अयोध्येतील राम मंदिरामध्ये नुकताच ध्वज फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर रोजी अभिजित मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला. संपूर्ण देशाने टीव्हीच्या माध्यमातून हा सोहळा याची देही याची डोळा पहिला. अयोध्येमधील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अयोध्येतील राम मंदिरात हा धर्मध्वज फडकवला गेला. राम मंदिरात धर्मध्वज फडकवणे हे भव्यतेचे प्रतीक मानले जाते आणि त्या भव्यतेचा भव्य समारंभ अयोध्येत पार पडला. हिंदू अस्मितेचा एक नेत्रदीपक असा हा सोहळा संपन्न झाल्यानंतर सगळीकडे जय श्रीरामाचा नारा दिला जात होता. (Temple)
भारत हा मंदिरांचा देश आहे. या देशात असंख्य लहान मोठी मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे भारतातील मंदिरं ही आपल्या आस्थेचे केंद्र असण्यासोबतच वास्तुकलेचा आणि आपल्या संस्कृतीचा उत्तम नमुना आहे. भारतातील सर्वच मंदिरं एका खास इतिहासाची साक्ष देतात. या सर्व मंदिरांमध्ये देव जरी वेगवेगळे असले तरी मंदिरांवर फडकणारा ध्वज यात सामान आहे. आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मंदिराच्यावर एक ध्वज फडकत असतो. मंदिरावर फडकणारा ध्वज काय सांगतो?, मंदिरावर ध्वज का फडकावला जातो?, या ध्वजा मागचे नेमके कारण काय? चला जाणून घेऊया. (Ram Mandir)
मंदिराच्या शिखरावर डौलाने फाडणारा ध्वज आपल्या हिंदू अस्मितेचे प्रतीक आहे. कोणत्याही मंदिरावर धवज फडकवणे ही खूपच जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की, मंदिराचे शिखर हा मंदिराचा सर्वोच्च बिंदू असतो, जिथून ब्रह्मांडातील ऊर्जा सर्वात आधी मंदिरात प्रवेश करते. मंदिराच्या वर फडकणारा ध्वज हा ब्रह्मांडातील ऊर्जा आणि मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेल्या देवाच्या उर्जेमधील एक संपर्क सूत्र असतो. मंदिराच्या वर फडकणारा धर्मध्वज हा त्या संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचे काम करतो आणि जवळच्या परिसराला पवित्र करतो. (Todays Marathi Headline)

मंदिराच्यावर फडकणाऱ्या ध्वजाला मोठी धार्मिक परंपरा आहे. या गोष्टीचे हिंदू धर्मामध्ये मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे. याशिवाय याचे धार्मिक दार्शनिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. ध्वज हा केवळ एक कपडा नाही तर दिव्यता, संरक्षण आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गरुड पुराणानुसार, मंदिरात ध्वजांकन करणे देवतेची उपस्थिती दर्शवते आणि तो ज्या भागात फडकतो तो संपूर्ण परिसर पवित्र मानला जातो. धर्मग्रंथांमध्ये मंदिराच्या शिखरावरील ध्वजाचे वर्णन देवतेच्या वैभवाचे, शक्तीचे आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून केले आहे. मंदिराच्या वर फडकणारा हा ध्वज त्या मंदिरात देवी देवतांची उपस्थिती देखील दर्शवत असतो. (Top Marathi News)
पूर्वीच्या काळात जेव्हा युद्ध व्हायचे, यात्रा केल्या जायच्या तेव्हा ध्वज हा दिशादर्शक म्हणून देखील काम करायचा. प्राचीन काळी जेव्हा मंदिरं हे मोठमोठे आणि भव्य दुरुन न दिसणारे नव्हते तेच याच ध्वजावरून मंदिराची ओळख व्हायची. हाच ध्वज पाहून लोकांना दुरूनच लक्षात यायचे की हे मंदिर आहे. ध्वजचा अर्थ विजय किंवा विजयाचे प्रतीक असा होतो. धर्म आणि सदाचाराचा कायम विजय होतो हेच मंदिराचा हा ध्वज कायम सांगतो. (Latest Marathi Headline)
मंदिरावर एका वैशिष्ट्य उंचीवर ध्वज लावला जातो, कारण ही उंची देवाची सर्वोच्चता दाखवते. हवेसोबत उडणारा असणारा ध्वज सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचे प्रतीक मानले जाते. सतत उडणारा ध्वज हा ‘धर्म जिवंत आहे, सक्रिय आहे आणि अविरत चालत राहणार आहे.’ हे दर्शवत असतो. मंदिराच्यावर फडकणाऱ्या ध्वजावर असणारे ॐ, सूर्य, त्रिशूल हे मंदिरात स्थापित असणाऱ्या देवांना आणि त्यांच्या महात्म्याला दर्शवतात. एवढेच नाही तर ध्वजाचा रंग देखील एक खास अर्थ सांगत असतो. जसे की, भगवा रंग हा त्याग, तो, तेज आणि अध्यात्माच्या शक्तीला दाखवतो. तर लाल रंग अग्नी देवता किंवा हनुमान यांच्याशी संबंधित असतो आणि आईच्या शक्तीचे समर्पण दाखवतो. ध्वजावर असणारे ॐ, सूर्य, त्रिशूल, स्वस्तिक आदी शुभ चिन्ह आणि रक्षात्मक प्रतीक असतात. (Top Trending News)
========
Shivlinga : दरवर्षी वाढणा-या शिवलिंगाचे गुढ !
========
आपल्या जुन्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, मंदिराचे शिखर हे ब्रह्मस्थान आहे. तिथे ध्वज लावून आपण त्या स्थानाची शुद्धता आणि दिव्यता दाखवतो. हे स्थान देवाच्या ऊर्जेचे केंद्र बनते. यासोबतच असे देखील म्हटले गेले आहे की, मंदिरात नियमित पूजा अर्चना केली जाते. हे स्थान सक्रिय धर्मस्थळ आहे. याच धर्मध्वजाला पाहून भक्तांमधील भक्ती जागृत होते. त्यांना आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना जाणवते. आता आपण देवाच्या घराजवळ आलो आहोत ही जाणीव आनंद देते. याच ध्वजाला देखील मोठे स्थान आहे. अनेकदा लोकं केवळ ध्वजाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. कारण हा ध्वज देखील देवासमान आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
