देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकत्याच भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत संपूर्ण भारतातील ५०८ रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास केले जाणार आहे. रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत आखण्यात आलेल्या योजनेसंदर्भात पीएम मोदी यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि जनतेला व्हिडिओ कॉफ्रेंन्सच्या माध्यमातून संबोधित केले. या वेळी मोदी यांनी असे म्हटले की, भारत विकसित होण्याच्या आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढील पाऊल उचलत आहे. तो आपल्या अमृत काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. नवी उर्जा, नवी प्रेरणा आणि काही नवे संकल्प सुद्धा आहे. याच दरम्यान भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे असे ही मोदी यांनी म्हटले. (Amrit Bharat Station)
मोदी सरकारकडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५०८ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास होणार आहे. याची आधारशिला ६ ऑगस्ट २०२३ रोजी पीएम मोदी यांनी स्वत:व्हिडिओ कॉफ्रेंन्सिंगच्या रुपात आखली. या योजनेअंतर्गत भारतातील १३०९ स्थानकांचे रिडेव्हलपमेंट केले जाणार आहे.

Amrit Bharat Station
मोदी सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ५०८ रेल्वे स्थानकांचे नुकतीकरण होणार आहे. या कामासाठी एकूण २४,४७९ कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे, सरकारच्या या पावलामुळे रेल्वे स्थानकांना आधुनिक रुप येणार आहे. मोदी सरकारच्या योजनेत रेल्वे स्थानकांना सिटी सेंटरच्या रुपात विकसित केले जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने एक संपूर्ण मास्टर प्लॅन सुद्धा तयार केला आहे. प्लॅनअंतर्गत सरकारला असे करू इच्छिते की, रेल्वे स्थानक शहरातील विकासाचे माध्यम व्हावे.
मोदी सरकार ज्या ५०८ रेल्वे स्थानकांचे रिडेव्हलपमेंट करणार आहे. त्यामध्ये २७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. सरकार रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना आधुनिक सुविधा देणार आहे. रेल्वे स्थानकांचे डिझाइन परदेशातील हाय-फाय रेल्वे स्थानकांसारखे असणार आहे, ऐवढेच नव्हे तर डिझाइनमध्ये स्थानिक संस्कृती आणि वास्तुकलेला सुद्धा जागा दिली जाणार आहे. या रेल्वे स्थानकांना सिटी सेंटर्सच्या रुपात रिडेव्हलपमेंट केले जाणार आहे.(Amrit Bharat Station)
हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला लोकमान्य टिळक पुरस्कार, शरद पवारही उपस्थितीत
योजनेच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील ५५-५५ रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त बिहार मधील ४९, महाराष्ट्रातील ४४, पश्चिम बंगाल मधील ३७, झारखंड मधील २०, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू मधील १८-१८, हरियाणातील १५ आणि कर्नाटकातील १३ रेल्वे स्थानक अमृत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीचे तयार केले जाणार आहेत.