Home » Nazar : नजर दोष म्हणजे काय? Evil Eye मुळे खरंच नजर लागत नाही का?

Nazar : नजर दोष म्हणजे काय? Evil Eye मुळे खरंच नजर लागत नाही का?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nazar
Share

आपण अनेकदा घरात काही सकारात्मक, आनंददायी सांगतो तेव्हा घरात वडीलधाऱ्या लोकांच्या तोंडातून पहिले येते ते म्हणजे, ‘आधी दृष्ट काढते थांब’. दृष्ट काढणे, नजर काढणे आपल्या देशात खूपच सामान्य मानले जाते. लहान बाळांची तर रोजच दृष्ट काढली जाते. त्याला कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून काळा टीका देखील लावला जातो. लहान बाळच नाही तर आजकाल मोठे लोकं देखील नजर लागू नये म्हणून पायात काळा डोरा बांधताना दिसतात. मात्र नजर किंवा दृष्ट लागणे असते तरी काय?, नजरेसाठी वापरण्यात येणाऱ्या एव्हिल आय या प्रतीकाचा इतिहास काय आहे? जाणून घेऊया या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं (Nazar)

नजर लागणे म्हणजे काय?
वाईट नजरेपासून वाचण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. प्रत्येक व्यक्तीचा एक खास ऑरा असतो. या ऑरावर दुसऱ्याच्या विचारांचा, सहवासाचा, नजरेचा परिणाम होत असतो. जर त्यावर वाईट विचारांचा, सहवासाचा किंवा नजरेचा परिणाम झाला तर आपला ऑरा डिस्टर्ब होतो, म्हणजेच काय तर दृष्ट लागते. एखाद्या व्यक्तीला कोणाची नजर लागली तर त्यावेळी संबंधित व्यक्तीमध्ये काही बदल दिसू लागतात. (Marathi)

शारीरिक आणि मानसिक समस्या, अचानक तीव्र डोके दुखी, चक्कर येणं, स्वभाव चिडचिडा होणं, झोप न येणं, थकवा जाणवणं, असे अनेक लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. थोडक्यात काय जेव्हा लोक एखाद्याला स्वतःपेक्षा चांगले किंवा चांगल्या स्थितीत पाहतात, मग ते कपडे, अन्न, जीवनशैली किंवा निवासस्थान काहीही असो, तेव्हा ते त्या व्यक्तीकडे मत्सराने पाहतात. असे  मानले जाते की या काळात, त्यांच्या नजरेतून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान होते. असेही मानले जाते की यामुळे दुखापत आणि दुर्दैव होऊ शकते. (Marathi News)

Nazar

नजर लागण्याची लक्षणे कोणती?
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या हाताची आणि पायाची नखं अचानक खराब होऊ लागली किंवा तुटू लागली तर समजावे की, तुम्हाला कोणाची तरी नजर लागली आहे. शिवाय धार्मिक मान्यतेनुसार, जर कावळा तुमच्या घरी येऊन हाड फेकत असेल तर ते खूप वाईट लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुमच्यावर वाईट नजर पडली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेचा त्रास होतो तेव्हा ती व्यक्ती रात्री झोपू शकत नाही, ती व्यक्ती तणावात राहतो आणि कोणत्याही कारणाशिवाय डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री वाईट स्वप्ने पडणे हे देखील सूचित करते की एखाद्याच्या नकारात्मक उर्जेने तुम्हाला वेढले आहे किंवा तुमच्यावर वाईट नजरेचा परिणाम झाला आहे. रात्री झोपताना अचानक डोळे उघडणे किंवा विचित्र आवाज ऐकणे हे वाईट नजरेचे लक्षण असू शकते. (Todays Marathi Headline)

नजर कशी काढावी?
* आता नजर काढण्याच्या प्रत्येकाच्या आपापल्या पद्धती आहेत. त्यातही एक अतिशय सामान्य पद्धत म्हणजे मीठ आणि मोहरीने नजर काढणे. बहुतकरून संध्याकाळीच नजर काढली जाते. यासाठी हातात मीठ आणि मोहरी घेऊन व्यक्तीच्या अंगावरून उतरवावे. (Top Stories)
* मीठ मोहरी आणि मिरचीने नजर काढणे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. घरात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही नजर लागली की हातात थोडे मीठ, मोहरी, लसूण, कांद्याची साले आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन मूठ घट्ट झाकायची आणि डोक्यापासून ते पायापर्यंत ७ वेळा मूठ फिरवायची आणि नंतर मुठीतील गोष्टी आगीत जाळून टाकाव्यात.
* संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावे.
* नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात, कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरावं.
* तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चैनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता, जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं.
* काही ठिकाणी ज्वारीची भाकरी, त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात.
* नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली, लिंबू मिरची, बिब्वा देखील लटकवला जातो.
* काही ठिकाणी लहान बाळाची पांढऱ्या फुलाने, आईच्या पदराने किंवा अगदी साखरेने देखील नजर काढली जाते. (Latest Marathi Headline)

