मुघल शासकांच्या शाही खर्चाच्या कथा सर्वांनाच माहिती असतील. सम्राटांप्रमाणेच त्यांना ही काही गोष्टींची फार आवड होती. असे सांगितले जाते की, जेव्हा कधी ते आपल्या घराबाहेर पडायचे तेव्हा रखैल म्हणून ठेवण्यात आलेल्या महिलांचा एक अस्थायी हरम आपल्या सोबत घेऊन निघायचे. मात्र सर्वाधिक हैराण करणारी गोष्ट अशी की, काही मुघल समलैंगिक सुद्धा होते. त्यांच्या शानसकाळात समलैंगिक संबंधित मोठ्या घटना ही घडल्या होत्या. (Homosexual relationship in Mughals)
मुघलकाळातील इतिहासकार असे म्हणतात की, त्या शासकांच्या हरममध्ये सुंदर, कोमल आणि कामुक दिसणाऱ्या तरुणांना सुद्धा ठेवले जायचे. असे म्हटले जाते, मध्य एशिया पर्यंत पसरलेल्या या श्रीमंतर मुघलांच्या हरममध्ये स्रिया कमी आणि तरुण अधिक असायचे. त्या तरुणांसोबत ही रिलेशनशिप ठेवले जायचे.
बाबर सुद्धा समलैंगिक होता
द हिंदूत छापलेल्या एका आर्टिकलनुसार मुघल शासक बाबर सुद्धा समलैंगिक होता. बाबरनामाच्या अनुवादाच्या हवाल्याने असे लिहिले आहे की, तो मुघल शासनाचा संस्थापक होताच. पण त्याला नवतरुणांवर प्रेम करण्याचा शौक होता. तो जेवढा लढवय्या होता तेवढाच वासनेच्या प्रभावाखाली होता.
शहाजहांच्या शासन काळात ही समलैंगिकता
असे मानले जाते की, त्या काळापर्यंत भारतात समलैंगिकतेची उदाहरणे पहायला मिळाली नाहीत. पण शहाजहाच्या काळातील एक घटना फार प्रसिद्ध आहे. ज्याचा उल्लेखन इतिहासकार टवेरनियर यांनी केला आहे. त्यांच्या मते, बुरहानपुर मधील एका गवर्नरची हत्या करण्यात आली होती. असे कळले की, हत्या ही समलैंगिंकतेमुळे झाली होती. गवर्नरला एका तरुणावर प्रेम जडले होते. त्याच्यासोबत रिलेशनशिप ठेवायचे होते. पण तरुण तयार नव्हता. त्याने रागाच्या भरात गवर्नगरची हत्या केली.
अकबरच्या काळात ही घडली घटना
इतिहासकार असे सांगतात की, अकबराच्या शासन काळात ही अशी एक घटना झाली. अकबरच्या दरबारात तेव्हा खान जमान उर्फ अली कुली खान होता. तो पानीपतच्या दुसऱ्या युद्धाचा हिरो ठरला होता. असे सांगितले जाते की, अकबरचा एक शिपाई शमीम बेवर त्याचे प्रेम जडले होते. तसेच तो अकबरचा खास शिपाई होता. (Homosexual relationship in Mughals)
सुफी कवींनी सुद्धा यावर लिहिलेय
मध्यकाळातील सुफी कवींनी सुद्धा ज्या कविता केल्या आहेत त्यामध्ये ही अशा तरुणांबद्दल लिहिले गेले आहेत. खरंतर मध्यकाळातील एक सुफी कवी सैफी यांनी आपल्या एका फारसी कवितेत सल्ला देतात की,
”किसी की ज़िंदगी तभी होगी पूरी और ख़ुद में कामयाब, पास में हो सुंदर लड़का और अच्छी शायरी की किताब.”
हे देखील वाचा- भारतात समलैंगिक विवाहाला केंद्र सरकारचा विरोध
१७व्या शतकातील समलैंगिक प्रेमसंबंध
मुघलांच्याव्यतिरिक्त ही समलैंगिक संबंधांची उदाहरणे पहायला मिळाली. कथा १७ व्या शतकातील आहे. आर्मेनिया मध्ये राहणाऱ्या सरमद काशानचे यहूदी होते. सरमद हिंदुस्तानात व्यापारासाठी आले होते. मात्र येथे आल्यानंतर त्यांना एका हिंदू तरुणावर प्रेम जडले. इतिसाहकार असे सांगतात की, याचा अंत खरंच खुप वाईट झाला. सर्व समाजाला माहिती होते की, ते दोघे समलैंगिक होते.