गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवासाठी मार्केट सज्ज झाले असून घरोघरी सुद्धा त्याच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात आहे. अशातच प्रत्येक वर्षी गणपतीला त्यांच्या मुर्तीबद्दच जोरदार चर्चा केली जाते. मंडळांमध्ये बसणाऱ्या गणपतींचे एक वेगळेच रुप आपल्याला त्यांच्या मुर्तीतून दिसून येत असते. (Most expensive ganesh idol)
अशातच गणपतीसाठी मनोभावे खर्च केला जातो. मात्र घरगुती गणपती हा प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार घेऊन येतो. सर्वसामान्यपणे याची किंमत हजारांपासून सुरु होते. मात्र तुम्हाला माहितेय का जगात अशी गणपतीची मुर्ती आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. तसेच ही मुर्ती नक्की कोणाकडे आहे असा सुद्धा प्रश्न आता तुम्हाला पडेल. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
गणपतीची सर्वाधिक महागडी मुर्ती गुजरात मधील सूरतचा एक व्यापारी राजेश भाई पांडव यांच्याकडे आहे. ते सूरतमध्ये कातरगाम येथे राहतात. त्यांचे एक पॉलिशिंग युनिट आहे. त्याचसोबत पांडव यांचे अन्य काही व्यवसाय सुद्धा आहेत. राजेश भाई आणि त्यांच्या परिवारातील अन्य जण असे मानतात की. जेव्हापासून गणपतीची मुर्ती घरी स्थापन केली आहे तेव्हापासून त्यांची खुप भरभराट होत आली आहे.
पांडव यांच्या घरी असलेल्या डायमंडपासून तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मुर्तीची किंमत करोडोंच्या घरात आहे. याची उंची केवळ २.४४ सेमी आहे. याला एका अनकट हिऱ्यापासून तयार करण्यात आले आहे. याच कारणास्तव मुर्तीची किंमत जवळजवळ ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. जी देशातील सर्वाधिक महागडी गणपतीची मुर्ती आहेत. मात्र राजेश भाई यांच्यासाठी हा गणपती अत्यंत अनमोल आहे. दिसताना मुर्ती एका सफेद क्रिस्टल सारखी दिसेल. मात्र खरंतर तो एक हिरा आहे. जे गणपतीसारखा दिसतो. (Most expensive ganesh idol)
हेही वाचा- वर्षातून एकदाच उघडणा-या श्री नागचंद्रेश्वर मंदिराचे रहस्य
२००५ मध्ये राजेश पंडव यांना ही मुर्ती साउथ अफ्रिकेत एका लिलावात मिळाली होती. तेव्हा याचा लिलाव एका अनकट डायमंडच्या रुपात होता. मात्र जेव्हा राजेश पांडव यांनी तो पाहिला तेव्हा त्यांना त्यात देव दिसला. त्यामुळेच त्यांनी तो लिलावात खरेदी केला. २०१६ मध्ये ही मुर्ती सूरत मधील वार्षिक हिरा प्रदर्शनात सुद्धा लावली होती.