एखादं मूल नॉर्थ कोरियात जन्माला येतं. पण जन्माला येताच त्या निरागस बाळाला देशद्रोही ठरवलं जातं. नॉर्थ कोरिया जगात सगळ्यात विचित्र वेडसर आणि कडक कायद्यांसाठी ओळखला जाणारा देश, या देशातील काही कायदे इतके विचित्र आहेत की त्यावर विश्वास ठेवणं पण कठीण आहे. म्हणजे, इथं निवडणूक होते, पण मत देण्यासाठी दुसरा पर्यायच नसतो. मत फक्त एकाच माणसाला द्यावं लागतं, आणि जर दिलं नाही तर थेट तुरुंगात. इथं टीव्हीवर फक्त एकच चॅनल लागतं आणि चॅनल बदलण्याचा ऑप्शनच नाही. नॉर्थ कोरिया हा कदाचित जगातला एकमेव असा देश आहे जिथं सरकारच्या नियमांनुसार वागलं नाही तरी डायरेक्ट तुरुंगात जावं लागतं. नॉर्थ कोरियाच्या अशाच विचित्र आणि कडक नियमांबद्दल जाणून घेऊ. (North Korea)
नॉर्थ कोरियाची गोष्ट सांगायची झाली तर 1945 पर्यंत जपानने संपूर्ण कोरियावर 35 वर्षं राज्य केलं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर कोरिया दोन भागात विभागला गेला. नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. नॉर्थ कोरियावर सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता, तर साऊथवर अमेरिकेचा. 1948 मध्ये किम इल-सुंग नावाचा माणूस नॉर्थ कोरियाचा लीडर बनला, आणि तिथून सुरू झाली किम राजवट. नॉर्थ कोरिया बनला डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया. पण इथं डेमॉक्रसी नावाची गोष्ट कधी जन्मालाच आली नाही. नॉर्थ कोरियात सत्ता टिकवण्यासाठी आजपर्यंत फक्त एकाच कुटुंबाचं राज्य आहे. सुरुवातीला किम इल-सुंग, मग किम जॉंग-इल आणि आता किम इल-सुंगचा नातू किम जॉंग-उन. प्रत्येक लीडरने आपली खुर्ची वाचवण्यासाठी सगळ्यात कडक कायदे या देशावर लादले. इथं भीती आणि शिक्षेच्या जोरावर लोकांना दडपण्यासाठी अनेक नियम बनवले गेले, जेणेकरून लोक साऊथ कोरिया किंवा वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाखाली येऊन सरकारविरुद्ध बंड करू नयेत. (Top Stories)
आता लेटेस्ट 2024 मध्ये नॉर्थ कोरियाने सनग्लासेस वापरण्यावर आणि लग्नाच्या ड्रेसवर बंदी घातली. इथं मेट्रो किंवा पब्लिक स्टेशनवर म्युझिक नाही, तर किम कुटुंबाच्या स्पीचेस लावल्या जातात आणि त्यावेळी कोणालाही एकमेकांशी बोलायला किंवा गोंगाट करायला परवानगी नाही. नॉर्थ कोरियात जर कोणी साऊथ कोरियन ड्रामा सीरियल्स किंवा हॉलिवूड सिनेमे पाहताना सापडलं, तर त्याला लेबर कॅम्पमध्ये जावं लागतं किंवा कठोर शिक्षा भोगावी लागते. नॉर्थ कोरियात सामान्य लोकांना इंटरनेट नाही, फक्त इंट्रानेट वापरण्याची परवानगी आहे. हे एक असं बंद नेटवर्क आहे जे फक्त नॉर्थ कोरियातच चालतं. या नेटवर्कवरही सरकारची नजर असते. लोक काय बघतायत, काय वाचतायत, काय बोलतायत, हे सगळं मॉनिटर केलं जातं. यामुळे सरकार लोकांपर्यंत पोहोचणारी माहिती नियंत्रित करते, जेणेकरून त्यांच्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव पडू नये. (North Korea)
नॉर्थ कोरियात सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात फोन करणंही बेकायदेशीर आहे. म्हणजे, जर तुम्हाला देशाबाहेर कोणाशी बोलायचं असेल, तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. इथं टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रं फक्त सरकारच चालवू शकतं. खासगी मीडियाचा विचार करणंही शक्य नाही. या मीडियावर फक्त सरकारची स्तुती, किम राजवटीचं कौतुक आणि परदेशी शत्रू, जसं की अमेरिका, यांचा उल्लेख असतो. इथल्या सामान्य लोकांच्या मनात लहानपणापासूनच अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांविरुद्ध तिरस्कार भरला जातो.

