भारतीय रेल्वे (Indian Railway) संपूर्ण जगात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे आणली. मात्र नंतर या रेल्वेचा संपूर्ण विकास भारतीयांनीच केला. आज संपूर्ण जगामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. सध्या आपण आधुनिक आणि सर्व सुखसोयींनी युक्त अशा भारतीय बनावटीच्या रेल्वे तयार करत असताना दुसरीकडे आपण भारतात बुलेट ट्रेन देखील आणत आहोत. (Singhabad )
भारतातील जवळपास सर्वच लहान मोठ्या शहरांना, गावांना रेल्वेने जोडले जात आहे. आजच्या घडीला भारतात नवीन जुनी अशी जवळपास ७००० रेल्वे स्थानकं आहेत. मात्र आजही भारतात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन स्थानकं अगदी सुस्थितीत आहे. ब्रिटिशकालीन अनेक रेल्वे स्थानकांना एक खास आणि मोठा इतिहास आहे. बऱ्याच ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचा काळानुसार कायापालट केला गेला. तर काही आजही अतिशय उत्तम आहे. अशाच एका अनोख्या आणि मोठा इतिहास लाभलेल्या एका रेल्वे स्थानकाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Latest Marathi News)
भारतात ‘सिंहाबाद‘ (Singhabad ) नावाचे एक सर्वात जुने आणि भारताचे शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानक जसे स्वातंत्र्यापूर्वी होते तसेच आजही आहे. देशातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक म्हणून सिंहाबाद रेल्वे स्थानकाचे नाव विशेषकरून घेण्यात येते. सिंहाबाद हे स्टेशन बांग्लादेशच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. हे स्टेशन पश्चिम बंगाल (West Bangal) राज्याच्या मालदा या जिल्ह्यात स्थित आहे. भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी या रेल्वे स्थानकाचा वापर केला जातो. मात्र हे स्थानक फक्त माल गाड्यांच्या वाहतुकीसाठीच वापरले जाते. इथून पॅसेंजर ट्रेन जात नाही. (Marathi Top News)
भारत – बांगलादेश सीमेला लागून असलेले हे रेल्वे स्टेशन देशातील शेवटचे स्टेशन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या स्थानाला मोठे महत्व होते. मात्र स्वातंत्र्यनंतर या स्टेशनकडे दुर्लक्ष झाले. स्वातंत्र्यपूर्वी हे स्टेशन कोलकाता आणि ढाका या दोन शहरांमधील संपर्काचे मुख्य स्थानक होते. इथून बांगलादेश अवघ्या काही किलोमीटरवर आहे. सिंहाबाद हे खूप छोटे रेल्वे स्थानक असून, हे अतिशय शांत स्टेशन आहे. इथे जास्त लोकांचा वावर नसतो.
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
१९४७ सालानंतर अनेक गोष्टी बदलल्या. १९७१ साली बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. त्यामुळे राजनीतिक समीकरणं बदलली. १९७८ साली झालेल्या एका करारानुसार या स्टेशनवरून फक्त मालगाडी नेण्याची परवानगी देण्यात आली. बाकी सर्व प्रवासी वाहतूक बंद झाली. मात्र काळानुसार झालेले बदल बघता पुन्हा २०११ साली पुन्हा एक करार झाला आणि इथून नेपाळसाठी देखील आता ट्रेन जातात. त्यामुळे या स्टेशनचे राजनीतिक महत्व खूपच वाढले आहे. (Top Stories)
सिंहाबाद रेल्वे स्टेशन हे ब्रिटीश काळात बांधले गेले आहे. हा रेल्वे मार्ग आसाम-बंगाल रेल्वे प्रणालीचा भाग होता, जो चहा, ताग आणि इतर कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा होता. या स्टेशनवर ‘भारताचे शेवटचे स्टेशन’ असा बोर्ड लावण्यात आला आहे. येथे असलेले सिग्नल, संपर्काचे, दळणवळणाचे आणि स्टेशनशी संबंधित सर्व उपकरणं, फोन आणि तिकीट आजही ब्रिटिशकाळाप्रमाणेच आहे. सिग्नलसाठी हाताने गियर टाकण्याचे काम केले जाते. येथे कोणतेही प्रवासी ट्रेन थांबत नसल्याने इथले तिकीट काउंटर नेहमीच बंद असते. बोटावर मोजण्याइतकेच लोकं इथे काम करतात.