Home » Sriram Krishnan : डोनाल्ड ट्रम्पचा श्रीराम !

Sriram Krishnan : डोनाल्ड ट्रम्पचा श्रीराम !

by Team Gajawaja
0 comment
Sriram Krishnan
Share

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये अजून एका भारतीय व्यक्तिचा समावेश झाला आहे. (Sriram Krishnan) या चेन्नईमधील इंजिनिअरनं ट्रम्प सरकारमध्ये आपले स्थान नक्की केले आहे. श्रीराम कृष्णन हे टेक कॅपिटलिस्ट म्हणून अमेरिकेत परिचित आहेत. एक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचे श्रीराम विश्वासू आहेत. एलॉन मस्क यांनी दिलेल्या सूचनेनुसार ट्रम्प यांनी श्रीराम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता व्हाईट हाऊसचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून श्रीराम कृष्णन काम पहाणार आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतांना याच श्रीराम यांनी मस्क यांना मार्गदर्शन केले होते. श्रीराम यांच्या हुशारीनं मस्क यांना प्रभावित केले आहे. आता त्याच श्रीराम यांच्या हुशारीची भुरळ डोनाल्ड ट्रम्प यांनाही पडली आहे. (Sriram Krishnan)

डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी ट्रम्प टीम तयार करत आहेत. या टीममध्ये अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश असून त्यात आता श्रीराम कृष्णन यांची भर पडली आहे. ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे उद्योजक आणि लेखक श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊसचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. (International News)

श्रीराम यांच्या नियुक्तीचे अमेरिकेतील भारतीय समुदायानं स्वागत केले आहे. एक्सचे एलॉन मस्क यांचे श्रीराम हे विश्वासू आहेत. त्यांच्याच शिफारशीनं ट्रम्प यांनी ही नियुक्ती केल्याची माहिती आहे. कृष्णन यांनी यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, याहू!, फेसबुक आणि स्नॅप मध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. आता ते व्हाईट हाऊसमध्ये डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत काम करणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील धोरण तयार करण्यात आणि समन्वय साधण्यास मदत करण्याची जबाबदारी आता श्रीराम यांच्यावर आहे. श्रीराम कृष्णन यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नाव मोठे आहे. अमेरिकेतील अनेक तंत्रज्ञान कंपनीमध्ये त्यांनी सल्लागाराची भूमिका पार पाडली आहे. भारतीय समुदायामध्येही श्रीराम कृष्णन प्रसिद्ध आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे श्रीराम हे चेन्नईमधील एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. ट्रम्प सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी आल्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. (Sriram Krishnan)

देशाची सेवा करण्याची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानात अधिक प्रगती करण्याची ही संधी माझ्यासाठी मोलाची असलेली प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेक भारतीयांना आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. भारतीय वंशाच्या काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. इलॉन मस्क यांच्यासह विवेक रामास्वामी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हरमीत ढिल्लन आणि जय भट्टाचार्य न्याय विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थांमध्ये संभाव्य महत्त्वाच्या भूमिकांसाठी तयारी करत आहेत. या यादीमध्ये आता श्रीराम कृष्णन यांचे नाव समाविष्ठ झाले आहे. (International News)

श्रीराम कृष्णन यांचा जन्म चेन्नईचा आहे. त्यांचे वडिल विमा क्षेत्रात काम करणारे आहे. त्यांची आई गृहिणी असून श्रीराम यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. श्रीराम यांनी संगणकाची मागणी केल्यावर त्यासाठी वडिलांनी कर्ज घेतल्याची आठवण ते सांगतात. श्रीराम यांनी अण्णा विद्यापीठाच्या एसआरएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक केले. त्यानंतर अमेरिकेत आलेल्या श्रीराम यांनी 2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांना कोडींगमध्ये सुरुवातीपासून आवड होती. यातूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्यांनी प्राविण्य संपादन केले. (Sriram Krishnan)

=======

हे देखील वाचा : Uttar Pradesh : संभळच्या बावडीचे रहस्य !

Pushpa : पण तेलुगू पुष्पा चक्क ‘मराठी’ कसा काय झाला ?

=======

श्रीराम कृष्णन यांनी सत्या नडेला, मार्क झुकरबर्ग यांसारख्या अनेक दिग्गजांसह काम केले आहे. क्रिप्टोमध्ये त्यांना श्रीरामविशेष रस असून यासंदर्भात ते एलॉन मस्क यांनाही सल्ला देतात, अशी माहिती आहे. याशिवाय  हे लेखक म्हणूनही परिचित आहे. भारतीय संगीताची त्यांना आवड आहे. सध्या श्रीराम हे अँड्रीसेन हॉरिविट्झ नावाच्या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये भागीदार आहेत. 2017 पासून श्रीराम हे एलॉन मस्क यांच्याबरोबर काम करत आहेत. ट्विटरमध्ये त्यांनी मुख्य ग्राहक उत्पादन संघाचे नेतृत्व केले आहे. श्रीराम कृष्णन यांनी इलॉन मस्क यांना ब्लू-टिकच्या बदल्यात पैसे घेण्याचा सल्ला दिला होता. ट्विटर विकत घेतल्यानंतर, त्याच्या नवीन सेटअपमध्ये श्रीराम कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता तेच श्रीराम ट्रम्प यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात मदत करणार आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.