देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत नरेंद्र मोदी तिस-यांदा शपथ घेत असतांना जम्मू आणि काश्मिरमध्ये मात्र दहशतवाद्यांनी निष्पाप यात्रेकरुंना मारुन आपल्या क्रूर वृत्तीची पुन्हा एकदा साक्ष दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवीचे दर्शन करण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी थेट बसवर हल्ला केल्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. यात ९ जण ठार झाले. तर ३३ यात्रेकरुन जखमी झाले आहेत. या हल्ल्यात मारले गेलेल्या यात्रेकरुंमध्ये महिलांचाही समावेश आहे. (Bollywood Star)
हल्ल्यात जखमी झालेल्या यात्रेकरुंनी सांगितलेला अनुभव भयानक आहे. अचानक चार-पाच दशहतवादी बस समोर आले, आणि अंदाधुंद गोळीबार करु लागले. यामुळे यात्रेकरु प्रचंड घाबरले आहेत. या घटनेचे संपूर्ण देशातून निषेध करण्यात येत आहे. मात्र ज्या बॉलिवूडनं #AllEyesonRafah नावाची मोहीम काही दिवसापूर्वी राबवली होती, त्या बॉलिवूडमधील एकाही अभिनेत्यानं या हल्ल्याचा निषेध केला नाही.
काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानचे दहशतवादी निष्पाप नागरिकांना लक्ष करीत आहेत. भारतीय सैन्यावरही पाकिस्तानचे दहशतवादी हल्ला करीत आहेत. मात्र या सर्व घटनांकडे कानाडोळा करणा-या बॉलिवूडनं #AllEyesonRafah मोहीम राबवून इस्त्राइलचा निषेध केला आहे. इस्त्राइलचा निषेध करण्यासाठी एकत्र होणारे बॉलिवूड स्टार पाकिस्तानचा निषेध कधी करणार हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. (Bollywood Star)
शिवखोडीहून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना जबरदस्त मानसीक धक्का बसला आहे. या घटनेचा भारतातून आणि भारताच्या मित्र देशांतून निषेध व्यक्त होत असतांना #AllEyesonRafah मोहीम राबवणारे बॉलिवडू स्टार गप्प आहेत. विशेष म्हणजे, राफा साठी भरभरुन पोस्ट लिहिणा-यांमध्ये आपले मराठी तारेही पुढे होते. माधुरी दीक्षितपासून आलिया भट्टपर्यंत सर्वांनीच राफामधील युद्धजन्य परिस्थितीसंदर्भात सोशल मिडियावर भरभरुन पोस्ट शेअर केल्या आहेत.(International News)
पण जम्मू मधील निष्पाप यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या हल्ल्याबद्दल चकार शब्दही काढला नाही. यातून बॉलिवडूचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आला आहे. यामुळे सोशल मिडियावर या सर्व स्टार्सवर टिका करण्यात येत आहे. अमेरिकेची नागरिक झालेली प्रियंका चोप्राही या राफाच्या पाठिंब्यासाठी पुढे होती. तिनं भारत सरकारला इस्त्राइला त्यासंबंधी समज देण्याची मागणी केली होती. पण तिच प्रियंका आता गप्प आहे.
फारकाय दिलोंकी धडकन म्हणून आपण ज्या माधुरी दीक्षितचा उल्लेख करतो, ती माधुरीही राफासाठी पुढे आली होती. पण जम्मूमधील निष्पाप यात्रेकरु तिला दिसले नाहीत. आलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, क्रिकेटपटू रोहीत शर्माची पत्नी, नुसरत भरुचा यानींही राफाच्या संदर्भात पोस्ट केल्या होत्या.
याशिवाय सटव्या अभिज्ञा भावे, रसिका वेंगुर्लेकर, शिवानी सुर्वे या मराठी अभिनेत्रींनीही राफाचा कळवळा आला होता. पण त्यांना यात्रेकरुंनी भरलेल्या बसवर केलेला दहशतवाद्यांचा हल्ला दिसला नाही. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना बॉलिवूडचा छुपा पाठिंबाच यातून पुन्हा दिसत असल्याची चर्चा सोशल मिडियावर आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला. हमासच्या दहशतवांद्यानी अनेक तरुणींचे अपहरण केले. त्यांच्यावर बलात्कार झाले. हमासच्या ताब्यात असलेल्या इस्त्रायलच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या सर्व घटनांमुळे संतप्त झालेल्या इस्त्रायलने हमासचा गढ असलेल्या राफाभागात हल्ले केले. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अनेक निष्पाप नागरिक मारले गेले. (Celebrity News)
मात्र बॉलिवूडने आत्तापर्यंत या घटनेला जबाबदार असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेचा कधीही निषेध केलेला नाही. तसेच हमासच्या दहशतवाद्यांनी महिलांची जी अवहेलना केली त्याचाही निषेध करण्यात आला नाही. उलट बॉलिवूडनं #AllEyesonRafah ही मोहीम चालवून राफा शहराबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला. त्याच बॉलिवडूनं जम्मूमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल अवाक्षरही काढले नाही, त्यामुळे सोशल मिडियामधून त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. (Bollywood Star)
दुसरीकडे नवनिर्वाचीत खासदार झालेल्या कंगना राणावत आणि अनुपम खेर यांनी या हल्ल्याचा निषेध केला. या दोन्ही अभिनेत्यांनी यासंदर्भात दहशतवाद्यांना पाठिंबा देणा-या पाकिस्तानचा निषेध केला आहे.
सई बने