मंदिरं म्हटले की आधी डोक्यात विचार येतो भारताचा. भारतामध्ये विविध देवांची भरपूर मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. प्रत्येक मंदिराचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आणि ओळख आहे. आपण जेव्हा जेव्हा मंदिरांबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा दक्षिण भारतातील मंदिरांचा विषय निघाला नाही तरच नवल. कारण संपूर्ण भारतात दक्षिण भारतातील मंदिरं कायम आपले वेगळेपण सिद्ध करतात. येथील मंदिरं चर्चेचा मुद्दा असतो. इथे असणाऱ्या मंदिरांच्या रचना, बांधकाम, रंगसंगती, इतिहास, देवांच्या मूर्ती आदी सर्वच गोष्टी खूपच वेगळ्या आणि आकर्षक असतात. आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील अशाच एका हटके मंदिराबद्दल रंजक माहिती देणार आहोत. (Linga Bhairavi Temple)
आपण जेव्हा कोणत्याही मंदिरामध्ये दर्शनाला जातो तेव्हा तिथे पुजारी म्हणून आपल्याला गुरुजी दिसतात. मंदिरात पूजेसाठी गुरुजी असणे खूपच सामान्य बाब आहे, यात काहीही नवल वाटण्याजोगे नाही. मात्र दक्षिण भारतात एक असे अनोखे मंदिर आहेत, जिथे पूजेसाठी पुरुष नाही तर महिला आहे. यापेक्षा देखील मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे कदाचित हे एकमेव मंदिर असे आहे, जिथे मासिक पाळीत देखील महिलांना मंदि रात प्रवेश मिळतो. आता वाटले ना आश्चर्य…? (Marathi News)
आपल्या देशातील जुन्या परंपरांनुसार प्रत्येक स्त्रीला तिच्या मासिक पाळीमध्ये मंदिरांमध्ये आणि देवाच्या कार्यामध्ये जाण्यास बंदी असते. याकाळात स्त्री बाजूला असते, तिला कोणीही स्पर्श करायचा नसतो. अशा पाळीमध्ये मंदिरात जाण्यास परवानगी असणे म्हणजे खूपच मोठी आणि आश्चर्याची बाब आहे. साऊथ इंडियामधील तामिळनाडू राज्यात हे अभूतपूर्व असे मंदिर आहे. तामिळनाडू राज्यातील कोइंबतूरजवळील वेलियांगिरी पर्वताच्या पायथ्याशी ‘लिंगा भैरवी’ मंदिर आहे, जे आपल्या हटके परंपरांसाठी संपूर्ण देशात नव्हे नव्हे जगात प्रसिद्ध आहे. (Todays Trending HEadline)

हे मंदिर अचानक खूपच चर्चेत आले आहे, आणि याचे कारण म्हणजे नुकतेच लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरे लग्न याच मंदिरात केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लिंगा भैरवी मंदिर कमालीचे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर देखील या मंदिराबद्दल लोकांकडून शोध घेतला जात आहे. भक्तांच्या कल्याणासाठी, मानसिक बळासाठी आणि जीवनातील समृद्धीसाठी लिंगा भैरवी देवी कृपा करते, असा विश्वास येथे असलेल्या साधकांचा आहे. (Top Marathi News)
लिंग भैरवी कोईम्बतूरपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराची विशेष गोष्ट सांगायची झाली तर मंदिराच्या आतील गाभाऱ्यात फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे हे मंदिर महिलांसाठी खास आहे. या मंदिरात पुजारी म्हणून फक्त महिला आहेत. मात्र, येथे केवळ स्थानिकच नाही तर परदेशी महिलाही मंदिराचे व्यवस्थापन करताना दिसतील. येथे केवळ महिलाच मंदिराची देखभाल करतात. या महिला पुजाऱ्यांना मंदिरात ‘भैरागिणी माँ’ असे म्हणतात. लिंगा भैरवी हे सशक्त आणि रौद्र स्त्रीच्या ऊर्जेचे स्वरूप समजले जाते. (Latest Marathi Headline)
तामिळनाडूतील कोइंबतूर येथे असलेल्या देवी लिंग भैरवीच्या मंदिरात महिला पूजारी आहेत. सद्गुरू वासुदेव आश्रममध्ये हे मंदिर आहे. या मंदिरातील पुजाऱ्यांना भैरवी म्हणून ओळखले जाते. या मंदिरात देवीची पूजा, नित्य अभिषेक, सजावट, देवीचा पोषाख आरती हे सगळेच महिला पूजारी करतात. भैरवी मंदिरात दर पौर्णिमेला दिवसरात्र देवीची मोठी मिरवणूक निघते. ते पाहण्यासाठी लांबून लोक येतात. महिला आणि पुरुष दोघांनाही या मंदिरात जाण्याची परवानगी आहे. (Marathi Trending News)
========
Audumbar Tree : औदुंबर वृक्षाचे महात्म्य आणि कथा
========
लिंगा भैरवी या देवीच्या रूपाची खास गोष्ट म्हणजे यात साडे तीन चक्र प्रतिष्ठित आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक आणि अर्धे अनाहत चक्र. हे स्त्रीच्या सर्वात प्रखर आणि तीव्र ऊर्जेचे रूप आहे. ही ऊर्जा इतकी तीव्र आहे की, ती लोकांच्या अनुवांशिक तत्वांना देखील प्रभावित करू शकते. यासाठीच देवीशी संबंधित पूजेसाठी केवळ महिलांनाच परवानगी देण्यात आली आहे. (Top Stories)
लिंगा भैरवी या मंदिराचे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची खास रचना. या मंदिराच्या बाहेरील भिंती या उलट्या त्रिकोणाच्या आकारात बांधल्या गेल्या आहेत. या भिंतींमध्ये सर्जन आणि सृष्टीच्या गर्भाचे प्रतीक दडलेले आहे. तर मंदिराच्या आत मात्र सरळ त्रिकोण तयार केलेला असून तो पुरुष ऊर्जा किंवा ‘निर्मितीच्या जन्मावस्थे’चे प्रतिनिधित्व करतो. ही अनोखी रचना स्त्री-पुरुष उर्जेच्या संतुलनाचा आध्यात्मिक संदेश देते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
