Home » बाबो हिजबुल्लाचा खजाना पाहून सर्वांचे डोळे दिपले

बाबो हिजबुल्लाचा खजाना पाहून सर्वांचे डोळे दिपले

by Team Gajawaja
0 comment
Baru Hizbullah
Share

इस्रायलने आपला मोर्चा हिजबुल्ला या संघटनेकडे वळवला आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह ज्या बंकरमध्ये मारला गेला, त्याच बंकरमध्ये इस्रायलचा खजिना मिळाला आहे. यात डॉलर आणि अगणित सोनं आहे. हा खजिना बघून सर्वांचेच डोळे टिपले आहेत. हिजबुल्ला या पैशांचा आपल्या संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी वापर करत होता. बेरूतमध्ये हिजबुल्लाहचा हा गुप्त खजिना सापडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. बेरुतमधील एका हॉस्पिटलखाली असणा-या गुप्त भुयारामध्ये हा खजिना ठेवण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ इस्रायली सैन्यानं जाहीर केला आहे. आयडीएफनुसार हिजबुल्लानं लाखो डॉलर्स आणि सोनं ठेवले होत. हिजबुल्लावर चोहोबाजुनी हल्ला करणा-या इस्रायलनं आता त्यांची आर्थिक नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे. त्यातच एवढा मोठा खजिना मिळाल्यामुळे हिजबुल्लाला मोठा फटका बसला आहे. (Baru Hizbullah)

इस्त्रायलनं आता हिजबुल्लाच्या आर्थिक मालमत्तेला लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी अल-कर्द अल-हसन इस्रायलचे लक्ष आहे. 1983 मध्ये अल-कर्द अल-हसनची स्थापना झाली. ही धर्मदाय संस्था आहे, स्थानिक भाषेत त्याचा अर्थ धर्मदाय कर्ज असा होतो. लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्ला या अल-कर्द अल-हसन मार्फत मोठा आर्थिक व्यवहार करत असे. त्यातूनच इस्त्रायलनसंघटनेवर हल्ले तीव्र केले. याच हल्ल्यात आयडीएफने हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहच्या बंकरमध्ये रोख आणि सोन्याचा साठा सापडल्याचा दावा केला आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमधील हॉस्पिटलखाली हिजबुल्लाह बंकर आहे. तिथे 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि रोख रक्कम मिळाली आहे. (International News)

हा गुप्त बंकर बेरूतच्या मध्यभागी अल साहेल हॉस्पिटलच्या खाली आहे. हसन नसराल्लाह याच बंकरमध्ये रहात होता. एवढा पैसा साठवून हिजबुल्ला आपली संघटना पुन्हा नव्यानं उभी करण्यासाठी त्याचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय रुपयांमध्ये या सोन्याची किंमत सुमारे 4194,50,25,000 रुपये आहे. यातील बरेचसे डॉलर्स आता मातीमोल झाले आहेत. कारण इस्रायली सैन्यानं त्यावर बॉम्बचा मारा केला आहे. पण या बंकरमध्ये असलेल्या साठ्याबाबत इस्रायली सैन्यही साशंक आहे. कारण यापेक्षा अधिक सोनं या भागात असल्याची माहिती इस्रायलकडे आहे. याशिवाय इस्रायली सैन्यानं आणखी एका बंकरमधील डॉलर्स आणि सोनंही ताब्यात घेतले आहे. हा पैसा लेबनॉनच्या पुनर्बांधणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हिजबुल्ला संबंधित या सर्व खजिन्यांचा हिशोब अल-कर्द अल-हसन तर्फे ठेवण्यात येत होता. अल-कर्द अल-हसन, जरी धर्मादाय म्हणून नोंदणीकृत असली तरी, हिजबुल्लाला पैशाची मदत करण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते. (Baru Hizbullah)

अल-कर्द अल-हसनच्या माध्यमातून हे लाखों डॉलर्स आणि सोने साठवण्यात आले होते. अल-कर्द अल-हसन 1980 च्या दशकापासून लेबनॉनमध्ये कार्यरत आहे. लेबनीज नागरिकांना सोन्याच्या साठ्यावर कर्ज देण्यात येत असे. शिवाय या संसंथेच्या मार्फत सीरियातून रोख हस्तांतरण आणि इराणमार्गे लेबनॉनमध्ये सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचा संशय आहे. लेबनॉनच्या शिया नागरिकांना या संस्थेने मोठं कर्ज दिलं आहे. विशेषत: हिजबुल्लाशी संलग्न असलेल्यांना व्याजमुक्त कर्ज देणे हे या संस्थेचे मोठे काम होते. अल-कर्द अल-हसनच्या लेबनॉनमध्ये 30 शाखा होत्या. त्यापैकी बऱ्याच शाखा बेरूतच्या हिजबुल्लाह-नियंत्रित भागात होत्या. लेबनॉनमध्ये बॅंकीग व्यवस्था चांगली होती. (International News)

======

हे देखील वाचा :  क्रूर लष्करी हुकूमशहा, खुनी ते राष्ट्रपती !

======

अनेक अरब राष्ट्रांचा पैसा लेबनॉनमध्ये ठेवण्यात येत असे. मात्र 2019 मध्ये लेबनॉनच्या आर्थिक पतनानंतर अल-कर्द अल-हसन चे वर्चस्व वाढले. हे वर्चस्व एवढे वाढले की हेजबुल्लाची आर्थिक शाखा म्हणून अल-कर्द अल-हसन काम करु लागली. लेनबीज शिया नागरिक बॅंकांऐवजी अल-कर्द अल-हसनवर कर्जासाठी अवलंबून राहिले. अगदी लग्न, शिक्षण किंवा लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देणारी ही संस्था होती. हिच सर्व यंत्रणा आता इस्त्रायली सैन्यानं नष्ट करायला सुरुवात केली आहे. बंकरमध्ये मिळालेल्या डॉलर्स आणि सोन्याचा वापर लेबनानमधील कामांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सैन्यानं सांगितलं आहे. (Baru Hizbullah)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.