नॉर्थ कोरियात सरकार लोकांच्या हेअर स्टाइल्सवरही कडक नियंत्रण ठेवतं. सरकारने काही खास हेअर स्टाइल्सला परवानगी दिली आहे. म्हणजे लोकांना सांगितलं जातं की त्यांनी कोणते हेअर स्टाइल्स करायचे किंवा नाही. इथं बाहेरच्या जगाचा प्रभाव असलेली कोणतीही गोष्ट बॅन आहे, जसं की जीन्स घालणं, केस रंगवणं किंवा चमकदार कपडे घालणं. असं करणाऱ्याचं सामान जप्त केलं जातं आणि शिक्षा दिली जाते. कपड्यांपासून ते आवडीचं जेवण खाण्यापर्यंत सगळं बॅन. (North Korea)
त्यावर म्हणजे एक शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीही परमिट लागतं. त्याशिवाय प्रवास बेकायदेशीर मानला जातो. नॉर्थ कोरियन पासपोर्ट फक्त उच्चवर्गीय लोकांना मिळतो, जसं की सरकारी अधिकारी आणि किम जॉंग-उन यांचे जवळचे सहकारी. सामान्य जनता स्वप्नातही नॉर्थ कोरियातून बाहेर जाऊ शकत नाही. नॉर्थ कोरियात जमीन, घर, दुकान, व्यवसाय सगळं सरकारच्या मालकीचं असतं. कोणीही याचं मालक होऊ शकत नाही, फक्त सरकारच्या परवानगीने लोकं ते वापरू शकतात. इथं कोणताही धर्म पाळणं किंवा त्याचा प्रचार करणं बेकायदेशीर आहे. म्हणजे, लोक आपल्या मर्जीने कोणताही धर्म स्वीकारू शकत नाहीत. नॉर्थ कोरियात चर्चेस आहेत, पण ती फक्त बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी की इथं धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्यक्षात त्यांचा वापर करणाऱ्याला लेबर कॅम्पला पाठवलं जातं. (Top Stories)
नॉर्थ कोरियात जर कोणी सरकारविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला किंवा किम राजवटीविरुद्ध आवाज उठवला, तर फक्त त्यालाच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकलं जातं. आणि ही शिक्षा त्याच्या तीन पिढ्यांपर्यंत लागू होऊ शकते. म्हणजे, जर एखादा व्यक्ती देशद्रोही ठरला आणि काही वर्षांनी त्याचा नातू किंवा नात जन्माला आली, तर त्या निरागस बाळालाही देशद्रोहीच म्हटलं जाईल. हे असं यासाठी की बंडाचा प्रयत्न त्या कुटुंबातून भविष्यातही किम कुटुंबाविरुद्ध उठू नये म्हणून. (North Korea)
नॉर्थ कोरियात प्रत्येकाला मत देणं बंधनकारक आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मत फक्त सरकारला हव्या त्या व्यक्तीलाच द्यावं लागतं. म्हणजे, इथं निवडणुकीत जनता मत देऊन आपला लीडर निवडत नाही. फक्त एकाच उमेदवाराला मत दिलं जातं, आणि जो मत द्यायला येत नाही, त्याला देशद्रोही समजलं जातं. मग निवडणूक तरी का होते, जेव्हा सरकारलाच आपले लोक उभे करायचे आहेत? खरं तर इथली निवडणूक ही निवडणूक नसते, तर निष्ठेची चाचणी असते. जेव्हा 100% लोक एकाच उमेदवाराला मत देतात, तेव्हा सरकारला ही आपली ताकद आणि जनतेची एकजूट वाटते. इथं नॅशनल असेंबली आहे, ज्याला सुप्रीम पीपल्स असेंबली म्हणतात, पण तिचं काम निर्णय घेणं नाही, तर फक्त किम जॉंग-उन यांच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणं एवढंच आहे.
