कॅनडात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतातील हाय कमिशन ऑफ कॅनडाने विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे की, ते देशात काम करण्यास सुरुवात करु शकत नाहीत जो पर्यंत त्यांनी निवडलेल्या कोर्सचा अभ्यासक्रम अधिकृतरित्या सुरु होत नाही. प्रत्येक वर्षाला मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी येतात. कॅनडा संदर्भात भारतीयांमध्ये ऐवढी पसंदी वाढली आहे की, परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी तेथे बहुतांश जणांना आवडत आहे. (Job in Canada)
कॅनडातील हाय कमिशनने एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, काही गोष्टी लक्षात घ्या ज्यानुसार तुम्हाला स्टडी परमिट हे कॅनडात काम करण्याची परवानगी देते. पण तुम्ही तोवर काम करु शकता जो पर्यंत तुमच्या शिक्षणाची सुरुवात झाली आहे. त्याआधी काम करण्याची परवानगी नाही. या व्यतिरिक्त कागदपत्रांच्या माध्यमातून सांगावे लागणार आहे की, त्यांची युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज हे त्यांना उशिराने येण्याची परवानगी देते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्समध्ये बदल करण्यात आल्याची सुचना सुद्धा दिली गेली आहे.

बॉर्डर सर्विस ऑफिसर करणार कागपत्रांची चाचणी
कमीशनने ट्विट करत पुढे असे म्हटले की, जर तुम्ही यंदाच्या हिवाळ्यात कॅनडात जात असाल तर एक बॉर्डर सर्विस ऑफिसर तुमच्या कागदपत्रांची चाचणी करणार आहे. तुमच्या डीएलआयने तु्म्हाला उशिराने परवानगी दिली आहे की नाही ते सुद्धा तपासून पाहिले जाणार आहे. (Job in Canada)
हे देखील वाचा- आता नोकरीसाठी युएईला जाणे होणार सोप्पे, व्हिजा पॉलिसीमध्ये बदल
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार काम करण्याची संधी?
कॅनडा इमिग्रेशन गाइडलाइन्सनुसार, विद्यार्थ्यांना ऑफ कॅम्पस काम करण्याची संधी तेव्हाच दिली जाईल जेव्हा एखाद्या निर्धारित शिक्षण संस्थेत फुल-टाइम विद्यार्थ्यांच्या रुपात एनरॉल केले आहे. या व्यतिरिक्त पोस्ट-सेकंडरी अॅकेडमी, वोकेशनल किंवा प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोगाममध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांना सुद्धा काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तर स्टडी विजा बद्दल सांगण्यात आलेल्या नियमाअंतर्गत, सेकेंडरी लेव्हल वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफ-कॅम्पस काम करण्याची परवानगी असेल.
येथे लक्षात घेण्याची बाब अशी की, विद्यार्थ्यांनी निवडलेला कोर्स हा कमीत कमी सहा महिन्यांचा असावा. हा कोर्स डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट अशा कोणत्याही पद्धतीचा असू शकतो. कोर्सच्या गरजेव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडे कॅनडात काम करण्यासाठी सोशल इंन्शुरन्स क्रमांक सुद्धा असला पाहिजे.