WhatsApp Shortcuts : जगभरात व्हॉट्सअॅपचे कोट्यावधींच्या संख्येने युजर्स आहेत. याच्या माध्यमतून दररोज लाखो-करोडोंच्या संख्येने मेसेज पाठवले जातात. व्हॉट्सअॅपची सर्वाधिक मोठी खासियत अशी आहे की, याच्या माध्यमातून तुम्ही टेक्स्ट, व्हिडीओ, ऑडिओ आणि पिक्चर मेसेज काही मिनिटांमध्ये समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता.
व्हॉट्सअॅपचा अशा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यासह बहुतांशजणांना याबद्दलचे काही शॉर्टकर्ट्स माहिती नसतात. यामुळे काहींना व्हॉट्सअॅपचा वापर करताना काही समस्या येतात. या सर्व गोष्टी पाहाता तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील पुढील काही शॉर्टकट्स नक्कीच माहिती पाहिजेत.
Ctrl + N: नव्या चॅटसाठी तुम्ही कंट्रोलसोबत N प्रेस करा
Ctrl + Shift + ]: पुढील चॅटसाठी कंट्रोलसह Shift सोबत ] या चिन्हावर प्रेस करा
Ctrl + Shift + [: आधीच्या चॅटसाठी कंट्रोल सोबत Shift सोबत [ चिन्हावर प्रेस करा
Ctrl + E: एखाद्याचा क्रमांक सर्च करण्यासाठी कंट्रोलसोबत E प्रेस करा
Ctrl + Shift + M: कोणत्याही चॅटला Mute/unmute करण्यासाठी कंट्रोलसोबत Shift आणि M प्रेस करा
Ctrl + Backspace: सिलेक्ट केलेल्या चॅटला डिलिट करण्यासाठी कंट्रोलसोबक Backspace प्रेस करा
Ctrl + Shift + U: चॅटला रीड मार्क करण्यासाठी कंट्रोलसोबत Shift आणि U प्रेस करा
Ctrl + Shift + N: नवा ग्रुप तयार करण्यासाठी कंट्रोलसोबत Shiftसह N प्रेस करा (WhatsApp Shortcuts)
दरम्यान, कंपनीने एक खास सुविधा युजर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने अॅपमध्ये असे एक फीचर दिले आहे ज्याच्या मदतीने तुमचा चॅटिंग करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. याआधी चॅटिंग करण्यासाठी तीन फॉर्मेट उपलब्ध होतो. पण आता यामध्ये कंपनीने आणखी चार फॉर्मेट जोडले आहेत. नवे टूल्स कंपनीने काही दिवसांपूर्वी टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिले होते. पण आता अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी रोलआउट केले आहेत.