नॉर्थ कोरियात प्रत्येक टीव्ही सेट फक्त सरकारी चॅनल्स, जसं की कोरियन सेंट्रल टेलिव्हिजन, यावर सेट केला जातो. याचा अर्थ, लोक आपल्या मर्जीने चॅनल्स बदलू शकत नाहीत. इथे सायकललाही गाड्यांसारखी रजिस्ट्रेशन आणि नंबर प्लेट लागते. सायकल चालवण्यासाठी रोड सेफ्टी टेस्ट पास करावी लागते आणि लायसन्सही घ्यावं लागतं. नॉर्थ कोरियाचे कडक नियम फक्त नागरीकांवरच नाही तर इथे येणाऱ्या टुरिस्टवर सुद्धा लागू केले जातात. टुरिस्टसोबत गाइड compulsory असतं, नॉर्थ कोरियन सरकारने सांगितलेल्या ठिकाणांनाच टुरिस्ट भेट देऊ शकतात. टुरिस्ट कोणत्याही स्थानिकाशी बोलण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा खुलेआम फोटो काढू शकत नाही. आणि जर टुरिस्टला एखाद्या नागरिकाची मुलाखत घ्यायची असेल, तर त्याला टूर गाइडची परवानगी घ्यावी लागते. (North Korea)
================
हे देखील वाचा : Eiffel Tower : असा नटवरलाल ज्याने आयफेल टॉवर विकला, तेही दोनदा…
================
नॉर्थ कोरियात नागरिकांच्या वर्गाची एक अत्यंत अमानवीय जाती व्यवस्थे सारखी व्यवस्था आहे, ज्याला सॉन्ग बुन म्हणतात. या सिस्टम अशी की इथं मूल जन्माला येतं, तेव्हाच त्याच्या आयुष्याचा निर्णय होतो आणि हे सगळं त्याच्या घराण्याच्या इतिहासावर अवलंबून आहे! उदाहरणार्थ, इथं तीन वर्ग आहेत – कोर, वेव्हरिंग आणि हॉस्टाइल. पहिल्या वर्गाला कोर म्हणतात. हा वर्ग म्हणजे सरकारचे लाडके! यात त्या लोकांचा समावेश असतो ज्यांच्या पूर्वजांनी किम इल-सुंगच्या क्रांतीत भाग घेतला होता किंवा जे कोरियन वॉरचे सैनिक होते. यांना सरकारचे सर्वात निष्ठावान समजलं जातं. यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. यांना उत्तम नोकऱ्या दिल्या जातात, जसं की सरकार किंवा लष्करात उच्च पदं, आणि राजधानी प्योंगयांगमध्ये राहण्याची परवानगी आणि गाड्या ठेवण्याचा अधिकार फक्त याच वर्गाला आहे. (Top Stories)
दुसरा वर्ग आहे वेव्हरिंग किंवा डोंगियो की जंग. हे आहेत नॉर्थ कोरियाचे मिडल क्लास. यांचे पूर्वज सामान्य शेतकरी किंवा मजूर होते. ज्यांचा भूतकाळ सरकारच्या नजरेत ना खूप चांगला होता, ना वाईट. यांना नॉर्थ कोरियात मध्यमवर्गीय सुविधा मिळतात. आणि तिसरा वर्ग आहे हॉस्टाइल, ज्याला जोकटाई कीचिंग म्हणतात. यात त्या लोकांचा समावेश होतो ज्यांचे पूर्वज कधी ना कधी कोणत्या धर्माचे अनुयायी होते किंवा साऊथ कोरियाशी त्यांचं काहीतरी कनेक्शन होतं. नॉर्थ कोरियन सरकार यांना देशद्रोही समजतं आणि त्यांना समाजात सगळ्यात खालचा दर्जा दिला जातो. यांना सगळ्यात वाईट नोकऱ्या, जसं की खाणीत काम, मजुरी किंवा स्वच्छतेचं काम, दिलं जातं. नॉर्थ कोरिया जगापासून इतका कट ऑफ आहे की त्यांचं कॅलेंडरही वेगळं आहे, ज्याला जूस कॅलेंडर म्हणतात. जूस कॅलेंडर 1912 पासून सुरू झालं, जो इथला सुप्रीम लीडर किम इल-सुंगचं जन्मवर्ष आहे. म्हणजे, 1912 हे नॉर्थ कोरियात जूस वन मानलं जातं आणि आज 2025 मध्ये तिथं 113 वं वर्ष सुरू आहे. (North Korea)
आता वरील सांगितलेले काही नियम कदाचित थांबवले ही गेले असतील किंवा आज त्यापेक्षा जास्त कठोर नियम बनले असतील. पण त्याची माहिती बाहेत पोहचत नाही. नॉर्थ कोरिया जगापासून इतकं कट ऑफ आहे की, तिथे राहणाऱ्या माणसांचं दु:खं सुद्धा इतर देशांपर्यंत पोहचत नाही. अनेक लोक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण मारले जातात किंवा पकडले जातात.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
