एखादा सिनेमा हिट झाला की लगेचच त्या सिनेमातील मुख्य अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडी हिट होते आणि गाजते. काही जोड्या सिनेमा फ्लॉप झाला तरी देखील गाजतात बरं का. बॉलिवूडच्या जोड्या म्हटले की डोळ्यासमोर फक्त अभिनेता आणि अभिनेत्री हेच येतात. मात्र याव्यतिरिक्त देखील दोन अभिनेते, दिग्दर्शक-अभिनेता, संगीतकार आदी जोड्या देखील असतात. आजवरच्या बॉलिवूडच्या इतिहासात अनेक जोड्यांनी तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. मात्र एक अशी जोडी आहे, जिने लोकप्रियता, प्रसिद्धीसोबतच अनेक हिट सिनेमे देखील दिले. ही जोडी म्हणजे जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर. हो जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले. त्यांच्या जोडी खऱ्या आयुष्यासोबतच मोठ्या पडद्यावरही तुफान गाजली. अगदी जय आणि वीरू या जोडीला मिळालेले प्रेम अनिल आणि जॅकी यांना मिळाले. ( anil kapoor jackie shroff )

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या जोडीने ८०/९० च्या काळात अनेक हिट सिनेमे दिले. आणि एक सुपरहिट जोडी म्हणून नाव कमावले. ही जोडी सिनेमात असणार हे समजल्यावर सिनेमा हिट होणारच ही ग्यारंटी समजली जायची. हे दोघं जेवढे उत्तम माणूस होते तेवढेच उत्तम ते एक कलाकार होते. सिनेमातील आपला किंवा समोरच्याचा सीन उत्तम होण्यासाठी आणि खरा वाटण्यासाठी अनेक गोष्टी ते करायचे. त्यांची मैत्री इतकी पक्की होती की एका सीनसाठी जॅकी यांनी अनिल कपूर यांना तब्बल १७ वेळेस थोबाडीत मारली होती. काय होता नक्की तो किस्सा चला तर जाणून घेऊया. (Jackie Shroff)
=====
हे देखील वाचा – खलनायकी भूमिकांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सदाशिव अमरापूरकरांबद्दल अधिक माहिती
=====
या किस्स्याबद्दल खुद्द जॅकी श्रॉफ यांनीच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. हा किस्सा होता अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांच्या सुपरहिट ‘परिंदे’ या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेचा. काही महिन्यांपूर्वीच सिनेमाने ३० वर्ष पूर्ण केले. या सिनेमातील गाणी, कलाकाराचा अभिनय, कथा सर्वच तुफान गाजले. सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूर यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. या सिनेमात एका सीनमध्ये जॅकी यांना अनिल कपूर यांच्या थोबाडीत मारायची होती हा सीन ओके होण्यासाठी जॅकी यांना एक दोन नाही तब्बल १७ वेळा अनिल कपूर यांच्या गालात चापट मारावी लागली होती. (Jackie Shroff)

जॅकी श्रॉफ यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, “परिंदा सिनेमाच्या एका सीनमध्ये मला अनिलला गालात मारायचे होते. हा सीन शूट झाला आणि दिग्दर्शकांनी देखील त्याला ओके म्हटले. सेटवर जेवढे लोकं होते त्यांना देखील सीन आवडला. मात्र अनिल कपूर या सीनवरून खुश नव्हते. त्याला हा सीन अजूनच चांगला आणि जिवंत दिसावा असे वाटत होते. त्याने दिग्दर्शकांना रिटेक घेण्याबद्दल सांगितले. दिग्दर्शकांनी देखील त्याचे ऐकले आणि सीन रिटेक केला. त्यानंतर जोपर्यंत अनिल खुश होत नाही तोपर्यंत मी अनिल कपूरला गालात मारले. जेव्हा त्याला वाटले की, आता हा सीन योग्य झाला तोपर्यंत मी त्याला १७ वेळा गालात मारले होते.” (Jackie Shroff)
तत्पूर्वी जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी राम-लखन, त्रिमूर्ति, कर्मा, रूप की रानी चोरो का राजा, लज्जा, परिंदा, काला बाजार, कभी ना कभी, युद्ध आदी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. (Jackie Shroff)