जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये आता लोकसंख्या वेगाने कमी होत असल्याने देश चिंतेत आहे. चीनी सरकार ही घट रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता चीनच्या सिचुआन प्रांताने येथील घटत चाललेल्या लोकसंख्येवर रोख लावण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार आहे. येथील दांपत्यांना हवी तेवढी मुलं जन्माला घालण्याची परवानगी मिळणार आहे.(China Sichuan Province)
गेल्या वर्षात चीनमध्ये ६० वर्षात प्रथमच लोकसंख्येत खुप मोठी घट झाल्याचे दिसून आले. चीनमध्ये काही दशकांपासून वन चाइल्ड पॉलिसी लागू करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये बदल करत २०२१ मध्ये विवाहित दांपत्यांना राष्ट्रीय स्तरावर मुल जन्माला घालण्याची मर्यादा ही तीन केली गेली.
२०१६ मध्ये बंद केली गेली वन चाइल्ड पॉलिसी
चीनच्या सिचुआन प्रांतात येथे महत्वपूर्ण नितीगत बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार अविवाहित कपल्सला ही मुल जन्माला घालता येणार आहेत. यापूर्वी येथे सिंगल महिलांसाठी मुलं जन्माला घालण्यावर बंदी घातली गेली होती. परंतु दीर्घकाळ वन चाइल्ड पॉलिसीनंतर २०१६ मध्ये त्यावर बंदी घातली. जी १९७९ मध्ये सुरु केली होती. वन चाइल्ड पॉलिसीचे कठोरपणे चीनने पालन केले होते. सरकार ही पॉलिसी पालन करण्यासंदर्भात ऐवढी सक्रिय होती की, नियम मोडणाऱ्या परिवारावर दंडात्मक कारवाई केली जायची. त्याचसोबत काही प्रकरणांमध्ये लोकांच्या नोकऱ्या ही गेल्या.
चीन सुद्धा त्या देशांमध्ये सहभागी आहे जेथे संस्कृतित ऐतिसाहिक रुपात मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्व दिले जाते. या वन चाइल्ड पॉलिसीमुळे मोठ्या संख्येने जबरदस्तीने गर्भपात ही महिलांना करावा लागला. मात्र २०१६ मध्ये सुरु झालेल्या जन्म दरात घट रोखण्यासाठी ते अयशस्वी ठरले. चीनमध्ये गेल्या वर्षात पहिल्यांदाच जन्मापेक्षा अधिक मृत्यू झाले.
चीनी सरकार लोकसंख्या वाढवण्यावर देतेय भर
आता, चीनच्या दक्षिण पश्चिम मध्ये ८ कोटी लोकसंख्या असलेल्या सिचुआन प्रांतात मुलं जन्माला घालण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची सुद्धा जन्मदर वाढण्याला प्राथमिकता दिली आहे. सरकारने लोकसंख्या कमी होत असल्याने किंवा कमी करण्यसाठी काही गोष्टींमध्ये सूट आणि महिलेच्या आरोग्याच्या काळजी संदर्भात काही सवलती ही दिल्या आहेत.
हे अशावेळी समोर आले आहे जेव्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. येथे दररोज मृत्यू होत आहेत. डिसेंबरमध्ये झिरो-कोविड पॉलिसी बंद केल्यानंतर कोरोना व्हायरस शहरांत अधिक पसरला गेला.(China Sichuan Province)
हे देखील वाचा- उत्तर कोरियातील नागरिक घरात कैद, ‘या’ कारणास्तव हुकूमशाहने लावला लॉकडाऊन
चीनच नव्हे तर जापानसह त्यांच्या शेजारील देशांमध्ये ही जन्म दरात घट झाली आहे. युनाइटेड नेशंस पॉप्युलेशन डिविजन कडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १९८० मध्ये चीन प्रति हजार मुलांचा जन्म दर २० पेक्षा थोडा अधिक होता. जो २०२० मध्ये कमी होऊन १० च्या ही खाली आला आणि २०३० पर्यंत आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. तर भारताबद्दल बोलायचे झाल्यास १९८० मज्ये प्रति हजारावर हा दर ४० च्या खाली होता. मात्र २०२० मध्ये २० च्या खाली गेला. तसेच २०३० मध्ये फार कमी घट होण्याची शक्यता आहे.