सर्व हिंदू धर्मास्थळासंबंधित काही ना काही तरी मान्यता आणि रहस्य आहेत. ओडिशाच्या किनाऱ्यावरील शहर पुरी मध्ये असलेल्या जगन्नाथ पुरी मंदिराची ही काही अशी रहस्य आहेत जे तुम्ही कधी ऐकली नसतील. जगन्नाथ पुरी मंदिर (Jagannath Puri Mandir) हे भगवान विष्णूचा अवतार श्री कृष्णाला समर्पित आहे. येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचे असे काही चमत्कारी रहस्य आहेत जे सर्वांना आश्चर्यात पाडतात. त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात
श्रीकृष्णाच्या हृदयाची होते पूजा
जगन्नाथ पुरी मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीची नव्हे तर त्यांच्या हृदयाची पूजा केली जाते. ही सर्वात अनोखी गोष्ट असून लोकांना त्यावर लगेच विश्वास बसत नाही. मंदिरात भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि देवी सुभद्र यांच्या मुर्त्यांची पूजा केली जाते. या मुर्त्या मातीच्या नव्हे तर चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेल्या आहेत.
साउंड प्रुफ आहे मंदिराचे आर्किटेक्चर
जगन्नाथ मंदिराचे आर्किटेक्चर हे अत्यंत सुंदर आणि साउंड प्रुफ आहे. हे मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावरच आहे. येथे समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकू येते. तसेच मंदिराच्या सिंहद्वारातून प्रवेश केल्यानंतर मात्र समुद्राच्या लाटांचा आवाज अजिबात येत नाही.
सर्व दिशांनी सरळ दिसते मंदिराचे सुदर्शन चक्र
या मंदिराचे आणखी एक रहस्य असे की, या मंदिरावर लावण्यात आलेले सुदर्शन चक्र नेहमीच सरळ दिसते. तुम्ही कोणत्याही दिशेला उभे राहून सुदर्शन चक्र पाहिल्यास तर त्याचे तोंड तुमच्याकडे असल्याचे भासते.
मंदिराच्या कळसाची कधीच सावली पडत नाही
सर्व गोष्टींच्या सावल्या या सुर्याच्या प्रकाशामुळे जमिनीवर पडतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु या मंदिराच्या कळसाची सावली कधीच पडत नाही. याची सावली नेहमीच अदृश्य असते. या मंदिराच्या कळसाची सावली आजवर कोणीही पाहिलेली नाही.
हवेच्या विरुद्ध दिशेला फडकत असतो झेंडा
जगन्नाथ पुरी मंदिरावर लावण्यात आलेला झेंडा हा नेहमीच हवेच्या विरुद्ध दिशेने फडकताना दिसतो. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या या झेंड्याचे रहस्य कोणालाच माहिती नाही की, असा पद्धतीने तो का फडकतो.
मंदिरावरुन पक्षी उडत नाहीत
या मंदिरासंदर्भातील आणखी एक गोष्ट अशी सांगितली जाते की, कोणताही पक्षी या मंदिराच्या घुमटावर बसलेला पाहिलेला नाही. तसेच मंदिराच्या वरुन विमान उड्डाणासाठी सुद्धा परवानगी नाही.(Jagannath Puri Mandir)
हे देखील वाचा- भगवान जगन्नाथांची मुर्ती बदलताना पंडितांच्या डोळ्यांवर पट्टी का बांधतात? जाणून घ्या पौराणिक कारण
स्वयंपाकघराचे रहस्य
या मंदिरातील स्वयंपाकघर हे जगातील सर्वाधिक मोठ्या स्वयंपाकघरांपैकी एक आहे. येथे ५०० स्वयंपाक कर्मचारी आणि ३०० सहाय्यक काम करतात. असे सांगितले जाते की, या मंदिरात किती ही प्रमाणात भक्त येऊ दे तरीही प्रसाद कधीच कमी पडत नाही. मात्र मंदिर बंद होण्याची वेळ येते तेव्हा प्रसाद आपोआप संपला जातो.