इस्रायल आणि हमासमधील युद्ध ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाले. त्यापूर्वी हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला. यात १,२०० लोक मारले गेले आणि २५० हून अधिक लोकांना हमासनं ओलिस ठेवले. आपल्या ओलीसांना सोडवण्यासाठी आणि हमासच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मग इस्रायलनं गाझा शहरावर तोफगोळ्यांची बरसात केली. जवळपास अर्ध गाझा शहर जमिनदोस्त झालं तरीही हमासची ताकद कमी झाली नाही. इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांनी याचा शोध घेतला तेव्हा, या गाझा शहराचे भयानक वास्तव जगासमोर आले. हमासच्या दहशतवाद्यांनी भविष्यात गाझावर असेच भयानक हल्ले होणार आहे, हे गृहित धरुन मोठी योजना प्रत्यक्षात साकारली होती. (Israel vs Hamas)

ही योजना म्हणजे, गाझा शहराखालचे स्वतंत्र शहर. हमासनं जवळपास संपूर्ण गाझाच्या खाली एक शहर बांधले आहे. हमासनं इस्रायलच्या ज्या नागरिकांना ओलीस ठेवले होते, त्यांनाही याच जमिनीखालील बंकरमध्ये लपवून ठेवले होते. आता इस्रायलनं गाझा शहराखाली असलेले बंकर शोधून बुजवण्याचं काम सुरु केलं आहे. मात्र हे बंकरचे जाळे, हॉस्पिटल, शाळा, सरकारी कार्यालये यांच्या खाली बेमालुमपणे कसे उभारले गेले, हा प्रश्नही विचारला जात आहेत. यापैकी बहुधा सर्वच बंकर हे सर्व साधनसामुग्रीनं सुसज्ज असून त्यामध्ये महिनोमहिने सुरक्षित रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (International News)
हमास या दहशतवादी संघटनेचे वास्तव आता जगासमोर येत आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी या दहशतवादी संघटनेने अवघ्या गाझा शहराचा वापर केला होता. गाझा शहराच्या खाली या संघटनेनं बंकर तयार केले आहेत. मुख्य म्हणजे, हॉस्पिटल आणि शाळांच्या खालीही बंकर तयार करण्यात आले होते, याचा दहशतवादी खुलेपणानं वापर करीत होते. हमासनं इस्रालला ओलीस परत केल्यावर आता इस्रायली सुरक्षा यंत्रणा या बंकरची माहिती गोळा करत आहेत. त्यातून गाझा खाली एक मृत्युचे शहर असल्याची धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी गाझा शहराच्या खाली हमासने बांधलेले एका मोठ्या बोगद्याचे जाळे शोधून काढले आहे. हा बोगदा ७ किलोमीटर लांब आणि २५ मीटर खोल आहे. या भव्य बंकरमध्ये ८० खोल्या आहेत. (Israel vs Hamas)
याच बंकरमध्ये आता इस्रायली लष्कराला लेफ्टनंट हदास गोल्डिनचा मृतदेह सापडला आहे. आयडीएफने या कटात सहभागी असलेल्या हमासच्या एका दहशतवाद्यालाही अटक केली आहे. २०१४ च्या इस्रायल-हमास युद्धात प्रोटेक्टिव्ह एज दरम्यान लेफ्टनंट हदास गोल्डिन शहीद झाले होते. लेफ्टनंट हदास गोल्डिन हे आयडीएफच्या गिवती ब्रिगेडमधील २३ वर्षीय अधिकारी होते. १ ऑगस्ट २०१४ रोजी, ज्या दिवशी मानवतावादी युद्धबंदी लागू होणार होती, त्याच दिवशी त्यांना रफाहमध्ये अमानुषपणे मारण्यात आले. हमासने त्यांना एका बोगद्यात पकडले होते. मारल्यानंतर हमासनं त्यांचा मृतदेह इस्रायलाच्या ताब्यात देण्यासाठी टाळाटाळ केली होती. ११ वर्षात इस्रायली सरकारने लेफ्टनंट हदास गोल्डिनचा मृतदेह परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले होते. आता गाझाचा ताबा मिळाल्यावर इस्रायली सैन्यानं लेफ्टनंट हदास गोल्डिनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो मानानं इस्रायलमध्ये आणून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. (International News)

या सर्वात इस्रायल संरक्षण दलांनी गाझा पट्टीत हमासच्या बंकरचे हे मोठे नेटवर्क उघड केले आहे. या बंकरचा एक व्हिडिओच आयडीएफने सोशल मिडियावर शेअर करुन हमासचा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. यात रफाहच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागाखाली हे बोगदे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे बोगदे यूएनआरडब्ल्यूए कंपाऊंड, मशिदी, क्लिनिक आणि लहान मुलांच्या शाळाखालून नेण्यात आले आहे. हमासचे दहशतवादी या सर्वांचा शस्त्रे साठवण्यासाठी, हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी आणि दीर्घकाळ आश्रय घेण्यासाठी करीत असत. यामध्ये हमासचे कमांड सेंटरही बनवण्यात आले होते. या बंकरमध्ये सुमारे २५ मीटर खोल एकूण ८० लपण्याची ठिकाणे होती. यामध्येच काही ठिकाणी इस्रायलमधून अपहरण केलेल्या ओलीसांना हमासनं ठेवलं होतं. (Israel vs Hamas)
========
China VS Japan : तैवानवरुन चीन जपान युद्धाच्या उंबरठ्यावर !
========
याच सर्व बंकरचा शोध आता घेण्यात येत आहे. इस्रायलकडून सिमेंट यात भरून सर्व बंकर नष्ट करण्याचे काम सुरु आहे. यापैकी काही बंकरमध्ये अद्यापही हमासचे दहशतवादी असल्याची माहिती आली होती. इस्रायलनं त्यांना शरण येण्याचे आवाहन केल्यावर त्यांनी नकार दिला. त्यानंतर हे बंकरही सिमेंटनं भरल्याची माहिती आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
