वृंदावनचे श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज(Premanand) ज्यांना प्रेमानंद महाराज म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यांची एखादी रील तुमच्या फीडवर आलीच असेल. त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी दिग्गज अभिनेते, खेळाडू, गायिका दूरदूरहून येतात. संपूर्ण जगभरात त्यांचे लाखों भक्त आहेत. लोक आयुष्यात पडलेले कठीण प्रश्न घेऊन त्यांच्या आश्रमात येत असतात. पण त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना वृंदावनच्या स्थानिक लोकांचा विरोध सहन करावा लागतो आहे. त्यांच्या प्रसिद्ध पदयात्रेचा विरोध करत त्यांना ‘कौन सी भक्ति, कौन सा दर्शन ये तो केवल शक्ति प्रदर्शन,’ असे वाक्य लिहिलेले फलक दाखवले जात आहेत. लोकप्रिय असणाऱ्या प्रेमानंद महाराजांना स्थानिकांकडूनच विरोध का सहन करावा लागतोय? हे जाणून घेऊ.(Marathi News)
प्रेमानंद महाराज (Premanand) यांच्या आश्रमात हजारो भाविक येत असतात. पण प्रत्येकाला त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायला मिळतेच असं नाही. त्यामुळे प्रेमानंद महाराज रात्री २ वाजता त्यांच्या घरापासून आश्रमापर्यंत एक पदयात्रा करतात. यावेळी हजारो भाविक प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहतात. आता यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. पण रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश आणि भाविकांनी फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजासह भजनांच्या सुरांमुळे या रस्त्यात घर असणाऱ्यांची झोप उडाली आहे. या रसत्यातीलच एनआरआई ग्रीन कॉलनीतील लोकांनी या पदयात्रेचा विरोध सुरू केला. कॉलनीतील महिलांनी ‘ध्वनि प्रदूषण, कुठली भक्ति, कुठलं दर्शन, हे तर फक्त शक्ती प्रदर्शन’ असे फलक दाखवत पदयात्रेला विरोध केला. रात्रीची झोपच नाही, तर या पदयात्रेच्या वेळेस कॉलनीतून कोणाला बाहेर निघता किंवा आत शिरता येत नाही. (Premanand)
कॉलनीतील रहिवाशांच्या निषेधाबाबत, आश्रमाने म्हटले आहे की पदयात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला उभे राहून भजन गाणाऱ्या भाविकांचा संत प्रेमानंदांच्या अनुयायांशी किंवा आश्रमाशी काहीही संबंध नाही. बऱ्याच वेळा, पदयात्रे दरम्यान कोणत्याही प्रकारचा आवाज करू नये असं आव्हान करून ही लोक लाऊडस्पीकरवर भजन गातात.(Latest Update)
या सगळ्या प्रकरणानंतर प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काम करणाऱ्या लोकांनी प्रेमानंद महाराजांविरुद्ध निदर्शन करणाऱ्या सर्वांशी चर्चा केली आणि नंतर प्रेमानंद महाराजांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वृंदावन रास महिमा वरून कळवण्यात आलं की, प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणि वाढत्या गर्दीमुळे रात्री निघणारी पदयात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. यामुळे स्थानिक खुश असले तरी लांबून लांबून प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी येणारे भाविक नाराज आहेत. (Premanand)
===============
हे देखील वाचा : Indonesia : इंडोनेशियातील मुरुगन मंदिरामुळे पाकिस्तानात संताप !
===============
प्रेमानंद महाराज (Premanand) हे त्यांच्या भविकांच्या प्रश्नांचे उत्तर खूप आध्यात्मिक आणि सोप्या पद्धतीने देतात, ज्यामुळे ते हळूहळू चर्चेत आले. त्यानंतर अनेक सेलेब्रिटीसुद्धा त्यांचे भक्त झाले. आता त्यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, त्यांच्या भजन मार्ग या यूट्यूब चॅनेलला १ कोटी पेक्षा जास्त लोकांनी subscribe केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या काम करत नाहीत. ते दिवसभर डायलिसिसवर असतात. अनेक भक्त त्यांना किडनी दान करू इच्छितात, पण त्यांनी सर्वांना नकार दिला आहे.(Premanand)
आता त्यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक लोक वृंदावनच्या मंदिरांच दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी येतात. या जमलेल्या भाविकांमुळे रात्रीचा स्थानिक नागरिकांना त्रास होत होता, जो आता पदयात्रा बंद केल्यामुळे होणार नाही आहे. ही स्थानिकांसाठी समाधानाची गोष्ट आहे. शेवटी भक्तीही खाजगी गोष्ट आहे, आपल्या भक्तीमुळे इतरांना त्रास होतं असेल तर ती चुकीचीच गोष्ट आहे, नाही का?