Home » काबा मधील काळ्या दडगाचे रहस्य, ‘या’ कारणास्तव हज यात्रेकरु घेतात चुंबन

काबा मधील काळ्या दडगाचे रहस्य, ‘या’ कारणास्तव हज यात्रेकरु घेतात चुंबन

by Team Gajawaja
0 comment
Kabba black stone
Share

Kabba black stone- मुस्लिम धर्मात जर एखाद्याच्या जन्म झाल्यास त्याने आयुष्यात कमीत कमी एकदा तरी हज यात्रा करणे अनिवार्य मानले जाते. मक्का मध्ये हजसाठी जाणारे मुस्लिम बांधवांना हाजी असे म्हटले जाते. येथील मुस्लिमांचे पवित्र धर्मस्थळ काबा येथे हजसाठी आलेले यात्रेकरु परिक्रमा करतात आणि काबाच्या पूर्व कोपऱ्यात लावण्यात आलेल्या काळ्या दडगाचे चुंबन घेतात. परंतु या काबामधील ब्लॅक स्टोनचे का चुंबन घेत असावेत? किंवा त्यामागील काय असे रहस्य आहे.काबाच्या पूर्व दिशेला लावण्यात आलेला काळा दडग हा जरी आकाराने लहान असला तरीही त्याचे महत्व फार मोठे आहे. कारण या दगडाच्या चहूबाजूंना चांदीची फ्रेम लावण्यात आली आहे. अरबी भाषेत या दगडाला ‘अल-हजरु-अल-अस्वद’ असे म्हटले जाते. या दगडामागे काही कथा आहेत. परंतु त्याच्या खरेपणाबद्दल कोणताही ठोस पुरावा नाही.

धुमकेतू आणि चंद्राचा तुकडा
या पवित्र काळ्या दगडासंदर्भात काही कथा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तो धरतीवर आलेला धुमकेतू आहे. काही मान्यतांनुसार याला चंद्राचा तुकडा असे ही म्हटले जाते. जो चंद्रावरुन तुटून धरतीवर आला आहे. खरंतर या दगडासंदर्भात विविध गोष्टी बोलल्या जातात.

कुरानमध्ये मक्का मधील काळा दगड
इस्लाम धर्मात काबाच्या ज्या काळ्या दगडाला पवित्र मानले आहे त्याचा उल्लेख कुरानमध्ये करण्यात आलेला नाही. यामागे एक अशी धारणा आहे की, हा दगड मुहम्मद साहब हे धरतीवरुन गेल्यानंतर अस्तित्वात आला आहे. परंतु असे नाही आहे की, याचा उल्लेख इस्माम धर्मातील दुसऱ्या ग्रंथांमध्ये झालेला नाही.

Kabba black stone
Kabba black stone

हदीसांमध्ये पवित्र काळ्या दगडाचा उल्लेख
इस्लाम धर्मात मानल्या जाणाऱ्या कुरान नंतर हदीसवर विश्वास ठेवला जातो. यामध्ये पवित्र काळ्या दगडाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचे महत्व असे सांगण्यात आले आहे. काही हदीसांमध्ये हा दगड सजीव असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पैगंबर या दगडाला खुदाचा डावा हात मानत होते आणि ते त्याला सजीव समजायचे. त्याचे चुंबन घेऊन त्याचे आभार मानायचे. यामुळेच ही परंपरा उदयास आली आणि आता हाजी या दगडाचे चुंबन घेतात. परंतु मोठ्या संख्येने हाजी येत असल्याने प्रत्येकालच त्याचे चुंबन घेता येत नाही. त्यामुळे हाजी आता या दगडाच्या दिशेने आपले तोंड करुन दुआ करतात.

हे देखील वाचा- नव्या इस्लामिक कॅलेंडरची सुरुवात मोहर्रम महिन्यापासूनच का होते?

इब्राहिम आणि इस्माइल यांचे काळ्या दगडाशी नाते
काबाच्या या पवित्र ब्लॅक स्टोनसंबंधित आणखी एक कता आहे. पैगंबर इब्राहिम यांना जेव्हा खुदाने काबा तयार करण्यास सांगितले तेव्हा त्याच्या बांधणीच्या अखेरीस त्यांनी पाहिले की पूर्व भागात एक लहान जागा शिल्लक राहिली आहे. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच इस्माइलला या ठिकाणची जागा भरण्यासाठी एक दगड आणण्यास सांगितला होता. परंतु त्यांना खुप काळ लोटला तरीही तो मिळाला नाही. अखेर जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा तेथे एक काळा दगड लावण्यात आला होता. पैगंबर इब्राहिम यांनी असे सांगितले की, खुदाने जन्नत मधून एका फरिश्त्याला पाठवले आहे आणि त्यानेच हा दगड लावला आहे.(Kabba black stone)

या कारणास्तव काळा दगड बनला खास
या काळ्या पवित्र दगडाचे चुंबन घेण्याची परंपरा यासाठी सुरु झाली की, मोहम्मद साहब यांनी जेव्हा काबाची यात्रा केली तेव्हा त्यांनी त्याचे चुंबन घेतले होते. याच कारणास्तव काबाला बहुतांश वेळा बनवले गेले आणि पैंगबर इब्राहिम द्वारे तयार करण्यात आलेल्या काबाचा हा एकमात्र अवशेष हा काळा दगड राहिला होता. मोहम्मद साहब यांच्या हज यात्रेनंतर पूर्व दिशेला लावेला हा काळा दगड हाजिंसाठी खास झाला. खरंतर मोहम्मद साहब यांनी आपल्या जीवनात फक्त एकाच हजची यात्रा केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.