QR code scan tips- सध्या डिजिटल पेमेंटसाठी आपल्याला क्यूआर कोड हा दिला जातो. तर कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीने पैसे एखाद्या पाठवण्यासाठी किंवा पेमेंटसाठी विविध पेमेंट अॅपचा वापर खुप प्रमाणात करण्यात आला. सध्या तिकिट, फोन क्रमांक ते पैसे ट्रांन्सफर करण्यासह डेटा शेअर करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर वाढला आहे. मात्र क्यूआर कोड संबंधित नागरिकांच्या फसवणूकीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून ही अधिक वाढले आहेत. अशातच युएस फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन यांच्याकडून नागरिकांना क्यूआर कोड संबंधित महत्वाची माहिती दिली आहे. पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दलच जाणून घेऊयात. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
क्यूआर कोड स्कॅन करताना URL तपासून पहा
जेव्हा एखादा क्यूआर कोड स्कॅन करत असाल तेव्हा त्याची युआरएल तपासून पहा. म्हणजेच क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ज्या पेजवर नेले जाते ते तपासून पहा. एक फेक किंवा मॅलिसियस युआरएल टाइपो किंवा चुकीच्या शब्दांमध्ये असते. त्यामुळे क्यूआर कोडच्या युआरएलच्या माध्यमातून पेमेंट करताना सावधगिरी बाळगा.
क्यूआर कोडच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करु नका
जर तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करण्यापासून दूर रहा. कारण याच्या माध्यमातून मॅलिसियस अॅप डाऊनलोड होऊ शकतात आणि तुमच्या स्मार्टफोनमधील खासगी माहिती चोरी करु शकतात. त्यामुळे नेहमीच असा सल्ला दिला जातो की, तुमच्या फोनवर असलेल्या अॅप डाऊनलोडच्या अधिकृत अॅपमधून ते डाऊनलोड करावे. जसे की, गुगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोर.
छेडछाड करण्यात आलेल्या क्यूआर कोड पासून सावध रहा
फिजिकल क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी तुम्ही कंन्फर्म करा की, कोड सोबत कोणतीही छेडछाड करण्यात तर आलेली नाही ना? जसे की, खऱ्या कोडवर कोणता स्टिकर तर लावण्यात आलेला नाही ना? जर तुम्हाला क्यूआर कोड संबंधित संशय येत असेल तर तो पुन्हा एकदा तपासून पहा किंवा असा क्यूआर कोड स्कॅन करण्यापासून दूर रहा.(QR code scan tips)
पैसे रिसिव्ह करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणे
लक्षात असू द्या की, पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला जातो. पण पैसे एखाद्याकडून रिसिव्ह करण्यासाठी कधीच क्यूआर कोड स्कॅन केला जात नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे किंवा पेमेंटचा अशा पद्धतीचा मेसेज किंवा ईमेल आला असेल तर क्यूआर कोड स्कॅन करु नका.
हे देखील वाचा- फेसबुकच्या प्रायव्हेसी संदर्भात त्रस्त असाल तर ‘या’ टीप्स फॉलो करा
वेबसाइटचा वापर केल्यावर पेमेंट करु नका
कोणतीही वेबसाइट सुरु केल्यानंतर तेथे तुम्हाला क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करायला सांगितले असेल तर तसे करु नका. जर तुम्हाला क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करायचे असेल तर एका वॅलिड पेमेंट अॅपच्या माध्यमातूनच करा. जेव्हा तुम्हाला एखाद्या वेबसाइटच्या माध्यमातून पेमेंट करायचे असते तेव्हा प्रथम वेबसाइटची युआरएल तपासून जरुर पहा.