Home » Aids Day : जागतिक एड्स दिनाचा इतिहास आणि माहिती

Aids Day : जागतिक एड्स दिनाचा इतिहास आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
World AIDS Day 2025
Share

जगभरात अनेक गंभीर जीवघेणे आजार आपल्याला आढळतात. यातलाच एक आजार म्हणजे ‘एड्स’. एड्स हे नाव ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर भीती निर्माण होते. एचआयव्ही एड्स हा जगभरातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. आजही या आजाराबद्दल लोकांमध्ये उदासीनता दिसून येते. आजच्या आधुनिक काळात सुद्धा या आजाराने ग्रस्त लोकांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. आजवर या आजारावर कोणत्याही एकदम प्रभावी औषध निर्माण झालेले नाही. एड्स हा एक धोकादायक आजार आहे, त्यावर प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि रोगांपासून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. हे एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होते. (Aids)

१ डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी एड्सबद्दल आणि एड्सपासून बचाव करण्याच्या उपायांबद्दल लोकांना जागरूक केले जाते. एड्सबाबत आपल्या समाजात अनेक समज किंबहुना गैरसमज आहेत, ज्याबद्दल लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. एड्सचा प्रसार कसा होतो, ते रोखण्याचे उपाय, त्याच्या चाचण्या, त्यासंबंधीचे समज इत्यादी माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात, ते दूर करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो. या दिवशी संपूर्ण समाजाला एकत्र येऊन एड्सशी लढण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. (Marathi News)

प्रथमच जागतिक एड्स दिन ०१ डिसेंबर १९८८ रोजी साजरा करण्यात आला. १९९६ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एचआयव्ही / एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि १९९७ मध्ये ‘जागतिक एड्स मोहिमे’अंतर्गत संसर्ग, प्रतिबंध आणि शिक्षण यावर काम करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जाऊ लागला. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे ३६ दशलक्ष लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. हे टाळण्यासाठी आणि रोखण्यासाठी लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. या उद्देशाने जागतिक एड्स साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. (Todays Marathi Headline)

World AIDS Day 2025

एड्स दिवस, जो आज संपूर्ण जग साजरा करत आहे, त्याची संकल्पना थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू. बन यांनी १९८७ मध्ये मांडली होती. थॉमस नेटर आणि जेम्स डब्ल्यू. बन हे दोघेही स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एड्स ग्लोबल प्रोग्रामसाठी सार्वजनिक माहिती अधिकारी होते. त्यांनी एड्स दिनाची त्यांची कल्पना डॉ. जोनाथन मुन जे एड्स ग्लोबल प्रोग्रामचे संचालक होते, त्यांना सांगितली. त्यांनी देखील या कल्पनेला मान्यता दिली आणि १९८८ पासून, १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.सुरुवातीला जागतिक एड्स दिन केवळ लहान मुले आणि तरुणांशी संबंधित होता, परंतु नंतर एचआयव्ही संसर्ग कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो असे आढळून आल्यानंतर १९९६ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि १९९७ पासून जागतिक एड्स मोहीम सुरू केली. (Latest Marathi News)

जागतिक एड्स दिन थीम २०२५
१ डिसेंबर रोजी, जागतिक आरोग्य संघटना (WHO) “व्यत्ययांवर मात करणे, एड्स प्रतिसादात परिवर्तन” या थीम अंतर्गत, २०२५ चा जागतिक एड्स दिन साजरा करण्यासाठी भागीदार आणि समुदायांमध्ये सामील होत आहे, २०३० पर्यंत एड्स संपवण्यासाठी शाश्वत राजकीय नेतृत्व, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानवाधिकार-केंद्रित दृष्टिकोनाचे आवाहन करत आहे. (Top Marathi News)

एड्स कसा पसरतो?
कोणत्याही वयातील व्यक्तीला एड्सची लागण होऊ शकते. एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थ रक्त, वीर्य, ​​योनीतून स्त्राव आणि आईच्या दुधातून सगळीकडे पसरतात. याशिवाय एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोमशिवाय लैंगिक संबंध ठेवल्यामुळे शरीराला विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा एचआयव्ही झालेल्या व्यक्तीच्या रक्ताने दूषित झालेल्या सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शनचा पुन्हा वापर केल्यास एड्सची लागण होऊ शकते. तसेच एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील इंफेक्शनमुळे सुद्धा एड्स आजाराची लागण होते. एचआयव्ही संक्रमित आईकडून तिच्या बाळाला गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणादरम्यान किंवा स्तनपानादरम्यान एड्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. (Latest Marathi Headline)

=======

Dry Begging : रिलेशनशिपमध्ये वाढत चाललेला ‘ड्राय बेगिंग’चा ट्रेंड! हे आहे मोठे रेड फ्लॅग

Blood Sugar : अचानक कमी होणारे शुगर लेवल कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांचे महत्त्वाचे इशारे

=======

एचआयव्ही (ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) हा एक विषाणू आहे जो माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो, त्याची संसर्गग्रस्त रक्त, योनीतील द्रव किंवा वीर्याद्वारे लागण होते. उपचार न केल्यास, विषाणूचा संसर्ग पुढच्या टप्प्यात जातो, ज्याची साधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी करता येते. यातला पहिला टप्पा तीव्र स्वरूपाचा एचआयव्ही संसर्ग, दुसरा टप्पा एचआयव्हीचा तीव्र संसर्ग तर तिसरा आणि अंतिम टप्पा हा एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) असा आहे. (Top Stories)

आतापर्यंत जगभरात सुमारे ९ कोटी लोकांना एड्सची लागण झाली असून, त्यापैकी सुमारे ४ कोटी १ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या आधारे एचआयव्ही एड्स ही सध्या जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जागतिक स्तरावर एचआयव्ही एड्सच्या संसर्गाबाबत लोकांना जागरूकता मिळावी आणि जनजागृती व्हावी आणि त्यासंबंधित गैरसमज आणि उपचारांची माहिती द्यावी या उद्देशाने दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.