रामनगरी अयोध्येमध्ये अभिजित मुहूर्तावर ध्वजारोहण समारंभ थाटात संपन्न झाला. हा सर्व समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या समारंभाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकुलातील सप्तऋषी मंदिराला भेट दिली आणि सर्व ऋषींची पूजा केली. या मंदिरांमध्ये वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांचा समावेश आहे. हे सप्तऋषी मंदिर म्हणजे, भगवान श्रीरामांच्या जीवनातील सात प्रमुख टप्पे आहेत. आता हे सात टप्पे भाविकांनाही बघता येणार आहेत. (Ayodhya)

अयोध्येतील विस्तीर्ण राम मंदिर संकुलात सप्तऋषी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांची मंदिरे आहेत. या सप्त मंदिरांमध्ये भगवान रामाचे गुरु, भक्त आणि मित्र यांचा समावेश आहे. सप्त ऋषींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि त्यांना वैदिक धर्माचे रक्षक मानले जाते. शास्त्रांमध्ये उल्लेख केलेल्या सात ऋषींमध्ये कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, गुरु वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी आणि भारद्वाज ऋषी यांचा समावेश आहे. हे ऋषी भगवान ब्रह्मदेवाच्या मनातून उद्भवले, असे सांगण्यात येते. या ऋषींकडे वेद, पुराणे आणि ज्योतिषशास्त्राचे प्रचंड ज्ञान होते. यात पहिला मान मिळतो तो महर्षि वशिष्ठ यांना. महर्षि वशिष्ठ हे भगवान रामाचे राजगुरु आणि राजा दशरथ यांचे कुलगुरु होते. महर्षि वशिष्ठ यांना भगवान ब्रह्मदेवाचे मानसिक पुत्र म्हणूनही ओळखले जाते. ते भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाचे द्रष्टा आणि एक महान तपस्वी होते. राम, लक्ष्मण, भरत त्यांनी भगवान रामांना वेद, शास्त्र आणि नीतिशास्त्र शिकवले. सोबतच महर्षि वशिष्ठ राजा दशरथांनाही मार्गदर्शन करत असत. (Social News)
महर्षि विश्वामित्र हे सुद्धा श्रीरामांचे गुरु होते. त्यांनी भगवान राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांना शस्त्रे, शस्त्रे आणि दैवी शस्त्रे शिकवली. महर्षि विश्वामित्र हे क्षत्रिय होते त्यांनी तपश्चर्येद्वारे ब्रह्मऋषी ही पदवी प्राप्त केली होती. त्यांनीच श्रीराम आणि लक्ष्मण यांना सीतेच्या स्वयंवरात नेले. येथेच रामांनी शिवाचे धनुष्य तोडले आणि माता सीतेसोबत त्यांचा विवाह झाला. रामायणानुसार, जेव्हा भगवान राम १४ वर्षे वनवासात होते, तेव्हा त्यांची अगस्त्य मुनींसोबत पहिल्यांदा भेट झाली. अगस्त्य मुनींनीच भगवान रामांना रावणाचा वध करण्यासाठी दैवी शस्त्र दिल्याचे सांगितले आहे. यामध्ये धनुष्य, बाणांचा भाता, तलवार आणि एक अचुक कवच यांचा समावेश होता. लंका विजयातही श्रीरामांना अगस्त्य मुनींनी मार्गदर्शन केले. (Ayodhya)
या सप्तऋषी मंदिरामध्ये महर्षि वाल्मिकी यांचाही समावेश आहे. भगवान रामाची कथा महर्षि वाल्मिकीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. माता सीता यांना महर्षि वाल्मिकी यांच्या आश्रमात आश्रय घेतला. तिथे असताना त्यांना लव आणि कुश ही जुळी मुले झाली. महर्षि वाल्मिकींनीच लव आणि कुशांना शस्त्रे, शास्त्रे आणि वेदांचे ज्ञान दिले. प्रभू श्रीरामांच्या जीवनात मित्राचे स्थान मोठे होते. हा त्यांचा मित्र म्हणजे, नाविक निषादराज गुहा. श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांना नाविक निषादराज यांनी आपल्या नावेतून गंगा नदी पार करून दिली. त्याआधी, निषादराज गुहा यांच्या गावात प्रभू श्रीरामांनी रात्री मुक्काम केला. (Social News)

यावेळी निषादराज यांनी प्रभू श्रीरामांची एवढी सेवा केली की, हे दोघे मित्र झाले. पुढे वनवासाहून परत आल्यावर श्रीराम यांनी निषादराज यांना अयोध्येला बोलवून त्यांचा मोठा सत्कार केला. वनवासात माता शबरी आणि प्रभू राम, लक्ष्मण यांची भेट झाली, तो प्रसंग सर्वच रामभक्तांना भावूक करणार आहे. जेव्हा माता शबरीला कळले की, राम त्यांच्या वनाच्या भागातून जाणार आहेत, तेव्हा त्यांनी प्रभू श्रीरामांसाठी बोरं गोळा केली. पण प्रभूंना आंबट बोरं खायला लागू नयेत, म्हणून ती बोरं आधी चाखून त्यातली गोड बोरं बाजूला काढली आणि तिच प्रभू श्रीरामांना खायला दिली. ही कथा भक्ती कशी असावी याचे उदाहरण म्हणून सांगितली जाते. (Ayodhya)
========
Alaska : या देशात सूर्यदर्शन आता ६५ दिवसांनी होणार… !
========
या सप्तऋषी मंदिरात आणखी एका देवीचे स्थान आहे, ते म्हणजे देवी अहिल्या. वनवासात असताना, प्रभू राम गौतम ऋषींच्या आश्रमात गेले तेव्हा त्याचे पाय दगडात रूपांतर झालेल्या अहिल्येला लागले. त्यावेळी देवी अहिल्या शापापासून मुक्त झाल्या. त्यामुळे माता अहिल्या यांचा समावेशही या सप्तऋषी मंदिरात आहे. आता हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून सप्तऋषींची परंपरा यातून भाविक जाणून घेणार आहेत. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
