Home » ईराणी राष्ट्रापतींची इज्राइलला धमकी, अवीवला नष्ट करण्याचा दिला इशारा

ईराणी राष्ट्रापतींची इज्राइलला धमकी, अवीवला नष्ट करण्याचा दिला इशारा

by Team Gajawaja
0 comment
Iranian President Warns Haifa
Share

ईराणच्या सैन्य दिवसानिमित्त राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी इज्राइलला पुन्हा एकदा खुलेआम धमकी दिली आहे. ईराणी टेलिविजनवर प्रसारित झालेल्या सैन्य दिवस कार्यक्रमादरम्यान रईसी यांनी इज्राइलच्या विरोधात टीप्पणी करत असे म्हटेल की, जर ईराणच्या विरोधात लहानशी जरी कारवाई केली तरी त्याचे परिणाम नष्ट केल्याच्या रुपात समोर येऊ शकतात. सैन्य दिवसाच्या निमित्त ईराणचे हेलिकॉप्टर आणि लढावू विमानांनी तेहरानवरुन उड्डाण केले तर पाबुड्यांनी ईराणी जल सीमेत आपली ताकद दाखवून दिली.(Iranian President Warns Haifa)

आपल्या या भाषणात इब्राहिम रईसी यांनी सौदी अरबवर टीका केली नाही. कारण सध्या शिया बहुल ईराणी मिडल ईस्टचे सुन्नी देश आणि खासकरुन सौदी अरब सोबत सुरु असलेल्या तणावाला कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सैन्य सोहळ्यात आपल्या भाषणात इब्राहिम यांनी असे ही म्हटले की, जगातील बलाढ्य परमाणूचा करार मोडल्यानंतर इज्राइलने त्यांच्या विविध ठिकाणं आणि लोकांना निशाण्यावर धरत हल्ले केले आहेत.

ईराणी दुश्मन, खासकरुन यहूदी शासनाला कळले पाहिजे की, ईराणच्या विरोधातील लहानशी कारवाई सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकते. याचा परिणाम इज्राइलच्या हाइफा आणि तेल अवीवला नष्ट करण्याच्या रुपात समोर येऊ शकतात.

आपल्या भाषणात इब्राहिम रईसी यांनी आपली ही मागणी पुन्हा केली की, अमेरिकेने पश्चिम एशिया सोडून द्यावे. कारण १९७०-८० च्या दशकात जेव्हा जिम्मी कार्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हापासून अमेरिकन शासन फारसच्या खाडी परिसराला सुरक्षितता देत आहेत. कारण हा परिसर संपू्र्ण जगाला उर्जेची पूर्तता करतो. जगातील जवळजवळ २० टक्के तेल व्यापार ओमान आणि ईराण दरम्यान असलेल्या हार्मुजच्या खाडीच्या मार्गाने होतो.(Iranian President Warns Haifa)

हे देखील वाचा- भीषण स्फोटात ‘हा’ डेअरी फार्म झाला उद्ध्वस्त; 18,000 गायी ठार 

रईसी यांनी असे सुद्धा म्हटलेकी, आमचे सैन्य या क्षेत्रातील देशांचे मनापासून स्वागत करतील. कारण या परिसराची सुरक्षितता अधिक मजबूत होईल. यंदाच्या वर्षात मार्च महिन्यात सौदी अरब आणि ईराणमध्ये चीनने मध्यस्थती करुन एक करार केला होता. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये जवळजवळ सात वर्षानंतर राजकीय संबंध प्रस्थापित झाले आहेत. एकमेकांच्या देशांत दूतवास पुन्हा सुरु करण्यावर सहमती दर्शवली गेली. अशातच इराणच्या राष्ट्रपतींच्या भाषणात आता अरबचा उल्लेख न केल्याने असा अंदाज लावला जात आहे की, आता दोन्ही देश आपल्या नात्यात सुधार करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.