Home » बिघडलेली पचनसंस्था आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे हिंगाचे पाणी

बिघडलेली पचनसंस्था आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे हिंगाचे पाणी

भारतात जेवणाची चव वाढवण्यासाठी काही मसाल्यांचा वापर केला जातो. यामधील काही मसाले असे आहेत ज्यांचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी नव्हे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. यापैकीच एक म्हणजे हिंग.

by Team Gajawaja
0 comment
Hing Water Benefits
Share

Hing Water Benefits : भारतात जेवणाची चव वाढवण्यासाठी काही मसाल्यांचा वापर केला जातो. यामधील काही मसाले असे आहेत ज्यांचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी नव्हे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. यापैकीच एक म्हणजे हिंग. आयुर्वेदानुसार, दररोज हिंगाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे कोलेस्ट्रॉल, पचनासंबंधित समस्या आणि अन्य समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही देखील या समस्यांचा सामना करत असाल तर हिंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता. जाणून घेऊया हिंगाचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत सविस्तर….

कोलेस्ट्रॉल कमी होते
कार्बनिक कंम्पाउंड हिंगामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. अशातच तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करत असाल तर दररोज उपाशी पोटी हिंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे एलडीएल हा कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत हेईल. एलडीएल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करेल.

पचनासाठी मदत
हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतात. याशिवाय तुम्हाला अपचन होत असल्यास हिंगाचे पाणी पिऊ शकता. खरंतर, हिंगामध्ये डाइजेस्टिव्ह एंजाइम्स असतात, जे पचनासंबंधित समस्या दूर करतात. (Hing Water Benefits)

वजन कमी होते
आयुर्वेदानुसार, हिंगाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. खरंतर हे मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न करण्यात मदत करते. यामुळे शरिराचे वाढलेले वजन कमी होते. याशिवाय दीर्घकाळ पोट भरलेलेही राहतो. जेणेकरून भूक कंट्रोल होण्यासह वजन नियंत्रित राहते.

असे तयार करा हिंगाचे पाणी
हिंगाचे पाणी तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या. यामध्ये पाव चमचा हिंग मिक्स करा. हे हिंगाचे पाणी दररोज सकाळी उपाशी पोटी प्या. तुम्हाला अवघ्या काही दिवसातच फरक जाणवेल.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
कच्च्या हळदीच्या चहाचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
‘या’ कारणास्तव वर्कआउटनंतर होऊ शकतो Muscle Pain
पाठ दुखीच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे घरगुती उपाय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.