Home » जानेवारी महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट हिल्स स्टेशन

जानेवारी महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट हिल्स स्टेशन

यंदाच्या थंडीच्या दिवसात एखाद्या बर्फाळ ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर भारतातील काही हिल्स स्टेशनला नक्की भेट देऊ शकता. येथे केवळ स्नोफॉलच नव्हे तर तेथील निर्सगाच्याही प्रेमात पडाल.

by Team Gajawaja
0 comment
hill stations
Share

Hill Station in Winter : आज संपूर्ण जगभरात भारताच्या सौंदर्याचे गोडवे गायले जातात. येथे जंगल, नदी, डोंगर आणि अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे देशाचे नैसर्गिक रुप पाहण्यासाठी दूरदूरवरुन पर्यटक येतात. अशातच जानेवारी महिन्यात थंड वारे आणि थंडीची मजा घेण्यासाठी बहुतांशजण हिल्स स्टेशनला फिरायला जायचा प्लॅन करतात. यंदाच्या थंडीत सुट्टीची मजा घेण्यासाठी भारतातील काही हिल्स स्टेशनला भेट देऊ शकता. येथील निसर्गरम्य वातावरण आणि थंडी यामुळे ट्रिपची मजा दुप्पट नक्कीच होईल.

मनाली
थंडीच्या दिवसात बर्फाची चादर पर्वतांनी ओढल्याचे दृश्य मनाली येथे पहायला मिळेल. येथे मित्रांच्या ग्रुपसोबत योग, मेडिटेशन किंवा ट्रेकिंगची मजा घेऊ शकता. याशिवाय मनालीमधील काही हिडन प्लेसेस किंवा लक्ष्मण झूला आणि परमार्थ निकेतनसारख्या ठिकाणी भेट देऊ शकता.

ऋषिकेश
जानेवारी महिन्यातील थंडीच्या दिवसात योगाभ्यास, मेडिटेशन किंवा ट्रेकिंगसाठी ऋषिकेश बेस्ट ठिकाण आहे. येथील झरे आणि आजूबाजूच्या अॅडव्हेंचर गोष्टींमुळे तुमची ऋषिकेशची ट्रिप शानदार होऊ शकते.

Mussoorie: Hill station

कुर्ग
दक्षिण भारतातील कुर्गला भारतामधील स्कॉटलंड असे म्हटले जाते. हे ठिकाण कॉफीचे मळे, उंचच उंच डोगंर रांगा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय कुर्ग येथे वाइल्डलाइफ सफारी आणि झऱ्यांचा आनंद घेऊ शकता. (Hill Station in Winter)

नैनीताल
उत्तराखंडमधील नैनीताल जानेवारी महिन्यात बर्फ आणि धुक्यांमुळे अधिक सुंदर दिसते. नैनी झऱ्याच्या चहूबाजूंना वसलेल्या या शहरात पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. येथे झरे आणि आजूबाजूच्या ठिकाणी ट्रेकिंग करू शकता.


आणखी वाचा : 

Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं!

Goa : थोडा वेगळा Goa फिरायचाय ? मग ही ठिकाणं नक्की बघा !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.