भारतातील सर्वाधिक उंच कुतुब मीनारचे (Qutub minar) हिंदू मंदिरांसोबत कनेक्शन असल्याची चर्चा जोरदार होत होती. अशातच कुतुब मीनार, मंदिर अवशेष, पूजा करण्याची मागणी आणि २७ हिंदू मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याची मागणी सुद्धा चर्चेत आली होता. दरम्यान, यापूर्वा सुद्धा या मुद्द्यांवरुन बहुतांशवेळा वाद झाला होता. खरंतर आता विश्व हिंदू परिषदेने दावा केला आहे की, येथे आधी विष्णू स्तंभ होता. त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की, कुतुब मीनारच्या परिसरात प्रचीन मंदिरांची पुनर्निर्मिती करावी आणि तेथे हिंदू विधी पुन्हा सुरु करण्याची परवानगी द्यावी. तर जाणून घेऊयात कुतुब मीनारचे हिंदू धर्माशी काय आहे कनेक्शन आणि २७ हिंदू मंदिरांच्या दाव्यामागे नक्की काय कथा आहे त्याबद्दल अधिक. त्याचसोबत कुतुब मीनार संबंधित पूर्ण वाद काय आहे हे सुद्धा पाहूयात.
काय आहे वाद?
नुकत्याच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी कुतुब मीनार यांची दौरा केला होता. त्यामुळे वीएचपीच्या प्रवक्त्यांचे असे म्हणणे आहे की, हिंदू-देवी देवतांच्या मुर्त्यांची स्थिती पाहून हृदय पिळवटते. कुतुब मीनार हे २७ मंदिर उद्ध्वस्त करुन मिळालेल्या सामग्रीपासून तयार करण्यात आले होते. त्याचसोबत संघटनेने मागणी केली आहे की, त्या २७ मंदिरांची पुर्ननिर्मिती करावी आणि ज्यांना आधीच पाडले होते आणि हिंदूंना केखे पूजा करण्याची परवानगी द्यावी. अशा प्रकारची मागणी यापूर्वी सुद्धआ विविध संघटनांकडून करण्यात आली होती.
या व्यतिरिक्त कुतुब मीनारमध्ये ठेवण्यात आलेली भगवान गणेशाच्या मुर्तिवरुन सुद्धा वाद सुरु आहे. याआधी मागणी केली जात होती की, कुतुब मीनारमध्ये ठेवण्यात आलेली गणेशाच्या मुर्त्यांना सन्मानजक ठिकाणी किंवा संग्रहालयात ठेवल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त काही लोकांनी मागणी केली आहे की, मुर्त्या कुतुब मीनारमध्ये योग्य ठिकाणी ठेवून त्यांची पूजा-आरती केली पाहिजे. खरंतर कुतुब मीनारमध्ये मंदिर असणे आणि देवी-देवतांच्या मुर्त्या अयोग्य पद्धतीने ठेवण्याचा वाद हा जुनाच आहे.
हिंदु मुर्त्यांचे काय आहे प्रकरण?
खरंतर कुतुब मीनार परिसरात हिंदू देवतांच्या मुर्त्या आहेत. येथील गणपतीच्या मुर्त्यीवर वाद खुप वेळा झाला आहे. मंदिरात एक उल्टा गणेश आणि एका पिंजऱ्यात गणपती आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना अपमानित केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मशीद जवळच असल्याने खुप वाद सुद्धा झाला आहे. त्यामुळे त्याच मुर्त्यांची स्थानांतरण आणि पूजा करण्याची मागणी केली जात आहे.
२७ मंदिरांची कथा
असे म्हटले जाते की, कुतुब मीनार (Qutub minar) आणि त्याच्या शेजारी असलेल्या कुव्वत-उल-इस्लाम मशीदीच्या बांधकांमध्ये डझनभर हिंदू आणि जैन मंदिरांचे खाब आणि दगडांचा वापर केला होता. त्याचसोबत कुतुब मीनारच्या प्रवेश द्वारावर एक शिलालेख सुद्धा लिहिला आहे. त्यात असे म्हटले आहे की, ही मशीद अशा ठिकाणी बनवली आहे जेथे २७ हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष होते. अशातच हिंदू संघटनांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा पुन्हा या मंदिरे उभारली जातील आणि पूजा केली जाईल.
हे देखील वाचा- जगातलं सर्वात मोठं विष्णू मंदिर भारतात नाही, तर आहे ‘या’ देशामध्ये…
काय सांगतात इतिहासकार?
बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, इतिहासकार प्रोफेसर इरफान हबीब असे म्हणतात की, यामध्ये कोणताच वाद नाही की हा मंदिराचा हिस्सा आहे. पंरतु ही जी मंदिर होती, ती तेथेच होती किंवा आसपास होती. यावर चर्चा वारंवार झाली. या रिपोर्टमध्ये असे ही म्हटले की, कुतुब मीनार अॅन्ट इट्स मोन्युमेंट्स असे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आणि इतिहासकार बीएम पांडे असे मानतात की, जे मुळ मंदिर होती ती येथेच होती. जर तुम्ही मशीदीच्या पूर्वेकडून प्रवेश करता तर तेथे जे स्ट्रक्चर आहे ते खरे स्ट्रक्चर आहे.
दरम्यान, हे मीनार भारतातीलच नव्हे तर जगातील शानदार स्मारक आहे. दिल्लीतील पहिले मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबकने १२०० ई. मध्ये याची निर्मितीचे कार्य सुरु केले होते. परंतु त्यांनी ते अर्धवटच पूर्ण करु शकले. त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी अल्तमश याने त्याचे तीन मजले बनवले आणि १३६८ मध्ये फिरोजशाह तुगलकने याने पाचवा आणि अखेरचा मजला बनवला. कुतुब परिसरातील खंडरांध्ये ही कुव्वत-ए-इस्लाम मशीद आहे. कुतुबुद्धीन ऐबकने ११९३ मध्ये याची निर्मिती सुरु केली होती आणि ११९७ मध्ये तो पूर्ण झाला होता.