योगा ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. भारताइतकाच जगात देखील योगा कमालीचा प्रसिद्ध आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, राजकारणी, व्यावसायिक आदी दिग्गज मंडळी देखील स्वतःचा फिटनेस जपण्यासाठी योगाचा आधार घेतात. आता अनेकांना योगा म्हटले की आठवतात ती विविध प्रकारची सोपी, अवघड अशी योगासने. मात्र योगामध्ये केवळ आसनेच असतात असे नाही तर योगामध्ये अनेक विविध प्रकारच्या विशिष्ट अशा मुद्रा देखील असतात. या मुद्रा अतिशय सोप्या मात्र अत्यंत लाभदायक असतात. (Yoga)
केवळ भारतातीलच नाही तर जगातील दिग्गज लोकं देखील या मुद्रा करताना दिसतात. अतिशय सोप्या आणि कुठेही करता येतील अशा या मुद्रा आहेत. यातलीच एक मुद्रा म्हणजे उत्तरबोधी मुद्रा. ही मुद्रा करताना अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, फुटबॉलपटू मेस्सी, अॅलन मस्क आदी अनेक प्रतिष्ठित आणि जगप्रसिद्ध लोकांना पाहण्यात आले आहे. मग ही मुद्रा करण्यामागे नक्की काय कारण आहे?, उत्तरबोधी मुद्रा म्हणजे नक्की काय? उत्तरबोधी मुद्रा करण्यामागची कारणे कोणती? जाणून घेऊया. (Marathi)
उत्तरबोधी मुद्रा ही गौतम बुद्धांची मुद्रा आहे. त्यांच्या अनेक प्रतिमांमध्ये या मुद्रेतील प्रतिमा, शिल्पे आपल्याला मुद्रा केल्याचे दिसते. ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तर इतर बोट ही आतल्या बाजूने मोडलेली असतात. भागवत पुराणानुसार, बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार मानले गेले आहेत. भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. त्यांचीच ही उत्तरबोधी मुद्रा आहे. उत्तरबोधी मुद्रा ही एक अशी मुद्रा आहे जी केल्याने तुमच्या आंत चेतना संचारते. या मुद्राच्या मदतीने तुमचा मेंदु तुमच्या जवळपास घडणाऱ्या घटनांसाठी नियमित सतर्क राहील. (Todays Marathi Headline)

उत्तरबोधी मुद्रा फायदे
– आत्मविश्वास वाढतो ही मुद्रा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते, विशेषतः जेव्हा आपण एखादं ध्येय साध्य करायचे ठरवतो. (Top Trending Headline)
– मनःशांती आणि मानसिक स्थिरता मिळते डोक्यातील अराजकता शांत होते, मन स्थिर राहतं.
– एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते ही मुद्रा मेंदूला ऊर्जा देते आणि विचार करण्याची स्पष्टता मिळवून देते.
– नकारात्मक विचार कमी होतात जीवनात आलेल्या अडचणींकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची क्षमता वाढते. (Top Trending News)
– उच्च आत्मिक जागृतीची वाट मोकळी करते गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर हीच मुद्रा धारण केली होती म्हणूनच ती ‘जागृतीची मुद्रा’ म्हणून ओळखली जाते.
– शरीरातील प्राणशक्ती संतुलित होते या मुद्रेमुळे शरीरातील ऊर्जा चक्रं संतुलित राहतात आणि थकवा कमी होतो.
– मेंदूमधील रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी उत्तरबोधी मुद्रा अतिशय प्रभावी ठरते. (Top Marathi News)
– उत्तरबोधी मुद्रा केल्यामुळे कामावरील लक्ष वाढते आणि कोणत्याही क्षेत्रात खूप खोलवर आणि परिश्रमपूर्वक काम करण्याची इच्छा निर्माण होते.
– सकाळी ४ ते ६ दरम्यान कोणतेही योगासने किंवा ध्यानसाधना केल्यास शरीराला अनेक मनाला भरमसाट फायदे होतात. ब्रह्म मुहूर्ताला सकारात्मक उर्जेचा प्रवाह दिवसाच्या तुलनेत १० पट जास्त असतो. या मुद्रेचा सराव लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कोणतीही व्यक्ती करू शकते.
– एका जागेवर १० मिनिटं शांत बसून उत्तरबोधी मुद्रा आसन केल्यास महिनाभरात सकारात्मक परिणाम आरोग्यावर आणि मनावर दिसून येतील.
– भारतीय परंपरेमध्ये या मुद्रेला विशेष महत्व आहे. धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी उत्तरबोधी मुद्रा करावी. (Latest Marathi Headline)
– अंतर्मनाची ताकद द्विगुणित करण्यासाठी ही मुद्रा केली जाते. यामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक तणावापासून सुटका मिळते.
– अंतर्मनाची उर्जा वाढवण्यासाठी आणि कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी नियमित उत्तरबोधी मुद्रा करावी.
– उत्तरबोधी मुद्रा केल्यामुळे तुमच्या मेंदूत डोपामाइन नावाचा आनंद संप्रेरक बाहेर पडून जातो. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचे खूप खोलवर निरीक्षण करू शकता. (Top Stories)
========
Tulsi Benefits : तुळशीची पाने आरोग्यासाठी वरदान, वाचा हे 5 भन्नाट फायदे
Blood Sugar Control : रक्तातील वाढलेल्या शुगरला मधुमेहाच्या रुग्णांनी असे करा कंट्रोल
========
उत्तरबोधी मुद्रा ही जगातील सगळ्यात शक्तिशाली मुद्रा मानली जाते. प्रामुख्याने प्रसिद्ध व्यक्ती ही मुद्रा करताना दिसतात. ही मुद्रा करताना सगळ्यात आधी तुमचे अंगठे एकत्र आणावे. त्यानंतर सर्व बोटांना एका सरळ रेषेत ठेवावे. या स्थितीमध्ये १० मिनिटं शांत बसून राहिल्यास मानसिक तणाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. अभ्यास करताना किंवा कोणत्याही व्यक्तीशी बोलताना उत्तरबोधी मुद्रा आसनात बसल्यास अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
