हते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या केवळ एक महिना आधी, जून 2022 मध्ये, गौतम अदानी यांनी बारामतीचा दौरा केला होता. त्यावेळी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्वतः त्यांच्या गाडीचे सारथ्य केले होते, ही गोष्ट ताजी आहे. महाविकास आघाडी गेल्यानंतरही शरद पवार यांनी सातत्याने अदानी यांची पाठराखण केली आहे. एवढे कशाला, अजित पवारांनी बंड केल्यानंतर केवळ दोन महिन्यांच्या आत सप्टेंबर 2023 मध्ये शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत. विशेष म्हणजे ही भेट गुजरातमध्ये अहमदाबाद येथे झाली, अशी चर्चा होती . त्यातही गंमत म्हणजे अमित शहा त्यावेळी गुजरातमध्ये आणि अहमदाबाद येथे होते. त्यामुळे या तिघांमध्ये परत काही खिचडी शिजत आहे का, यावर अनेक दिवस कयास लावले जात होते. (Political News)
======
हे देखील वाचा : तालिबानचा नवा चेहरा !
====
या सर्व प्रकरणात खरी गोची झाली ती उद्धव ठाकरे यांची. अजित पवार यांनी केलेला दावा खरा असेल, आणि ज्या अर्थी फडणवीस व शरद पवार यांनी त्यावर जवळजवळ सहमती दर्शविली आहे त्याअर्थी तो नक्कीच खरा आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की नोव्हेंबर 2019 मध्ये शरद पवारांनी एकीकडे शिवसेना-भाजप युतीत बिब्बा घालून ती फोडली आणि दुसरीकडे स्वतः भाजपशी सरकार स्थापनेची चर्चा करत होते. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भरवशावर भाजपशी युतीला लाथ मारली, काँग्रेसच्या आग्रहाखातर हिंदुत्व सोडून सेक्युलरिझमचा अंगीकार केला आणि स्वतःचे राजकीय धर्मांतर केले. यातून त्यांच्या हाती काय आले तर पक्षातील फुट आणि राजकीय विजनवास. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अस्तित्वासाठी लढत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची दावेदारी काँग्रेस आणि शरद पवार दोघांनीही खुबीने खोडून काढली आहे. ऐंशीच्या दशकानंतर, म्हणजे शिवसेना मुंबई सोडून महाराष्ट्रात पसरली तेव्हापासून, सर्वात कमी जागा लढविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या नव्या मित्रपक्षांचीही मदत त्यांना मिळत नाही. या सर्व परिस्थितीत आपण पुरते फसविले गेलो, याची जाणीव त्यांना आता होत असणार. शरद पवार यांच्या राजकीय चक्रव्यूहामध्ये ते खऱ्या अर्थाने अडाणी ठरले आहेत. (Gautam Adani)