सैन्याचे प्रमुख, राष्ट्रपती, देशद्रोही आणि हुकूमशाह… परवेज मुशर्रफ (Parvez Musharraf) यांना अशा काही नावांनी ओळखले जाते. दीर्घ काळापासून आजारी असल्याने त्यांचे ५ फेब्रुवारीला निधन झाले. वर्ष २००२ ते २००८ पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. यापूर्वी सैन्यात आर्मी चीफ असताना त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा तख्तापालट केला होता. पाकिस्तानच्या राजकरणात मुशर्रफ भले ही वादग्रस्त होत. पण मानवाधिकारांचे हनन करण्याचा आरोप लावला गेला आणि भ्रष्टाचारासाठी ओळखले जाऊ लागले. परंतु त्यांनी देशाच्या सैन्याला आधुनिक बनवण्यासाठी ही ओळखळे जाते.
सैन्यातून विभक्त होत राजकरणात येताच मुशर्रफ यांच्या वाईट दिवसांना सुरुवात झाली. नशीब अशा पद्धतीने बदलले की, सर्वाधिक हुकूमशाह म्हणून ओळखळल्या जाणाऱ्या परवेज मुशर्रफ यांना देश सोडावा लागला.
मुशर्रफ यांचे वाईट दिवस
मुशर्रफ यांच्यावर एकापाठोपाठ एक आरोप लागले गेले आणि त्याच आरोपांमुळे त्यांना देश सोडण्यासाठी भाग पाडले. हे अशावेळी झाले जेव्हा नवाज शरीफ यांचे लोकशाहीने निवडणून आललेल्या सरकारच्या विरोधात सैन्य तख्तापालटचे त्यांनी नेतृत्व केले. काही पाकिस्तांकडून समर्थन मिळाले आणि १९९९ मध्ये राष्ट्रपती बनले.
नवे पद मिळाल्यानंतर असे मानले गेले की, त्यांची क्षमता कमी होत चालली आहे. दहशतवादी हल्ल्यांची संख्या वाढत गेली. मुशर्रफ यांनी अमेरिकेसोबत मिळून दहशतवादाच्या विरोधात युद्ध करण्याचे ही ठरविले. यामुळे ते कट्टरपंथींच्या निशाण्यावर आले. २००७ मध्ये त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला पण ते बचावले. अघोषित रुपात पाकिस्तान चालवल्या जाणाऱ्या सेनेत त्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. लोकप्रियता कमी झाली.
प्रकरण ऐवढ्यावरच थांबले नाही. मुशर्रफ (Parvez Musharraf) यांच्या शानसकाळात पाकिस्तानच्या जनतेनेही विरोध दर्शवला. पाकिस्तानी लोकांना त्यांचे शासन आणि काम करण्याची पद्धत अजिबात आवडली नाही. येथे तख्तापालट केल्यानंतर पाकिस्तान पीपुल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजसह विरोधी पक्षांनी मुशर्रफ यांच्या अधिकाऱ्यांना दाबणे आणि निवडणूकीत गडबड केल्याचा आरोप लावला. मुशर्रफ यांच्या विरोधात सार्वजनिक असंतोषा निर्माण होऊ लागला. विरोधांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि ते त्यावरच ठाम राहिले. हेच त्यांच्या ऱ्हासाचे कारण ठरले.
देश सोडल्यानंतर ही कायदेशीर कार्यवाही थांबली नाही
२००८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत मुशर्रफ यांच्या राष्ट्रपती पदासाठीचा टर्निंग पॉइंट होता, त्यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण होणे सहाजिकच होते. पण पीपीपी आणि पीएमएल-एनसह विरोधांनी निवडणूकीत बहुतांश जागांवर आपला विजय मिळवला. त्यांच्या गठबंधनाचे सरकार आले. अशातच मुशर्रफ यांनी सातत्याने निवडणूकीची मागणी केली. याचा खुप विरोध केला गेला. अखेर त्यांना राष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावाच लागला.
पद सोडल्यानंतर मुशर्रफ आणखी कमजोर झाले. तसेच त्यांच्यामागे कार्यवाहीचा सासेमिरा सुरु झाला. त्यांच्यावर संविधानाचे उल्लंघन करणे, महापालिकेला दाबणे आणि मानवधिकारांचे उल्लंघन करण्याचा आरोप लावला गेला. यामुळे देश सोडावा लागला. ऐवढेच नव्हे देशातून निघून गेल्यानंतर ही कायदेशीर कार्यवाही सुरु राहिली.
देश सोडल्यानंतर ते दुबईत राहू लागले. तेथेही त्यांच्या मागे दु:खाने साथ सोडली नव्हती. २०१३ मध्ये पाकिस्तान सरकारने मुशर्रफ यांच्या विरोधात अटक वॉरेंट जारी केले. तरीही, ते २०१३ मध्ये सार्वत्रिक निवडणूका लढण्यासाठी पाकिस्तानात आले आणि तेव्हा त्यांना अटक केली. घरात नजरकैद केले गेले.
मुशर्रफ यांना अखेर २०१६ मध्ये जामिनावर सोडले गेले. त्यानंतर ते दुबईत गेले पण तेव्हा सुद्धा कार्यवाही सुरुच होती. २०१८ मध्ये राजद्रोहाचे दोषी ठरविले गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीत मृत्यूची शिक्षा सुनावली गेली. पण नंतर मृत्यूची शिक्षा नंतर निलंबित केली. २०२० मध्ये लाहौर उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांच्या विरोधात शरीफ सरकारच्याच्या सर्व कारवायांना असंवैधानिक असल्याचे ठरविले. ज्यामध्ये राजद्रोहासह अन्य काही प्रकरणांचा समावेश होता.
हे देखील वाचा- पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, ज्यांना देशातील मुकेश अंबानी बोलले जाते
जेव्हा आजाराने घेरले
हळूहळू मुशर्रफ यांना आजारपणाने घेरले. त्यांना अत्यंत वाईट मृत्यू मिळाला. ते एका अशा आजाराने ग्रस्त होते की, त्यामुळे त्यांच्या शरिरातील काही अवयवांनी हळूहळू काम करणे बंद केले होते. दीर्घकाळ ते बेडवरच होते आणि ते कधीच उठू शकले नाही.