सिद्धू मुसेवला याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. खरंतर सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा सचिन बिश्नोई (Sachin Bishnoi) याला अजरबेजान येथून अटक करण्यात आली आहे. सचिन बिश्नोई याने हत्येनंतर दावा करत होता की, त्याने आपल्या हाताने सिद्धू मूसेवालाची हत्या केली होती. त्यानंतर आपल्या जवळी आधुनिक हत्यारं असण्याचा सुद्धा दावा केला होता. खरंतर सचिन याने स्वत: ला लॉरेस बिश्नोई याचा नातेवाईक असल्याचे सांगत होता. या व्यतिरिक्त सचिनने फेसबुक ते मीडिया इंटरव्यू मध्ये सुद्धा विविध दावे केले आहेत. तर जाणून घेऊयात सचिन बिश्नोई नक्की कोण आहे आणि त्याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या दाव्याव्यतिरिक्त आणखी काय काय म्हटले आहे त्याबद्दल अधिक.
कसा पडकला गेला सचिन बिश्नोई?
सचिन याने मूसेवाला याची हत्या केल्यानंतर बनावट पासपोर्ट तयार करुन भारतातून पळ काढला होता. त्याने बनावट पासपोर्टवर आपले नाव तिलक राज टुटेजा असे लिहिले होते आणि हा पासपोर्ट दिल्लीतील संगम विहार परिसरातील एका पत्त्यावर तयार करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, सचिन हा पासपोर्टच्या आधारावर प्रथम दुबईला गेला आणि त्यानंतर तेथून अजरबेजान येथे गेला. त्यानंतर पंजाब पोलिस आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्याचा तपास सुरु केला आणि त्याला पकडले. असे सांगितले जात आहे की, सचिनचे काही साथीदार हे केनियात आहेत. मात्र असे ही म्हटले जात आहे की, तो हत्येपूर्वी परदेशात निघुन गेला होता.
कोण आहे सचिन बिश्नोई?
सचिन बिश्नोई (Sachin Bishnoi) याचे नाव सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर अधिक चर्चेत आले. त्याने स्वत:ला लॉरेंस बिश्नोई याचा चाहता असल्याचे सांगितले आणि दावा करत होता की, लॉरेंस त्याचा मामा आहे. स्वत:ला लॉरेंसचा भाचा सांगणारा सचिनने मूसेवाला याच्या हत्येसंदर्भात काही दावे केले आहेत. ऐवढेच नव्हे तर सचिन बिश्नोई याच्या नावाच्या एका फेसबुक आयडीमध्ये त्याच्या हातात एक बंदूक असल्याचा फोटो सुद्धा शेअर केला होता. त्यामधअये हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर त्याने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, मूसेवाला संदर्भात काही दावे केले आणि स्वत: बद्दल ही माहिती दिली होती.
असे सांगितले जात आहे की, तो पंजाब मधील फजिल्का येथे राहणारा आहे. लॉरेंस सुद्धा त्याच गावचा आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, सचिन बिश्नोई लॉरेंसची गँग ही बाहेरुन ऑपरेट करतो, त्याचे नाव सचिन थापन आहे आणि त्याच्या वडिलांचे नाव शिव दत्त आहे.
हे देखील वाचा- ऑस्ट्रेलियात स्वस्तिकवर का घातलीय बंदी? जाणून घ्या हिटलरचे हिंदू धर्मासोबत होते कनेक्शन?
काय केलेत सचिन बिश्नोईने दावे?
सचिन बिश्नोईने मूसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसानंतर एका न्यूज चॅनलला फोन करुन हत्येबद्दल सांगितले होते. त्याचसोबत काही दावे सुद्धा केले. त्या दरम्यान, सचिन याने असे म्हटले होते की, त्याने मोहाली मध्ये विक्की मिद्दूखेडाच्या भावाचा बदला घेतला आहे. त्याचसोबत सचिन याने असे म्हटले की, सिद्धू मूसेवाला याची हत्या कोणताही पब्लिसिटी स्टंट किंवा खंडणीच्या उद्देशाने केला नव्हता. आमचा उद्देश फक्त बदला घ्यायचा होता.
या व्यतिरिक्त त्याने असा ही दावा केला की, तो या हत्येमध्येच नव्हे तर त्यानेच मूसेवाला याला मारले आहे. आपल्या हत्यांरांच्याबद्दल ही त्याने सांगितले होते. जी हत्यारे हॉलिवूड मध्ये पाहतो तीच आमच्याकडे आहेत. तसेच सचिनने असे ही म्हटले की, आमच्या भावाची हत्या ज्या लोकांनी केली त्यांना आम्ही मारले आहे. जे बचावले आहेत त्यांना सुद्धा लवकरच संपवू . आमचे हे टार्गेट तुम्हाला लकरच कळतील.