सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात टेंन्शन, आजार, डोकं दुखी अशा समस्या वारंवार होत राहतात.जरा जरी डोकं दुखू लागले की, आपल्याला व्यवस्थितीत काम करता येत नाही. चिडचिड होते. डोकं जडं झाल्यासारखे होते आणि त्यापासून सुटका मिळावी म्हणून आपण काही औषधं घेतो. काही लोक घरगुती उपाय करतात. डोक्याच्या एका खास भागात सतत दुखत राहणे एखाद्या आजाराचे संकेत असू शकतात. यावेळी आपण स्वत:हून काही औषधांचे सेवन करतो. असे करणे चुकीचे असून आजार अधिक गंभीर होऊ शकतो. पण जर तुमचे उजव्या बाजूचे डोकं सतत दुखते तर त्यामगील नक्की काय कारणं असू शकते आणि त्यापासून कसा बचाव कराल याच बद्दल आपण पाहूयात. (Right-Sided Headaches)
उजव्या बाजूचे डोकं दुखण्याची कारणं
-डोकं दुखणे ही सामान्य बाब आहे. बहुतांश वेळा मान किंवा खांद्याच्या येथे अधिक ताण पडल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळेच अधिक डोकं दुखू लागते.
-माइग्रेन मध्ये सुद्धा खुप डोकं दुखते. यावेळी एकाच बाजूचे डोकं दुखत राहते, आणि याचसोबत काही कारणं असू यामागे असू शकतात.
-जर डोकं दुखी ही एखादे ठराविक पॅटर्न किंवा काही वेळानंतर सतत होत असेल तर व्यक्तीला गंभीर रुपात डोकं दुखते. क्लस्टर डोकं दुखीमुळे तुम्हाला एका बाजूचेच डोकं फार दुखत असल्याचे जाणवते.
-जर तुम्हाला साइनसची समस्या असेल तर तुमचे कपाळ आणि डोळ्यांमध्ये दुखते आणि त्यावर ताण पडला जातो. अशातच तुमच्या उजव्याबाजूला डोकं दुखण्याची समस्या उद्भवते.
-टेंपोरल आर्टेराइटिस अशी एक समस्या आहे ज्यामध्ये कानामागील धमन्या फुगतात. याच कारणास्तव डोक्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला खुप दुखते.
डोकं दुखीमागील अन्य कारणं
-लाइफस्टाइल संबंधित जसे की, टेंन्शन, थकवा, योग्य वेळी आहार न घेणे, मानचे स्नायू खेचले गेल्याने दुखणे.
-इन्फेक्शन किंवा एलर्जी
-औधषांमुळे डोकं दुखी (Right-Sided Headaches)
हेही वाचा- महिला होतायत Superwomen Syndrome च्या शिकार
उपचार काय कराल?
डोके दुखीवर डॉक्टर योग्य उपचार करतील. पण पुढील काही उपचार ही तुमच्या कामी येऊ शकतात.
-पेन किलर मेडिसिन्स
-ऑक्सिजन थेरपी
-योगा
-दररोज व्यायाम करणे
-एक्युपंचर
जर तुम्हाला दीर्घकाळ डोके दुखी, ताप, मळमळ, उल्टी, डोळ्यांना दिसण्यास समस्या येत असेल तर तातडीने डॉक्टरांना भेटा. याची कारणं समजून घेत योग्य तो उपचार घ्या.