Lips Care Tips : गुलाबी ओठांसाठी बहुतांशजण वेगवेगळ्या ट्रिटमेंट करतात. पण तरीही ओठांना नैसर्गिक रंग पुन्हा येण्यास वेळ लागतो. अशातच घरगुती उपायांनी तुम्ही काळवंडलेल्या ओठांना मध लावण्याचे काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊया…
औषधीय गुण
मध खाण्यासाठी स्वादिष्ट असले तरीही त्यामध्ये औषधीय गुण भरपूर प्रमाणात असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मधात मॉइश्चराइजिंग गुण असतात. यामुळे फाटलेले, काळे पडलेल्या ओठांसाठीही मध उपयुक्त ठरते. याशिवाय मधात अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात. यामुळे सूज येणे आणि जळजळ कमी होण्यास मदत करते.
काळ्या ओठांसाठी मध फायदेशीर
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे ओठांचे संक्रमण होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यास मध फायदेशीर असते. जर तुमचे ओठ काळवंडले असल्यास तर मधाचा वापर करू शकतात.
कोरड्या ओठांची समस्या होईल दूर
ओठांवर होणाऱ्या इरिटेशनला कमी करण्यासाठी मध फायदेशीर मानले जाते. याशिवाय कोरड्या ओठांची समस्याही कमी होतो. मधात नॅच्युरल एंजाइम गुणधर्म असतात यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येण्यास मदत होते. मधामुळे ओठ मॉइश्चराइजही होतात आणि डेड स्किन हटवण्यास मदत होते. (Lips Care Tips)
अँटी-ऑक्सिडेंट सपोर्ट
मधात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. यामुळे फाटलेल्या ओठांसाठी मधाचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. आपल्या त्वचेप्रमाणे ओठांना ही प्रदुषक आणि सूर्याच्या हानिकारक किरणांचा सामना करावा लागतो. अशातच अँटी-ऑक्सिडेंट्स यावर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा प्रभाव कमी करतात. यामुळे ओठांचे आरोग्य राखले जाते.