अॅप्पल प्रोडक्ट्सच्या युजर्सला आता एक मोठं गिफ्ट मिळाले आहे.कारण अॅप्पल इंडियाने भारतात आपले पहिलेच अॅप्पल स्टोर (Apple Store) लॉन्च केले आहे. आयफोन तयार करणाऱ्या कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतीली बीकेसी येथे आपल्या स्टोरचे उद्घाटन केले आहे. ओपनिंग दरम्यान ना लाल रंगाची रिबीन कापली गेली ना तसे काही झाले. कुक यांनी थेट दरवाजा उघडून अॅप्पल स्टोरची ओपनिंग केली. भारतात २५ वर्षांचा प्रवास पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अॅप्पलने आपले पहिले स्टोर लॉन्च केले आहे.
मुंबई नंतर आता दिल्लीत येत्या २० मार्चला भारतातील दुसरे अॅप्पल स्टोर सुरु होणार आहे. यामुळे आता ग्राहकांना थेट अॅप्पल स्टोरच्या माध्यमातून कंपनीचे प्रोडक्ट्स खरेदी करता येणार आहेत.
भारत जगातील सर्वाधिक मोठे स्मार्टफोन मार्केटपैकी एक आहे. यामुळेच अॅप्पलला ही संधी सोडायची नाहीयं. अॅप्पल स्टोरची सुरुवात झाल्यानंतक कंपनीला भारतीय ग्राहकांशी थेट जोडता येणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना सुद्धा अॅप्पलच्या शानदार सर्विसचा फायदा घेता येणार आहे.

लॉन्चिंगपूर्वी मुंबईत अॅप्पल स्टोरवर खुप गर्दी झाली होती. या सर्वांनी त्याचे लॉन्चिंग पाहिले. मुंबईत अॅप्पल स्टोर बीकेसी आणि दिल्लीत अॅप्पल स्टोर सुरु झाल्यानंतर त्याची एकूण संख्या ५५२ स्टोर ऐवढी होणार आहे. यामध्ये क्युपर्टिनो येथील अॅप्पल पार्क विजिटर सेंटरचा सुद्धा समावेश आहे. संपूर्ण जगात आयफोन आणि दुसरे प्रोडक्ट्स विक्री करणाऱ्या कंपनीच्या २५ देशांमध्ये अॅप्पल स्टोर आहे.
मुंबईतील अॅप्पल स्टोर हे खरंतर जियो वर्ल्ड ड्राइव वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आहे. कंपनीने याचा वेळ सुद्धा जारी केला आहे. हे अॅप्पल स्टोर सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. आठवड्याचे सातही दिवस ते सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्टोर मध्ये काम करणाऱ्यांना आधीच ट्रेनिंग दिली गेली आहे.(Apple Store)
हे देखील वाचा- ChatGPT चा स्मार्टफोनमध्ये अशा पद्धतीने करा वापर
अॅप्पल स्टोर बीकेसीमध्ये शंभरहून अधिक कर्मचारी काम करणार असून ते २० पेक्षा अधिक भाषा बोलणारे आहेत. मुंबईतील अॅप्पल स्टोर मध्ये जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करणार आहे. येथे त्यांना बेस्ट प्रोडक्ट्स आणि सर्विसची माहिती सुद्धा दिली जाणार आहे. स्टोरवर अॅप्पल ट्रेड इन प्रोग्रामची सुद्धा सुविधा मिळणार आहे.