Home » ब्रिटनमध्ये सापडले प्राचीन मंदिर…

ब्रिटनमध्ये सापडले प्राचीन मंदिर…

by Team Gajawaja
0 comment
Britain
Share

म्युझियम ऑफ लंडनच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने नॉर्थम्प्टनमधील ओव्हरस्टोन येथे प्राचीन स्थळ शोधले आहे.  ही साइट रोमन साम्राज्याशी संबंधित आहे. ब्रिटनमध्ये (Britain) सापडलेले हे रोमन प्राचीन स्थळ म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून 4000 वर्ष जुने मंदिर असल्याचा दावा आहे.  नॉर्थम्प्टनच्या उत्तरेस सुमारे चार मैलांवर असलेल्या ओव्हरस्टोन या गावात नवीन निवासस्थान बांधण्यासाठी टीम खोदत होती, तेव्हाच हा शोध लागला. गेल्या वर्षभरात जगभरातील अनेक देशांमध्ये मंदिरांचे अवशेष सापडल्याच्या घटना पुढे येत आहेत. या मंदिराच्या शोधानंतर प्राचीन काळी संस्कृती किती व्यापक आणि सर्वदूर पसरली होती, याची जाणीव होत आहे.  त्यातच आता ब्रिटनमध्येही (Britain) मंदिर सापडल्यानंतर प्राचीन संस्कृतीच्या व्याप्तीची चर्चा होत आहे.  

ब्रिटनमधील (Britain) पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने नॉर्थम्प्टन, येथे एक अतिशय महत्त्वाची प्राचीन जागा शोधली आहे. गेल्या का वर्षापासून या चाललेल्या उत्खननात 4000 वर्षे जुने मंदिर सापडले आहे. हे अवशेष प्राचीन संस्कृतीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनच्या (Britain) प्रसिद्ध अशा म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजीमधील पुरातत्वशास्त्रज्ञांची टीम नॉर्थम्प्टनजवळील ओव्हरस्टोन येथील जागेचे उत्खनन करत आहे. या दरम्यान, प्राचीन सभ्यतेची अनेक रहस्ये उलगडली आहेत.  या उत्खननात  कांस्य युग आणि रोमन संस्कृतीतील अनेक कलाकृती या सापडल्या आहेत.  हे मंदिर एका पवित्र ठिकाणी बांधण्यात आले आहे. यात दोन स्वतंत्र खोल्या आहेत. त्यात जाण्यासाठी जिनाही आहे. या मंदिराच्या भिंतींवर अनेक चित्र देखील असून ती चित्रे खराब होऊ नयेत म्हणून तेव्हा त्यावर प्लास्टरवर्क करण्यात आले होते.  या उत्थननात तज्ञांना 5 कांस्ययुगीन दफन कलश सापडले आहेत. मात्र या ठिकाणी कोणतीही कबर किंवा मानवी अवशेष सापडलेले नाहीत. संशोधकांना पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या देखील सापडल्या आहेत. पाणी साठवण्यासाठी असलेल्या या टाक्यांच्या तळाशी फुले, पाइनकोन, अक्रोडाचे कवच आणि सुमारे 2,000 वर्षे जुन्या सेंद्रिय अवशेषांपासून बनवलेले चामड्याचे बूट सापडले आहेत.  ही प्राचीन जागा 2,000 वर्षांहून अधिक काळ वापरात होती. असेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.  ही जागा जिथे आहे, तिथे पाण्याचे नैसर्गिक झरे देखिल आहेत.  सुरुवातीला ही जागा म्हणजे प्राचीन समाधीस्थळ असल्याचा संशोधकांचा अंदाज होता. मात्र या जागी कोणतेही मानवी अवशेष सापडले नाहीत. जे पाच कलश सापडले ते रिकामे होते.  त्यामुळे ही जागा पूजा किंवा प्रार्थनास्थळ म्हणूच वापरली जात असावी असा अंदाज या संशोधकांनी व्यक्त केला आहे. या स्थळाची प्रत्येक भिंत अगदी छतही अनेक चित्रांनी रंगवलेले होते. जवळच्या झर्‍याबरोबर हे मंदिर जोडले गेल्याचेही स्पष्ट झाले. पाण्याच्या टाक्यात झ-यातील पाणी जमा होण्यासाठी व्यवस्था होती.  शिवाय खराब पाणी बाहेर जाण्यासाठी वेगळी व्यवस्थाही करण्यात आल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.  हे मंदिर जेथे सापडले त्या नॉर्थहॅम्प्टनमध्ये कांस्ययुगातील अनेक शोध आधीच सापडले आहेत. त्यामुळे त्या काळात तिथे राहात असलेल्या  लोकांच्या जीवन आणि सांस्कृतिक पद्धतींची माहिती मिळते. यापूर्वी नॉर्थम्प्टनमध्ये झालेल्या उत्खननात रोमन मातीची भांडी, बांधकाम साहित्य आणि नाणी आढळून आली आहेत. यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात रोमन संस्कृती विकसीत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. नॉर्थॅम्प्टनमध्ये 1970 च्या दशकात रोमन टाऊन हाऊस सापडले होते.  तो येथील सर्वात मोठा शोध मानला गेला आहे.   

======

हे देखील वाचा : मुघलांच्या काळातील होळी

======

अगदी अलीकडे, ब्रिटिश (Britain) संग्रहालयातील पुरातत्वशास्त्रज्ञांनी इराकमधील गिर्सू या प्राचीन शहराच्या मध्यभागी 4,500 वर्ष जुन्या सुमेरियन मंदिराचे अवशेष शोधून काढले आहेत.  ब्रिटीश म्युझियमच्या संशोधकांच्या मते, ही प्राचीन जागा मेसोपोटेमियातील देव,  निंगिरसूला समर्पित आहे.  हे मंदिर गिरसू या प्राचीन शहराचे केंद्र असल्याचे म्हटले जात होते. मानले गिरसू हे मेसोपोटेमियाचे सांस्कृतिक केंद्र असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.  ब्रिटनमध्ये (Britain) सापडलेल्या या मंदिरामुळे प्राचीन संस्कृतीच्या समृद्ध खुणा पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.