Home » जाणून घ्या दिवाळीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

जाणून घ्या दिवाळीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali 2024
Share

नवरात्र सुरु झाले की, वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळीच्या दिवसात उत्साह, जल्लोष सळसळून वाहत असतो. पाच दिवसाच्या दिवाळीची सुरुवात आजपासून होत आहे. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. आज गाय वासरूची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. आणि दिवाळीची सुरुवात होते. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला एक खास महत्व आहे. प्रत्येक दिवसाची एक विशेषतः आहे.

कार्तिक महिन्यातील त्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला मुख्य दिवाळी असते. तो दिवस लक्ष्मीपूजेचा असतो. वसुबारस ते भाऊबीज असा दिवाळीचा जल्लोष केला जातो. दिवाळीचा पाच दिवसाचा सण असला तरी त्याची तयारी महिना दीड महिना आधीपासूनच सुरु असते. घराची साफ सफाई करण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत सर्वच गोष्टी प्रत्येक जणं अगदी आनंदाने आणि प्रेमाने करत असतात. दरवर्षी आपण मोठया आनंदाने दिवाळीचा सण साजरा करत असतो. मात्र हा सण साजरा करण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कारणं आहेत. ती कोणती ते जाणून घेऊया.

* राक्षसांना मारण्यासाठी मातेने महाकालीचे रूप धारण केले. राक्षसांना मारूनही जेव्हा महाकालीचा राग शांत झाला नाही तेव्हा भगवान शिव स्वतः तिच्या पाया पडले. भगवान शंकराच्या शरीराला स्पर्श केल्याने देवी महाकालीचा कोप संपला. याच्या स्मरणार्थ तिच्या शांतीरुपी लक्ष्मीची पूजा सुरू झाली. या रात्री काली तिची उग्र रूपात पूजा करण्याची परंपरा आहे.

* मुघल राजवटीचा शेवटचा सम्राट बहादूर शाह जफर याने दिवाळी हा सण म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

Diwali 2024

* शाह आलम II च्या काळात, संपूर्ण राजवाडा दिव्यांनी सजविला ​​गेला होता आणि लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघेही सहभागी होत असत.

* पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ यांचा जन्म आणि मृत्यू दिवाळीच्याच दिवशी झाला. दिवाळीच्या दिवशी गंगेच्या तीरावर स्नान करताना ‘ओम’ म्हणत त्यांनी समाधी घेतली.

* महर्षी दयानंद यांचे दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ निधन झाले, ते भारतीय संस्कृतीचे महान लोकनेते बनले. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

* दीन-ए-इलाहीचा प्रवर्तक मुघल सम्राट अकबराच्या काळात दिवाळीच्या दिवशी दौलतखान्यासमोर 40 यार्ड उंच बांबूवर एक मोठा आकाशदिवा टांगण्यात आला होता. सम्राट जहांगीरनेही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली.

* सम्राट विक्रमादित्यचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला. त्यामुळे दिवे लावून आनंद साजरा करण्यात आला.

* इ.स.पूर्व चौथ्या शतकात लिहिलेल्या कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येला मंदिरे आणि नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात होते.

* पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ यांचा जन्म आणि मृत्यू दिवाळीच्याच दिवशी झाला. दिवाळीच्या दिवशी गंगेच्या तीरावर स्नान करताना ‘ओम’ म्हणत त्यांनी समाधी घेतली.

* महर्षी दयानंद यांचे दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ निधन झाले, ते भारतीय संस्कृतीचे महान लोकनेते बनले. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

* दीन-ए-इलाहीचा प्रवर्तक मुघल सम्राट अकबराच्या काळात दिवाळीच्या दिवशी दौलतखान्यासमोर 40 यार्ड उंच बांबूवर एक मोठा आकाशदिवा टांगण्यात आला होता. सम्राट जहांगीरनेही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली.

========

हे देखील वाचा : वसुबारस पूजा विधी आणि कथा

========

* सम्राट विक्रमादित्यचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला. त्यामुळे दिवे लावून आनंद साजरा करण्यात आला.

* गौतम बुद्धांच्या अनुयायांनी २५०० वर्षांपूर्वी त्यांच्या स्वागतासाठी लक्ष लक्ष दिवे लावून रोषणाई केली होती.

* इ. स. १५७७ रोजी अमृतसरमधील सुवर्णमंदीराचा शिलान्यास दिवाळीतच झाला होता.

* दिवाळीतील पाडव्याला गुजराती लोकांचे आणि नेपाळी लोकांचे नवीनवर्ष सुरु होते.

* गुप्तवंशीय राजा चंद्रगुप्त विक्रमादित्यने ‘विक्रम संवत’ स्थापन केले. धर्म, गणित, ज्योतिष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विक्रम संवत्सराचा मुहूर्त काढला होता.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.