बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार जाऊन आता बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकार आले आहे. मात्र शेख हसीना यांचे सरकार का आणि कसे पडले याचे एकएक धागे आता कुठे उलगडायला लागले आहेत. यात दोन नावं पुढे आली आहेत, ती म्हणजे सेंट मार्टिन बेट आणि डोनाल्ड लू. ही दोन्ही नावं अमेरिकेच्या जवळची आहेत. सेंट मार्टिन बेट हे बांगलादेशचा एक भाग आहे. या बेटाचा ताबा अमेरिकेनं आपल्या लष्करी तळासाठी मागितला होता. मात्र शेख हसीना यांनी अमेरिकेची ही मागणी फेटाळून लावली. कारण अमेरिका त्या बेटावर लष्करा तळ ठेऊन फक्त चीनच नाही तर आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करु इच्छित होता. आणि दुसरे नाव म्हणजे अमेरिकन राजनैतिक अधिकारी डोनाल्ड लू. डोनाल्डू लू हे राजनैतिक वर्तुळात कुठल्याही देशाची सत्ता बदलण्यात मास्टरमाईंड म्हणून ओळखले जातात. या दोघांमुळेच शेख हसीना यांची सत्ता गेल्याचा आरोप आता होत आहे. (Bangladesh Politics)
बांगलादेशातील शेख हसीना यांची १५ वर्षाची सत्ता काही मिनिटात संपुष्ठात आली. शेख हसीना यांना त्यांच्या मागे चालू असलेल्या राजकारणाचा पत्ताच लागला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याची चर्चा आहे. मात्र हे राजकारण खेळण्यात अमेरिकेचा पुढाकार असल्याची माहिती आता समोर येत आहे. अमेरिकेचे राजनेतिक अधिकारी डोनाल्ड लू यांनी शेख हसीना यांचा पायउतार होण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडल्याचीही माहिती आहे. पण या सर्वाला पहिले कारणीभूत झाले ते सेंट मार्टिन बेट. बांगलादेशाच्या सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेचा डोळा आहे. अमेरिकेला बंगालच्या उपसागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. या बेटावर लष्करी तळ उभारणाच्या अमेरिकेचा मानस आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव आहे. तसेच रशियाही अमेरिकावर वर्चस्व ठेवू पहात आहे. (Bangladesh Politics)
अशावेळी या दोन्ही देशांना धाक राहिल असा लष्करी तळ उभारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. यासाठी बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व टोकापासून काही अंतरावर असलेल्या सेंट मार्टिन बेटाचा ताबा अमेरिकेला हवा आहे. वास्तविक हा दावा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. १,९०० मध्ये, ब्रिटीश सर्वेक्षकांच्या टीमने सेंट मार्टिन बेटाचा भारतातील ब्रिटीश राजवटीचा भाग म्हणून समावेश केला आणि सेंट मार्टिन या ख्रिश्चन धर्मगुरूच्या नावावरून बेटाचे नामकरण केले. बांगलादेशातील हे एकमेव कोरल-रीफ क्षेत्र आहे.
बांगलादेशच्या पर्यावरण विभागाने हे ८ चौरस किलोमीटरचे बेट पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र म्हणून घोषित केले. या बेटावर कोणतेही बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक आहे. तरीही या बेटावर बेकायदेशीरपणे २३० हून अधिक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कॉटेज उभी राहिली आहेत. बंगालच्या उपसागरातील याच बेटावर तळ उभारण्याचे अमेरिकेचे स्वप्न आहे. मात्र अलिकडील काही वर्षात चीननं बांगलादेशाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. या सर्वांकडे पाहून शेख हसीना यांनी सेंट मार्टीन बेटाचा ताबा कुणाकडेही दिला जाणार नाही, हे जाहीर केले. अमेरिकेला याच गोष्टीचा राग आला. त्यानंतरच शेख हसीना यांना सत्तेपासून दूर करण्याच्या हालचालींना वेग आला. यासाठी सर्व कमान डोनाल्ड लू यांच्या हाती देण्यात आली. (Bangladesh Politics)
==============
हे देखील वाचा : कमला हॅरिस नेमक्या कोण ?
===============
डोनाल्ड लू हे यूएस स्टेट डिपार्टमेंटमध्ये दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार विभागाचे सहायक सचिव आहेत. दक्षिण आणि मध्य आशियात अमेरिकेची धोरणे ठरवण्याची जबाबदारी डोनाल्ड लू यांच्यावर आहे. डोनाल्ड लू यांना २०२१ रोजी ही जबाबदारी देण्यात आली होती. लू यांची राजनैतिक कारकीर्द भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये व्यतीत झाली आहे. त्यामुळेच ते या देशांच्या राजकारणात आणि मुत्सद्देगिरीतील तज्ञ मानले जातात. शेख हसीना यांच्याकडून सेंट मार्टिन बेटाचा ताबा मिळवणे ही कामगिरीही त्यांच्या खांद्यावर आली. शिवाय बांगलादेश आणि चीनमध्ये जास्त जवळीक येऊ नये ही जबाबदारीही लू यांच्यावर होती. या सर्वांदरम्यान चीननं बांगलादेशमधील गुंतवणूक वाढवली होती. (Bangladesh Politics)
चीनच्या आर्थिक गुंतवणुकीनं बांगलादेश आणि चीन यांच्यातील मैत्री वाढली. डोनाल्ड लू यांची या सर्वांवर नजर होती. या सर्वांत आणखी एक गोष्ट म्हणजे, म्हणजे बांगलादेशातील उद्योगात भारताचीही गुंतवणूक वाढली होती. बांगलादेशमधील विद्युत निर्मितीमध्ये भारतीय कंपन्यांचा समावेश होता. यामुळे बांगलादेशाला अमेरिकेची गरज उरली नाही. या सर्वांचा बदला घेण्यासाठीच शेख हसीना यांची सत्ता उलटवून टाकल्याचा आरोप आता होत आहे. यासाठी अमेरिकेनं लाखो डॉलरची लाच दिल्याचेही सांगण्यात येते. अर्थातच शेख हसीना यांच्या सत्तांराचे धागे पुढच्या कालावधीत असेच उलगडणार आहेत. (Bangladesh Politics)
सई बने