मार्गशीर्ष हा कृष्णाला समर्पित असलेला महिना आहे. याच महिन्यात येणाऱ्या एकादशीला मोठे महत्त्व प्राप्त आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. सर्व एकादशींमध्ये मोक्षदा एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. याचे कारण म्हणजे या एकादशीच्या दिवशी महाभारताच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. म्हणून, दरवर्षी मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती हे सण एकाच दिवशी साजरे केले जातात. या एकादशीच्या नावातच मोक्ष आहे, त्यामुळे मोक्षदा एकादशीला विष्णूची पूजा आणि उपवास करणाऱ्यांना वैकुंठाचे दरवाजे उघडले जातात अशी मान्यता आहे. या लोकांना मृत्युनंतर मोक्ष मिळतो. म्हणूनच मोक्षदा एकादशीचे व्रत आणि पूजा महत्त्वाची मानली जाते. (Mokshada Ekdashi 2025)
पंचांगानुसार, यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात ३० नोव्हेंबर रविवार रोजी रात्री ०९.२९ वाजता होत आहे. तर या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर रोजी सकाळी ०७.०१ वाजता होणार आहे. उदय तिथीला असलेल्या महत्त्वानुसार मोक्षदा एकादशी ही १ डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी गीता जयंती असल्याने विष्णूसोबतच देवी लक्ष्मीची पूजा करणे देखील लाभदायक ठरते. (Marathi News)
मोक्षदा एकादशी पूजा पद्धत
एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामांतून निवृत्त होऊन स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घाला. नंतर भगवान विष्णूचे ध्यान करून व्रत करण्याचा संकल्प करा. आता पूजा सुरू करा. सर्वप्रथम भगवान विष्णूंना पाण्याने, पंचामृताने स्नान करावे. त्यानंतर फुले, हार, सुगंध, पिवळे चंदन, अक्षत इत्यादी अर्पण करून फळे, मिठाई इत्यादी अर्पण करून जल अर्पण करावे. यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून मोक्षदा एकादशी व्रत कथेसह श्री विष्णु मंत्र आणि चालिसा पाठ करा. शेवटी भगवान विष्णूची आरती करावी. यासोबतच दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून विष्णूची पूजा करून उपवास सोडावा. (Todays Marathi Headline)

मोक्षदा एकादशी मंत्र
या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या खालील मंत्रांचा जप अवश्य करावा. याने अनेक लाभ तुम्हाला होतील.
ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
ॐ भूरिदा भूरि देहिनो , मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि । ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
ॐ अं वासुदेवाय नम:।। ॐ आं संकर्षणाय नम:।। ॐ अं प्रद्युम्नाय नम:।। ॐ अ: अनिरुद्धाय नम:।।
ॐ नारायणाय नम:।।
ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान। यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्यते।।
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।। (Marathi News)
मोक्षदा एकादशीच्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये
एकादशीच्या आदल्या रात्री सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नका. झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करा किंवा मंत्राचा जप करा. व्रताच्या दिवशी मन पूर्णपणे शांत ठेवा आणि कोणाबद्दलही राग किंवा नकारात्मक भावना ठेवू नका. चुकूनही कोणाची निंदा करू नका. मोक्षदा एकादशीला धान्य खाण्यास मनाई आहे. सायंकाळच्या पूजेनंतर फळे खाऊ शकता. जर तुम्ही व्रत करू शकत नसाल, तर किमान भात खाऊ नका. रात्री जागरण करून भजन-कीर्तन करणे शुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडा आणि गरीबांना भोजन दिल्यानंतरच भोजन करा. (Latest Marathi Headline)
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला ‘मोक्षदा एकादशी‘ तसेच ‘मोक्षदायिनी एकादशी’ साजरी केली जाते. या दिवशी पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील. ही एकादशी माणसाला त्याच्या पापांपासून मुक्त करते आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते. या दिवशी पितरांचे व्रत आणि पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी भावना आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला भगवद्गीतेचा उपदेश केला, म्हणून हा दिवस गीता जयंती म्हणूनही महत्त्वाचा आहे असे पुर्वापार सांगितले जात आहे. या व्रताचे पालन केल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. (Top Marathi Headline)
मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा
गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात चार वेद जाणणारे ब्राह्मण राहात होते. राजा प्रजाहितदक्ष होता. एकदा रात्री राजाला स्वप्न पडले, त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसेल. सकाळी उठताच त्यांने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला मी माझ्या वडिलांना नरकयातना भोगताना पाहिले आहे. ते म्हणाले मुला… मी नरकात पडून आहे. मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. (Latest Marathi News)

मला या राज्यामध्ये सुख, संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करायचं? राजा म्हणाला – हे ब्राह्मण देवता ! या दु:खाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल. अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल. ब्राह्मण म्हणाले – हे राजा ! जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणार्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. (Top Trending Headline)
राजा म्हणाला ऋषीमुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे. पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भुतकाळाचा विचार करु लागले. मग ऋषी म्हणाले राजा! योगसामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्याने रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापीकृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला ऋषी कृपा मला काही उपाय सांगा. (Top Stories)
========
Lord Vishnu : नव्या वर्षात कधी आहे, अधिक महिना !
Gita Jayanti : जाणून घ्या गीता जयंतीचे महत्त्व
========
ऋषी म्हणाले – हे राजा ! मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे. त्याच्या प्रभावाने, तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. मुनिचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले – हे पुत्रा, तुझे कल्याण होवो. असे म्हणत ते स्वर्गात गेला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळ मिळते. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
