Home » पाकिस्तानमध्ये होतोय पाकीझाचा रिमेक

पाकिस्तानमध्ये होतोय पाकीझाचा रिमेक

by Team Gajawaja
0 comment
Pakeezah
Share

4 फेब्रुवारी 1972 रोजी एक हिंदी चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील सुमधूर गाणी आणि मीना कुमारी या अभिनेत्रीचा अभिनय…पाकीझा (Pakeezah) हा चित्रपट मीना कुमारी यांचा शेवटचा चित्रपट.  कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट  पूर्ण होण्यासाठी तब्बल 14 वर्ष लागली.  मीना कुमारी आणि राज कुमार यांच्या अभिनयची जुगलबंदी असलेल्या या चित्रपटातील गाणी आज पन्नास वर्षानंतरही तेवढीच लोकप्रिय आहेत. आता पाकीझाला (Pakeezah) पन्नास वर्ष झाल्यावर या चित्रपटाचा रिमेक तयार होत आहे. मुख्य म्हणजे हा रिमेक बॉलिवूड किंवा भारतात नव्हे तर पाकिस्तानमध्ये तयार होत आहे. या रिमेकमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खुद्द माहिराने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.  या पाकिस्तानी पाकीझाही पूर्ण होण्यासाठी तब्बल 13 वर्ष लागली आहेत, हे आणखी एक विशेष.  

पाकीझा (Pakeezah) हा दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माते मीना कुमारी यांचे पती कमाल अमरोही यांनी केले होते. या चित्रपटात अशोक कुमार आणि राजकुमार हे सुद्ध मुख्य भूमिकेत दिसले. याच पाकीझाचा रिमेक पाकिस्तानमध्ये तयार होत आहे.  या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये जवळपास 13 वर्षांपासून काम सुरु आहे. या चित्रपटात माहिरा खान मुख्य भूमिकेत असणार आहे.

कमल अमरोही यांचा पाकीझा (Pakeezah) हा चित्रपट आजही भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो.  या चित्रपटावर 1956 मध्ये काम सुरू झाला होता, पण ते अर्धवटच थांबले.  1969 मध्ये चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले, पण तोपर्यंत मीनाची तब्येत खूपच खालावली होती.  शेवटी 1972 मध्ये हा चित्रपट पूर्ण झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला.  हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांची गर्दी खेचू शकला नाही. मात्र अभिनेत्री मीना कुमारी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अवघ्या तीन दिवसात मरण पावल्या.  या घटनेनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. यानंतर त्याच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली आणि हा चित्रपट सुपरहिट झाला.

पाकीझा (Pakeezah) प्रदर्शित झाल्यावर त्याबाबतच्या अनेक गोष्टी नंतर चर्चिल्या गेल्या.  त्यातील प्रमुख म्हणजे मीना कुमारी आणि कमल अमरोही यांच्यातील नाते.  मीना कुमारी यांनी कमल अमरोही यांच्याबरोबर लग्न केले होते.  पाकीझा चित्रपटाच्या शुटींगदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले.  पण मीना कुमारी यांनी आपला दिलेला शब्द पाळला.  त्यांची तब्बेत बिघडूनही त्यांनी चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले.  कमाल अमरोही यांच्या सहाय्यकाने मीना कुमारी यांना सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारली होती.  ही घटना खूप गाजली. मीना कुमारी आणि कमल अमरोही विभक्त झाले.  मात्र  विभक्त होऊनही त्यांनी पाकीझा पूर्ण केला.  या चित्रपटाच्या प्रिमिअरच्यावेळी मीना कुमारी या अत्यंत भावूक झाल्या होत्या.  तोच त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.

मीना कुमारी यांनी त्यांचा काळ गाजवला होता.  साहिब बीबी और गुलाम, बैजू बावरा, दिल अपना आणि प्रीत पराई सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. पाकीझा हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट होता, परंतु या चित्रपटाचे यश बघण्याआधीच  31 मार्च रोजी मीना कुमारी यांचे निधन झाले.  मीना कुमारी यांच्याकडे प्रसिद्धी असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य हे दुःखांनी भरलेले असेच होते.  ट्रॅजिडी क्वीन म्हणून त्यांची ओळख झाली होती, ती त्यामुळेच.  चित्रपटातून त्यांना नाव, प्रसिद्धी, पैसा मिळाला मात्र खरे प्रेम आपल्याला मिळाले नाही, अशी खंत त्यांना कायम होती आणि ही खंत त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली होती. चित्रपट निर्माते कमल अमरोही यांच्याबरोबर लग्न करण्यास त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. पण मीना कुमारी यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन हे लग्न केले. पण लवकरच या लग्नामधूनही त्यांच्या वाट्याला दुःखच आले.   

========

हे देखील वाचा : KGF सिनेमाच्या कथेप्रमाणे नव्हे तर खऱ्या घटनांवर आधारित आहे याचा इतिहास

========

वास्तविक मीना कुमारी आणि कलम अमरोही ही एक परिकथाच होती. पण त्या कथेचा शेवट दुःखानं झाला. अवघ्या पाच वर्षाच्या मीना कुमारी यांना कमल अमरोही यांनी बालकलाकराच्या रुपात पाहिले होते.  मीना कुमारी 14 वर्षाच्या होत्या तेव्हा अनारकली या चित्रपटासाठी त्यांना साईन करण्यात आले.  या चित्रपाटाच्या शुटींग दरम्यान मीना कुमारी यांचा अपघात झाला.  यात कमल अमरोही यांनी त्यांची खूप काळजी घेतली.  तेव्हापासून ही प्रेमकथा सुरु झाली.  वयामधलं अंतर आणि दोन धर्मामधील फरक दुर्लक्षित करुन मीना कमारी यांनी 14 फेब्रुवारी 1952 रोजी कमल अमरोही यांच्यासोबत विवाह केला.  त्यानंतर मीना कुमारी यांच्या कुटुंबांनी त्यांच्यांबरोबर संबंध तोडले.  इकडे कमल अमरोही यांनीही मीना कुमारी यांच्यावर अनेक बंधंनं लादली.  यात या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले.  चित्रपटाच्या सेटवरही हे दोघंही अनोळखी असल्यासारखे वावरायचे.  पाकीझा हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. पाकीझाच्या (Pakeezah)शुटींगदरम्यान अनेकवेळा मीना कुमारी यांची तब्बेत बिघडली होती.  पण त्यांनी चित्रपट पूर्ण केला.  पाकीझा प्रदर्शित झाल्यावर काही दिवसांनी मीना कुमारी या कोमात गेल्या आणि त्यांचे निधन झाले. 

मीना कुमारी यांच्या निधनानंतर पाकीझा(Pakeezah) तुफान चालला.  त्यातील गाण्यांनी विक्रम केला. आजही त्यातील गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.  आता हाच पाकीझा पाकिस्तानमध्ये तयार होत आहे.  पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील चित्रपटसृष्टीवर असणारी बंधन हा एक वेगळा विषय आहे.  मात्र पाकीझा सारखी कलाकृती नव्यानं ते कशी सादर करत आहेत, याकडे नक्कीच उत्सुकता आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.