नजर काढताना काय म्हणावे?
लहान मुलांची नजर काढताना घरातील आई, आजी म्हणायची बाहेरून आलेल्या, गेलेल्याची, घरातील माणसांची, कुत्र्या मांजरांची, भूताकेताची कोणाचीही नजर माझ्या बाळाला लागली असेल तर ती आगीत जळून खाक होऊ देत. नजर काढण्यासाठी “अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्‌। दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्‌।।” हा मंत्र म्हणतात. जर काही म्हणता येत नसेल तर ७ वेळा अंगावरून मीठ मोहरी उतरवावी. (Top Marathi Headline)

Nazar

आजच्या आधुनिक काळात देखील नजर लागणे यावर लोकांचा विश्वास आहे. आजच्या आधुनिक, सोशल मीडिया आणि फॅशनच्या काळात तर दृष्टीचे प्रतीक असलेल्या एव्हिल आयच्या गोष्टी फॅशन म्हणून वापरल्या जातात. मग त्यात पर्स, ड्रेस, गळ्यातील पेंडंट, कानातले आदी गोष्टी असतात. सोशल मीडियावर देखील एव्हिल आयचा ईमोजी असतो जो तुम्ही वापरू शकता. सोशल मीडियामुळे हा एव्हिल आय जास्त चर्चेत आला. मात्र या सिम्बॉल मगच नक्की इतिहास कोणता? कसा हा सिम्बॉल तयार झाला? कोणी तयार केला? (Latest Marathi News)

एव्हिल आयला तब्बल ५००० वर्षांचा इतिहास आहे. आता नजर लागू नये म्हणून एव्हिल आयचा ट्रेंड जोरात आहे. निळ्या रंगाचे हे प्रतीक असते. सीरियातील टेल ब्राक येथे उत्खननादरम्यान जिप्सम अलाबास्टर या दगडापासून बनवलेल्या डोळ्यांच्या शिल्पाकृती सापडल्या आणि त्या ३५०० ईसापूर्व काळातील असल्याचे मानले जाते. ‘हमजा’ हे एक हातातील ब्रेसलेटप्रमाणे असते ज्यामध्ये निळ्या रंगाचे डोळ्यासारखे चिन्ह असते. आधुनिक ग्रीसमध्ये याला ‘माटी आँख’ म्हणून ओळखले जाते. (Top Trending Headline)

मध्य पूर्व आणि तुर्कीच्या बहुतेक भागात, याला अरबी भाषेत ‘अल-ऐन’ असेही म्हणतात. त्याचा इतिहास सुमारे ५००० वर्षे जुना आहे. हे चिन्ह अनेक धर्म आणि संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहे, परंतु यहुदी, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात ते सर्वात जास्त प्रचलित आहे. तुर्की आणि ग्रीक संस्कृतीत अशी मान्यता आहे की एखाद्याची खूप प्रशंसा केल्यावर त्याला नजर लागू शकते. त्यामुळे असे चिन्ह तयार केले ज्याला तुर्की ‘आय बीड’ म्हणूनही ओळखले जाते. त्यात निळ्या रंगात एक डोळ्याचा आकार दिसतो. (Top Stories)

========

Kharmas : सावधान खरमास सुरु होतोय !

Ayodhya : राम मंदिरातील सप्तऋषी मंदिर !

========

आजही हे ग्रीक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या गोष्टींना नजर लागण्याची भीती असते तिथे हे चिन्ह वापरले जाते. हे एव्हिल आयचे प्रतीक नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास आणि दूर करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते. ज्या व्यक्तीने हे घातले असेल तो नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतो असेही म्हंटले जाते. मात्र कितपत सत्य आहे हे सांगणे कठीण आहे. असे असले तरीही आजही लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे एव्हिल आय त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट करताना दिसतात. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.