Home » Sleeping : तुम्ही देखील तोंड उघडे ठेऊन झोपता? संकेत आहे मोठा आजाराचा

Sleeping : तुम्ही देखील तोंड उघडे ठेऊन झोपता? संकेत आहे मोठा आजाराचा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sleeping
Share

अनेक लोकांसाठी झोप हे आळसपणाचे लक्षण आहे. मात्र उत्तम आरोग्यासाठी सकस, पौष्टिक आहार, व्यायाम महत्वाचा आहे, तशीच झोप देखील महत्वाची आहे. जितकी चांगली झोप तुम्ही घेता तितके तुमचे शरीर निरोगी राहते. दिवसभराचा थकवा आणि शरीराची ऊर्जा भरून काढण्यासाठी किमान ७ ते ८ तासांची झोप महत्वाची असते. मात्र झोप जितकी महत्वाची तितकीच झोपेची योग्य स्थिती देखील महत्वाची असते. कारण झोपेदरम्यानच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. यांपैकीच एक सवय म्हणजे, झोपताना तोंड उघडे ठेवणे. अनेक लोकांना झोपताना तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते. आता काही लोकं तोंड बंद करूनच झोपतात, मात्र त्यांचे तोंड नकळतपणे उघडते. मात्र या सवयीचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रात्री तोंड उघडे ठेवून झोपल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. (Sleeping Habits)

तोंड उघडं राहण्याची दोन कारण असू शकतात. पहिले म्हणजे नाकातून श्वास घेण्यास अडथळा येणे, जसे की सर्दी, सायनस किंवा अॅलर्जी. अशावेळी शरीर आपोआप तोंडातून श्वास घेऊ लागते. दुसरे कारण म्हणजे चुकीच्या झोपण्याच्या सवयी, जसे की पोटावर किंवा पाठीवर झोपणं, ज्यामुळे तोंड उघडं राहते. या सवयीचे दुष्परिणाम अनेक आहेत. सर्वात आधी, तोंडातून श्वास घेतल्याने लाळ लवकर सुकते, ज्यामुळे तोंड कोरडं पडतं आणि दुर्गंध येऊ लागते. यामुळे रात्री तहान लागते, झोपमोड होते. तोंडातून श्वास घेतल्याने शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होण्यासारखे त्रास सुरू होतात. (Health)

अति तणावामुळे आणि नेहमी तणावाखाली राहिल्यामुळे देखील एखादी व्यक्ती रात्री तोंड उघडे करून झोपू शकते. असे होते कारण,जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमचा श्वास वेगाने सुरू होतो आणि त्यामुळे बीपीही वाढतो. जलद श्वास घेतल्याने तुम्ही तोंड उघडे ठेवून श्वास घेण्यास सुरुवात करता. तसेच सर्दी-खोकल्यामुळेही नाक बंद होते. अशावेळी देखील तोंडाद्वारे श्वास घेतला जातो. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही तोंडातून श्वास घेता तेव्हा ओलावा आणि उष्णतेशिवाय हवा थेट फुफ्फुसांमध्ये पोहोचते, ज्यामुळे घसा कोरडा पडतो. यामुळे घसा खवखवण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे वारंवार झोपमोड होऊ शकते. सकाळी उठता तेव्हा तोंड कोरडे पडणे, घसा खवखवणे आणि थकवा जाणवणे ही त्याची लक्षणे असू शकतात. (Todays Marathi Headline)

Sleeping

तोंड उघडे ठेऊन झोपल्यामुळे, हवेतील बॅक्टेरिया आपल्या दात आणि तोंडात बसतात. हे जीवाणू आणि घाण नंतर दुर्गंधीचे रूप घेतात. यामुळे शक्यतो प्रयत्न करा की, रात्री झोपताना तोंड उघडे राहणार नाही. जर आपल्याला ही समस्या सातत्याने होत असेल तर आपण डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. तोंड उघडे ठेऊन झोपणे चांगली सवय नाहीये. शिवाय तोंड उघडे ठेवून झोपण्याचा आणखी एक तोटा म्हणजे ओठ कोरडे होऊ लागतात. ओठ जास्त काळ कोरडे राहिल्यास ओठांची त्वचा फाटते.एवढेच नाही तर तोंडातील द्रव कोरडे पडल्याने घशातही त्रास होऊ लागतो. लोकांना एकावेळी काहीही गिळताना त्रास होऊ लागतो. जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर नक्कीच एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या. (Latest Marathi News)

मुख्य म्हणजे तोंड उघडे ठेऊन झोपल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतरांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त तोंड उघडून झोपणाऱ्या लोकांमध्ये असतो. झोपेदरम्यान नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतला जातो, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. तोंड उघडे ठेवून झोपल्याने दम्याचा धोका वाढतो. कारण यामुळे, फुफ्फुसांना अधिक जोमाने काम करावे लागते. अशा स्थितीत दम्याची समस्या सुरू होते. तोंड उघडे ठेवून झोपल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजन कमी होऊ लागतो, त्यामुळे थकवा येण्याची समस्या सुरू होते. (Top Trending News)

=========

Health : तुम्हाला श्वास घेताना त्रास होतो का? मग असू शकतो ‘हा’ आजार

=========

आपल्याला दिसताना ही सवय खूपच छोटीशी आणि सामान्य दिसते. मात्र ही सवय खूपच गंभीर आणि त्रासदायक ठरू शकते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी छोटे छोटे काही उपाय करून पाहावेत. जसे की, झोपण्यापूर्वी नाक साफ करणं, वाफ घेणं, बाजूने झोपणं, खोलीत ह्युमिडिफायर ठेवणं आणि गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तोंड बंद ठेवण्यासाठी स्ट्रिप्स वापरणं फायदेशीर ठरू शकते. पण जर तुम्ही देखील तोंड उघडे ठेऊन झोपत असाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांनाच सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.