Home » फटाके म्हणजे चायना ?

फटाके म्हणजे चायना ?

by Team Gajawaja
0 comment
History Of Fire Crackers
Share

भारतात जवळ जवळ सगळेच जण दिवाळीची वाट पाहत असतात. त्यातील अर्धेजण दिवाळीची सुट्टी मिळेल म्हणून वाट पाहत असतात, तर अर्धे दिवाळीत बोनस मिळेल म्हणून. त्यात फक्त फराळ घाण्यासाठी सुद्धा काहीजण दिवाळीची वाट पाहत असतील. आता दिवाळी म्हणजे आनंदी आनंद कडे आणि तेही चोहीकडे असा सण आहे. त्याची वाट सर्व जण पाहणारच. दिवाळी म्हटलं की अजून एक गोष्ट आकर्षणाचा केंद्रबिंदु असते, ती म्हणजे फटाके. फटाके फोडणं हे घातक आहे. काही राज्यांनी त्यावर बंदी घातली आहे, तर काही राज्यांमध्ये विशिष्ट वेळेतच फटाके फोडले जावे असे नियम आहेत. प्रत्येक फटक्यांचा फुटण्याचा आवाज वेगळा, आणि फुटल्यानंतर निघणारी रंगीबेरंगी आग वेगळी. त्यामुळे प्रश्न पडतो की, फटाके सर्वात पहिले तयार कसे केले असतील. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. (History Of Fire Crackers)

आता अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, फटाक्यांची सुरुवात ही एका दुर्घटनेने झाली, आणि तेही प्राचीन काळात चीनच्या लिऊयांग या शहरात. एका आचाऱ्याकडून जेवण बनवताना चुकून पोटॅशिअम नायट्रेट आगीत पडलं. त्यामुळे त्यातून रंगीबिरंगी ज्वाळा निघाल्या.त्यानंतर त्यानं कोळसा, सल्फर आणि पोटॅशिअम नायट्रेटची पूड तयार करून ती आगीत टाकली, त्यामुळे जोरदार स्फोटासारखा आवाज झाला पण यावेळी रंगीबिरंगी ज्वाळा निघाल्या नाहीत. ही घटना म्हणजे फटाके निर्मितीची पहिली सुरुवात होती, असं बोललं जात.
अशीही एक प्रसिद्ध कथा आहे की, इसवी सन ६०० च्या सुरुवातीच्या काळात कधीतरी एका चिनी रसायनतज्ञाने पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि चारकोल याची पावडर करून काळ्या रंगाची एक पूड तयार केली. ही पूड म्हणजेच गनपावडर, जिला आपण दारू म्हणजे बारूद म्हणतो. या गनपावडरचा सूर्याच्या उष्णतेमुळे स्फोट झाला. त्यांनंतर ही पावडर पोकळ केलेल्या बांबूच्या काड्यांमध्ये आणि नंतर कडक कागदाच्या बनवलेल्या नळ्यांमध्ये ओतली आणि फटाक्यांचा शोध लागला. (National News)

फटाक्यांसाठी चिनी लोकांनी बांबू वापरले, त्याच कारण म्हणजे पूर्वी चिनी लोकं बांबू आगीत टाकत. तापल्यानंतर ते फुटत असत. या आवाजामुळे नकारात्मक विचार, वाईट आत्मा दूर जाऊन सुख- शांती लाभते असं चिनी लोक मानत होते. म्हणूनच फटाक्यांचा वापर मग सणासुदीच्या काळात, आनंदप्रसंगी, विवाहवेळी सुद्धा होऊ लागला. १३ व्या शतकात फटाके बनवण्याची कला आणि फटाके हे चीनमधून युरोपमध्ये पोहचले. १५ व्या शतकापर्यंत फटाके धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक मनोरंजनासाठी मोठया प्रमाणात वापरले जात होते. युरोपमध्ये फटाके निर्माण करण्याच श्रेय इटालियन लोकांना जात. युरोपीय शासक खासकरून त्यांच्या महत्त्वाच्या प्रसंगांना त्यांच्या महाल आणि किल्ल्यांना उजळविण्यासाठी फटाक्यांचा वापर करत. (History Of Fire Crackers)

पण भारतातसुद्धा फटाक्यांचा उल्लेख हा फार पूर्वी केल्याचा आढळतो. संत कवी एकनाथ यांनी १५७० मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकातील कवितेत महाभारत कालखंडात रुक्मिणी आणि भगवान श्री कृष्णाच्या विवाहवेळी फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा उल्लेख आहे. त्याशिवाय एकनाथ महाराजांच्या १५०० वर्ष आधी लिहिलेल्या सुक्रनिती या ग्रंथात गनपाउडर, गन आणि तोफांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये गनला नलिका अस्त्र, तोफेला बृहद नलिका आणि तोफेत टाकण्यात येणाऱ्या गोळ्याला बृहद गोलम म्हटलं आहे. म्हणजे भारतात त्याकाळी फटाके असण्या नसण्याचे पुरावे नसतील तरी भारतात त्याकाळी गनपाउडर आणि दारू गोळा असण्याचे पुरावे आहेत. (National News)

जेव्हा चीनमध्ये १० व्या 12 व्या शतकात अग्निशस्त्रांचा म्हणजे दारू गोळ्यांच्या टेक्नॉलजीचा विकास झाला. त्यानंतर १२ व्या ते १४ व्या शतकात मंगोल साम्राज्याच्या काळात, दारू गोळ्यांच्या बाबतीत चीन आणखी प्रगत झालं. दिल्ली सुलतानतेच्या मंगोलांशी असलेल्या संबंधामुळे चिनी आतिशबाजी तंत्र भारतात सुद्धा पोहचलं. भारतात फटाक्यांचा पहिला वापर झाल्याचा उल्लेख हा १४४३ मध्ये दिसून येतो. विजयनगर साम्राज्याच्या दरबारातील राजदूत, याने त्याकाळच्या महानवमीच्या उत्सवात केलेल्या आतिशबाजी चा उल्लेख केला आहे. मग भारतात सुद्धा सणा संमारंभाला फटाक्यांचा वापर होऊ लागला. (History Of Fire Crackers)

======

हे देखील वाचा :  प्रगत देशात मतदान कसे होते ?

======

आज भारत हा चीननंतर सर्वाधिक फटाके निर्माण करणारा देश आहे. तमिळनाडूच्या शिवकाशी शहराला भारताच्या फटाक्यांची राजधानी म्हणतात. या शहरात फटाके तयार करण्याच्या जवळ जवळ ८००० छोट्या मोठ्या फॅक्टरीज आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आपण दिवाळीत फटाके का फोडतो. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. फटाके हे विजयाचं प्रतीक आहे असं मानलं जातं. त्याशिवाय, फटाके हे आनंद व्यक्त करण्याचं एक साधन आहे. म्हणूनच आपण दिवाळीला पूर्वी पासून फटाके फोडतो. फटाके दिवाळीच्या सणात महत्त्वाची भूमिका निभावत असले तरी, त्यांचा पर्यावरणीय आणि आरोग्यावर होणारा प्रभाव याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. बाकी तुम्हा सर्वांना गाजावाजातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. (National News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.