मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो. या महिन्यात गीता जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्ष मिळतो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. (Shrikrushna)
महाभारतातील शेवटचे युद्ध तर सर्वांनाच माहित आहे. या युद्धात जेव्हा अर्जुन त्याच्याच जवळच्या लोकांविरुद्ध लढण्यास तयार होत नव्हता तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला उपदेश दिला. अर्थात अर्जुनाला युद्धभूमीवरच उपदेश केला. याच उपदेशाला भगवद्गीता असे म्हटले जाते. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील मोक्षदा एकादशी तिथीचा होता. तेव्हापासून गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. श्रीमद भगवद् गीतेचा हा ५१६२ वा वर्धापन दिन असेल. भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्यांच्या कर्माची जाणीव करून दिली आहे. गीतेमध्ये एकूण १६ अध्याय आहेत, ज्यामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञानयोगाचे तपशीलवार वर्णन केले आहे. (Gita Jayanti)
यंदा मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंती ही, १ डिसेंबरला आहे. एकादशी तिथीची सुरुवात रविवार, ३० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता होणार असून, सोमवार, १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ०७ .०२ वाजेपर्यंत चालेल. त्यामुळेच उदय तिथीनुसार सोमवार, १ डिसेंबर रोजी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा विधीपूर्वक केली जाते. गीता जयंतीनिमित्त, अभिजित मुहूर्त सकाळी ११:४९ ते दुपारी १२:३१ पर्यंत आहे, तर ब्रह्म मुहूर्त सकाळी ५:०८ ते सकाळी ६:०२ पर्यंत आहे. गीता जयंतीवर व्यतिपात योग आणि रेवती नक्षत्र यांचे संयोजन देखील होत आहे. त्या दिवशी, रेवती नक्षत्र सकाळी ११:१८ ते रात्री १२:५९ पर्यंत आहे, तर व्यतिपात योग सकाळी १२:५९ पर्यंत आहे. (Todays Marathi Headline)

गीताजयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे लवकर उठून स्नान करुन पुजा करावी. यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद्भगवद्गीतेची पुजा करावी. मंदिराची साफसफाई करा. पंचामृतासह गंगा जलाने भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करा आता भगवंताला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावा, शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास करण्याचा संकल्प करा. श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करा, ॐ कृष्णाय नम: मंत्राचा जप करा, भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूर्ण भक्तीभावाने आरती, शेवटी क्षमा प्रार्थना करा. या दिवशी भगवद्गीतेचे पठण करावे शक्य नसल्यास किमान अध्याय १२ आणि १५ वाचा. नंतर श्रीकृष्णाला समर्पित असलेल्या मंत्रांचा जप करा. (Marathi News)
गीता जयंतीचे महत्त्व
गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे, ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या शिकवणींचा समावेश आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान देऊन ऐहिक आसक्तीतून मुक्त केले. योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला. असे म्हणतात की रणांगणात अर्जुन समोरच्या नातेवाईकांना पाहून विचलित झाला आणि त्याने शस्त्र उचलण्यास नकार दिला, तेव्हा सारथी झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे ज्ञानाचे डोळे उघडण्यासाठी गीतेचा उपदेश केला. त्यानंतर अर्जुनने पूर्ण ताकदीने युद्ध केले आणि कौरवांचा पराभव केला. गीता माणसाच्या विचारात शुद्धी आणते, गीतेच्या शिकवणीत इतकी ताकद आहे की ती पाळणारा माणूस चांगल्या-वाईटातील फरक समजू शकतो. जीवन जगण्याची अद्भुत कला गीतेच्या श्लोकांत शिकवली आहे. या दिवशी गीता पठण केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. (Top Trending News)
========
Gita Jayanti 2025: गीता जयंती कधी आहे? जाणून घ्या श्रीकृष्णांचे 5 जीवन बदलणारे उपदेश
========
गीता जयंतीच्या दिवशी उपवास केल्याने मनःशांती मिळते आणि असे म्हणतात की या दिवशी उपवास केल्याने श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी गरिबांना पैसे, अन्न, कपडे दान करा. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. गीता जयंतीच्या दिवशी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्याने कृष्ण प्रसन्न होतील. गीता जयंतीच्या दिवशी महादेव आणि पार्वती ची पूजा करा. गीता जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने गीतेचा ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. गीता जयंतीच्या दिवशी तुळशीची पूजा करून श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करा. लक्षात ठेवा गीता जयंतीच्या दिवशी एकादशी असल्याने या दिवशी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नका किंवा त्याची पाने काढू नका. (Social News)
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)
